सरिताचा दुःख वाट बघत होते. सरिताची दोन्ही मुलं कामाला जातं होती. तिच्या घरी कामवाली होती रेखा. रेखा ला सरिताच्या घराबद्दल सगळी माहिती होती. राजू हा शांत आणि भोळा होता, अनिल रागीट आणि माणसं ओळखणारा होता. रेखा अनिल पासून जरा लांब राही, पण राजुला आपले सगळ्या अडचणी सांगे.राधिका पण रेखाला ओळखत होती. राधिकला रेखाचं वागणं पटत नव्हतं. रेखा सरिताच्या घरी अशी वावरत होती, जशी काय ती त्याची सून आहे असा वागत होती. तिने अनिलला जेवणात थोडं थोडं अशक्तपणाचे औषध देत होती, ज्याने अनिल चं पूर्ण शरीर कमजोर पडत होत. अनिल काम पण सोडलं होत ते देखील जागेवर होता.सरिता ला आपल्या नशिबाची कीव येई. आपली मोठी दोन मुलं आपल्यला सोडून गेली. आपला तीन नंबर मुलगा अनिल आपल्यासारखा जागेवर आहे. रेखा या गोष्टीचा फायदा उचलत आहे. रेखा गोड गोड बोलून राजूच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत होती. हे सगळं सरिता बघून सुद्धा काही करू शकत नव्हती. सरिता राजुला खूप सांगायचा प्रयत्न करी कि रेखा चांगली नाही, पण रेखा हुशार होती. रेखा राजू समोर अनिल आणि सरिताची काळजी घेण्याच नाटक करी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा