Login

महात्मा ज्योतिबा फुले भाषण

महात्मा ज्योतिबा फुले भाषण

भाषण क्रमांक १
आदरणीय व्यासपीठ माझे पूज्य गुरुजन वर्ग आणि इथे उपस्थित माझ्या बाल मित्रांनो. आज आपण इथे जमलो आहोत एका महान व्यक्तीची जयंती साजरी करायला. ते महान व्यक्ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले! आज 11 एप्रिल म्हणजेच महात्मा फुले यांची जयंती! या निमित्त मी जे काही चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावेत ही माझी नम्र विनंती

विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।"

११ एप्रिल १८२७ रोजी सातारा जिल्ह्यातील कटगुण या गावी गोविंदराव फुलेंच्या पत्नी चिमणाबाई फुलेंच्या पोटी एका तेजस्वी बालकाने जन्म घेतला त्याचे नाव ज्योतिराव असे ठेवण्यात आले. त्यांनी आपल्या नावाप्रमाने शिक्षणाची ज्योत पेटवून ज्ञान रुपी प्रकाश सर्वत्र पोहचवला. फुले हे त्यांचे मूळ आडनाव नसून गोर्‍हे होते परंतु महात्मा फुले यांचे वडील गोविंदराव आणि दोन चुलते फुले विकण्याचे काम करीत असल्यामुळे पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले. काही कारणास्तव फुले परिवाराला कटगुणहून पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे यावे लागले. जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले.

महात्मा फुले यांचा विवाह लहान वयात म्हणजे वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी करण्यात आला. त्यांना प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ भाजी विक्रीचा व्यवसाय करावा लागला. इ.स. १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. महात्मा फुलेंची बौद्धिक क्षमता चांगली असल्याने त्यांनी तो अभ्यासक्रम पाच ते सहा वर्षातच पूर्ण केला.

महात्मा फुले याना समाज कार्याची फार आवड होती. समाजात असलेले अज्ञान आणि दारिद्रय पाहून त्यांना खूप दुःख होत असे. तिथे असलेल्या या समाजातील परिस्थितीत सुधारणा करण्याचे त्यांनी निश्चय केला. परिस्थितीत बदल करण्याची सुरवात त्यांनी स्वतःच्या घरातूनच केली त्यांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. ३ ऑगस्ट १८४८ रोजी पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून केली. त्याठिकाणी शिक्षिकेची जबाबदारी त्यांची त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची खऱ्या अर्थाने त्यांनी मुहूर्तमेढ ठरली. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होत. तसेच इ.स.१८५२ मध्ये त्यांनी अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळ पेठेत शाळा स्थापन केली. परंतु कोणतेही चांगले काम लोकांना पटत नाही तसेच त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. समाज सुधारण्याच्या कार्याला त्यांनी गती दिली.

महात्मा फुले यांनी १८६३ साली बालहत्या प्रतिबंधक गृहाजी स्थापना केली आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सावित्रीबाईवर दिली.१८६४ साली त्यांनी पुण्यात गोखले बागेत पहिला विधवा पूर्णविवाह घडवून आणला. सन १८६८ मध्ये आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी आपल्या घरच्या हौद अस्पृश्य लोकांसाठी खुला केला. महात्मा जोतिबा फुले यांनी २४सप्टेंबर १८७३मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली.समाजातील गुलामगिरी, जातीप्रथा नष्ट होऊन सर्व समजाला समान अधिकार मिळावा असा त्यांचा उद्देश होता.

महाराष्ट्र नाही तर भारत देशात समाजसुधारणेच्या चळवळीचे महात्मा ज्योतिबा फुले यांचे काम खूप मोलाचे आहे. ते स्त्री शिक्षण,अस्पृश्य समाज यांच्यासाठी आजीवन झटले. आशा थोर समाजसुधारक आणि विचारवंतांचे२८ नोव्हेंबर १८९०रोजी निधन झाले. त्यांना माझे कोटी कोटी नमन!
★★★
भाषण क्रमांक २

सुर्याप्रमाणे तेजस्वी दिसणारे व्यासपीठ, आणि व्यासपीठावरील अध्यक्ष गुरुजन वर्ग, परीक्षक आणि माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार! आज मी जे सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती

आज ११एप्रिल म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती! यांचे विचार अगदी आजच्या तरुण पिढीसाठीही खूप मार्गदर्शक आहेत. आपल्या देशात समाजात असे अनेक महापुरुष होऊन गेले, ज्यांनी समाजाची उन्नती केली. या महापुरुषांनी मर्यादा ओलांडून समाजात प्रचलित असलेल्या प्रत्येक वाईट गोष्टींना कडाडून विरोध केला. समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले हे देखील अशा महापुरुषांपैकी एक आहेत. महात्मा ज्योतिबा फुले हे भारतातील एक महान समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ, लेखक आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील कटगुण गावात झाला. त्यांचे वडील शेतकरी आणि आई गृहिणी होती.

महात्मा फुले यांचा विवाह लहान वयात म्हणजे वयाच्या बाराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी करण्यात आला. त्यांना प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ भाजी विक्रीचा व्यवसाय करावा लागला. इ.स. १८४२ मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. महात्मा फुलेंची बौद्धिक क्षमता चांगली असल्याने त्यांनी तो अभ्यासक्रम पाच ते सहा वर्षातच पूर्ण केला.

महात्मा फुले याना समाज कार्याची फार आवड होती. समाजात असलेले अज्ञान आणि दारिद्रय पाहून त्यांना खूप दुःख होत असे. तिथे असलेल्या या समाजातील परिस्थितीत सुधारणा करण्याचे त्यांनी निश्चय केला. परिस्थितीत बदल करण्याची सुरवात त्यांनी स्वतःच्या घरातूनच केली त्यांनी त्यांच्या पत्‍नी सावित्रीबाईंना शिक्षण देऊन शिक्षणकार्यास प्रवृत्त केले. ३ ऑगस्ट १८४८ रोजी पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाडयात पहिली मुलींची शाळा काढून केली. त्याठिकाणी शिक्षिकेची जबाबदारी त्यांची त्यांच्या पत्नी सावित्रीबाईंवर सोपविली. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची खऱ्या अर्थाने त्यांनी मुहूर्तमेढ ठरली. शाळेच्या मुख्याध्यापकपदी आरूढ झालेली भारतातील पहिली महिला म्हणजे सावित्रीबाई. त्याचप्रमाणे स्वतंत्रपणे फक्त स्त्रियांसाठी शाळा काढणारे महात्मा फुले हे पहिले भारतीय होत. तसेच इ.स.१८५२ मध्ये त्यांनी अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळ पेठेत शाळा स्थापन केली. परंतु कोणतेही चांगले काम लोकांना पटत नाही तसेच त्यांच्या या कार्याला सनातन्यांकडून सतत विरोध होत असे. पण जोतीराव आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. समाज सुधारण्याच्या कार्याला त्यांनी गती दिली.

ज्या काळात स्त्रियांना घराबाहेर पडण्याची मुभा नव्हती.ज्या काळात बहुजन समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवले जात होते. स्त्री आणि बहुजन समाज अज्ञानाच्या अंधकारात पिचत पडला होता. तेंव्हा महात्मा फुले हे स्त्रिया आणि बहुजन समाजासाठी क्रांतिसूर्य बनून आले. त्यांनी स्वतःच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिकवले त्यांना शिक्षत केलं आणि ३ ऑगस्ट १८४८ रोजी पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात पहिली मुलींची शाळा सुरू केली आणि भारतातल्या पहिल्या स्त्री शिक्षिका झाल्या त्या म्हणजे सावित्रीबाई फुले पण ही वाट सोपी नव्हती समाजाने फुले दांपत्याला खूप त्रास दिला.पण त्यांनी त्यांचे समजसुधारणेचे व्रत सोडले नाही.
तसेच इ.स.१८५२ मध्ये त्यांनी अस्पृश्य मुलांसाठी पुण्याच्या वेताळ पेठेत शाळा स्थापन केली.

महात्मा फुले यांनी १८६३ साली बालहत्या प्रतिबंधक गृहाजी स्थापना केली आणि त्याची संपूर्ण जबाबदारी सावित्रीबाईवर दिली.१८६४ साली त्यांनी पुण्यात गोखले बागेत पहिला विधवा पूर्णविवाह घडवून आणला. सन १८६८ मध्ये आपल्या घरच्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी आपल्या घरच्या हौद अस्पृश्य लोकांसाठी खुला केला. महात्मा जोतिबा फुले यांनी २४सप्टेंबर १८७३मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली.समाजातील गुलामगिरी, जातीप्रथा नष्ट होऊन सर्व समजाला समान अधिकार मिळावा असा त्यांचा उद्देश होता.

महात्मा फुले नुसते समाजसुधारकच नव्हते तर ते एक उत्तम लेखक देखील होते. त्यांनी ब्राम्हणांचे कसब,गुलामगिरी,शेतकऱ्यांचा आसूड, नाटक तृतीय रत्न, पोवाडा विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजी तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारे विविध प्रकारचे लेखन केले आहे.
महाराष्ट्र नाही तर भारत देशात समाजसुधारणेच्या चळवळीचे महात्मा ज्योतिबा फुले यांचे काम खूप मोलाचे आहे. ते स्त्री शिक्षण,अस्पृश्य समाज यांच्यासाठी आजीवन झटले. आशा थोर समाजसुधारक आणि विचारवंतांचे२८ नोव्हेंबर १८९०रोजी निधन झाले. त्यांच्या कार्यास माझे विनम्र अभिवादन!