माहेरची गोड मैत्री
सीमा चे आज सकाळपासून मन लागत नव्हते,
ती सारखी दरवाजाकडे बघत होती, एरव्ही पूर्ण दिवस जाणारे काम तिने आज 9 पर्यंत च आवरले होते मग कारणही तसेच होते भाऊ येणार होता तिला घेण्यासाठी,
खरच माहेरची ओढ वेगळीच असते ना .....
पतिघरी लाखो सुख पायदळी लोळण घेत असताना
तिला आजही माहेरची ओढ लागतेच,
कितीही सुख असले तरी पापण्यांची कड ओलावते च माहेर सोडताना,
असेच आज सीमांचे पाय जमीवर राहत नव्हते, मुलंही केव्हाची आवरून तयार होती,
तेवढ्यात तिचा भाऊ तिला घेण्यासाठी आला,
मामा ची गाडी दिसताच मुलं गाडीत जाऊन बसली
सीमा ही घरातील लोकांचा निरोप घेऊन जाऊन बसली,
गाडी जशी चालू झाले तिचे विचारचक्र चालू झाले,
काही झाले तरी माहेरी काही बोलायचे नाही असे ती मनाशी ठरवून टाकते,
सीमा माहेरी पोहोचते
ती दिसताच मुलं आत्या आली आत्या आली करत येऊन बिलगतात ,
सीमाची आई तशी स्वभावाने कडक च त्यामुळे सीमा आईशी जेमतेम च बोलायची मनातील तर कधीच नाही
सीमा सर्वाना भेटली व रूममध्ये गेली,
तिच्या पाटोपाट
रेवती तिला चहा देण्याचे नाटक करत आतमध्ये गेली,
सीमा व रेवती सारख्याच वयाच्या त्यांचे मुलं देखील सोबतचे च त्यामुळे त्यांचे खुप जमायचे
सीमा माहेरी येऊन गेल्याशिवाय
रेवती तिच्या माहेरी जात नव्हती,
सीमा आली की दोघींची मजा असायची सोबत फिरणे, खरेदी करणे, गप्पा मारणे, यात त्यांचा दिवस कसा जायचा ते त्यांनाच कळत नव्हते,
पण यावेळी सीमा शांतच होती
व तिला शांत बघूनच रेवती तिला एकटीला भेटण्यासाठी तिच्या रूममध्ये गेली,
सीमा रूममध्ये विचार करत बसली होती
"अरे वहिनी तू
तू कधी आलीस "
सीमा घाबरत म्हणाली
"मी नाही बोलणार आणि काय ग
बाहेरून आत आलीस आई बाबा ना भेटली भाऊ तर घेऊनच आला व मला फक्त एक स्माईल दिली तीही दुरूनच बरोबर ना ती शेवटी तुझी रक्ताची नाती माझे काय मी सून आहे ना या घरची "
असे म्हणून रेवती फुगून बसली
सीमा काहीच न बोलता पटकन रेवती च्या गळ्यात पडली व रडू लागली
"सॉरी ग वहिनी मी माझ्या च टेन्शन मध्ये इथे आले व तशीच घरात आले"
"टेन्शन कसले टेन्शन"
रेवती म्हणाली
आता मात्र सीमा पुन्हा सावरली "नाही ग कसले नाही चुकून बोलले "
"खर सांग नाहीतर बघ"
रेवती हट्टाला पेटली
"सांगते पण तू कुणालाच बोलू नको आई ला पण नाही "
सीमा पलंगावर बसत म्हणाली
"आतापर्यंत काही सांगितले का ?
कालच आई चे किती बोलणे खाल्ले त्या लाल साडी वरून पण सांगितले नाही की तू घेतली मला म्हणून "
रेवती सीमा जवळ बसत म्हणाली
"हो ग
काय झालं माहितीये का ???"
सीमा आवंढा घिळत बोलली
"हे बघ तू आणि मी काय वाटले का
बोल तू
माझ्या या कानाच्या त्या कानाला पण कळणार नाही "
ती नेहमीच्या स्टाईल ने एक बोट एका कानात टाकत म्हणाली
"अग यांच्या कंपनी मध्ये 10 लाखाचा घोळ झालाय व नाव यांच्यावर आलेय आई बाबा म्हणताय यांनीच केला असेल व पैसे धापले असेल पण ते माझी व मुलांची शपथ खाऊन म्हणताय मी नाही केला व मला पण माहीत आहे हे खोटं नाही बोलणार माझे दागिने व यफडी मोडून 7 लाख आले पण अजून तीन लाख पाहिजेत,
दादा ची देखील नोकरी ची पंचायत आहे
बाबा देतील पण आई कशी आहे माहीत आहे ना
ती अगोदर याना जे नाही ते बोलेल व मग देईल व मला ते नको आहे
आता मी काय करू माझे डोकं च चालत नाहीये, हे तर फक्त शांत बसतात अजून दोन दिवसात जर पैसे नाही दिले कंपनी मध्ये तर यांच्यावर पोलीस केस होईल "
असे बोलून ती रडू लागली
"बस इतकच ना ....
मग झालं तर मी आलेच च "
असे म्हणून रेवती तिच्या रूममध्ये गेली व हातात एक बॉक्स घेऊन आली
"घे "
तो बॉक्स पुढे करत म्हणाली
"हे काय आहे व वेडी आहेस का नाही नाही मी नाही घेणार "
सीमा नाकारत म्हणाली
"हो तू कशाला घेशील ना मी कुठे तुझी रक्ताची आहे"रेवती पुन्हा तोंड पुगवत म्हणाली
"अग तसे नाही ग पण तू ही सासुरवाशीण आहेस तुला ही तुझ्या मर्यादा आहेत व आई जर कळाले ना तर तुझ्यासोबत माझे ही भरीत करेल ती "
सीमा रेवती ला समजावत म्हणाली
"करू दे व तसेही त्या रोज माझे भरीत करतात ते काय नवीन आहे का आता मला व हे सोन मी घरात ठेऊन तरी काय करू
तुझा गळा मोकळा असताना मी हे घालेन का व लगेच नाही देत आहे हे मोडून 7/8 लाख तरी येतील त्यातील 3 लाख भाऊजीना दे व उरलेल्या मध्ये तू स्वतः चे पार्लर टाक
एकदा का तुझा जम बसला मग मला यात थोडी भर घालून आणखी करून दे हवं तर " रेवती हसत म्हणाली
"आणि हेही डुबले मग "
सीमा घाबरत म्हणाली
"एक तर असे काही होणार नाही व झाले तर तुझ्यापेक्षा माझ्यासाठी काहीच श्रेष्ठ नाही ग
असे म्हणून तिने सीमा ला मिठी मारली
"वहिनी अश्या काळात रक्ताचे पण साथ देत नाहीत पण तू देवासारखी धावून आलीस मी तुझे हे उपकार कधीच विसरणार नाही "
सीमा च्या डोळ्यातून पाणी वाहू लागले,
"झालं का आता आपलं मानलं व ही उपकाराची भाषा तुला माहीत आहे मी या घरात नवीन होते तू मला बहिणी सारखी साथ दिलीस खुप वेळा सांभाळून घेतलं माझ्यासाठी आई चे बोलणे देखील खाल्ले, माझे आरोप स्वतःवर घेतले , आणि खरं सांगू तू होतीस म्हणून मी आई च्या हाताखाली टिकले तुझ्याजवळ रडून मन मोकळं केलं की मला हलकं हलकं वाटायचं व तू म्हणायची ना वहिनी जाऊ दे ग तू खुप गोड आहेस माझी आई च तशी आहे तेंव्हा खुप बळ मिळायचं व भारी वाटायचं मला, मी कधीच माहेरी सासरचे गराने केले नाही कारण मी सासरची सगळी कुरबुरी तुला सांगून मोकळं होयचे
त्यामुळे
तुझ्यापुढे हे सोनं काहीच नाही मला "
आता दोघींच्याही डोळ्यातून पाणी वाहू लागले काय झाले हे आई ला कळतं नव्हते पण काहितरी शिजतय याची त्यांना जाणीव होती व लेक व सून दोघी काही सांगणार नाही याची खात्री,
सीमा ते सोनं घेऊन गेली
पती ला पैसे देऊन उरलेल्या पैशात तिने पार्लर टाकले हळूहळू पैसे साठवून तिने रेवती ला सगळं सोन बनवले व ते तिच्या वाढदिवसाच्या दिवशी गिफ्ट केले,
सीमा ची ही माहेरची मैत्रीण तिच्यासाठी आज देवदूत ठरली होती
कथेचे तात्पर्य प्रत्येक नात्याला त्याची एक वेगळी वीण असते त्या विणेला घट्ट होण्यासाठी योग्य वेळ द्या,
नात्यात कधीच कुणाला गृहीत धरू नका
कुठल्याही नात्यात तुम्ही जेवढे देता त्यापेक्षा जास्त तुम्हांला परत मिळते
विश्वास बसत नसेल तर एकदा प्रयत्न करून नक्की बघा
कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव असून ,
आवडल्यास लाईक नक्की करा
धन्यवाद
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा