दरवरसाची दिवाळी
अशी नेटावर आली.
सासुरवाशीण मैनेला
ओढ माहेरची लागली
अशी नेटावर आली.
सासुरवाशीण मैनेला
ओढ माहेरची लागली
तिच्या मनाचं पाखरू
असं उडाल भुरकुनं
माहेरच्या अंगणात
आलं उगाच जाउन
असं उडाल भुरकुनं
माहेरच्या अंगणात
आलं उगाच जाउन
माझं माहेर लाडकं
वसलं डोंगरकुशीत
मोठा पाण्याचा ग ओढा
पिक डोलते खुशीत
वसलं डोंगरकुशीत
मोठा पाण्याचा ग ओढा
पिक डोलते खुशीत
पिंपळाच्या पारा खालून
वळसा घेते पायवाट
दोन वाकान घेऊन
नेते अंगणात थेट
वळसा घेते पायवाट
दोन वाकान घेऊन
नेते अंगणात थेट
माझी साधी भोळी माय
पाणी तुळशीला घालते
दूरदेशी तिची लेक
तिला आयुक मागते
माय बोलते भावाला
घाल बैलाला रे झुलं
वाट बघत असनं
माझं जाईच ग फुल
बापू बोलतो घाईन
बांध लवकर कमनी
कोमेजेल उन्हानी
माझी लाडकी चिमणी
बांध लवकर कमनी
कोमेजेल उन्हानी
माझी लाडकी चिमणी
राजा सर्जा ची ग ती
गाडी घुंगराची घेऊन
निघाला गं बंधुराया
माझा मुराळी होऊन
गाडी घुंगराची घेऊन
निघाला गं बंधुराया
माझा मुराळी होऊन
वाट पाहते भावाची
लावली ग सांजवात
मन कवाच रमल
माहेरच्या अंगणात
माहेरच्या अंगणात
लावली ग सांजवात
मन कवाच रमल
माहेरच्या अंगणात
माहेरच्या अंगणात
©®खुशी अशोक कांबळे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा