इथे राजू रेखाच्या आहारी जातं होता, आता तर राजू रेखा बरोबर राहत होता. घरी सरिता आणि त्याच्या भावाचा मुलगा राघव राहत होता. राजू आता खूप वेगळा झला होता. राजू आता फक्त सरिता ची पेशन असेल तेव्हा घरी जाई सगळी पेशन स्वतःला ठेवी. सरिता खूप लाचार झाली होती, तरी तिला राजूवर खूप प्रेम होत.सरिताला आता एकच आधार होता राजू असे तिला वाटे, राधिका काय आपली मुलगी आहे. राधिका तिच घर बघेल आपल्याला शेवटी राजू बरोबरच राहायच आहे. हाच फायदा रेखाने उचला आणि रेखा ने राजुला भडकावून हिंदमताची रूम बंद करायला लावली आणि राधिकाच्या आई ला कुठे घेऊन गेले दोघ कोणालाच माहित नाही. जेव्हा हे समजलं तेव्हा राधिकाने पोलीस मध्ये तक्रार केली. इथे रेखा सरिता वर खुप अत्याचार करत होती, राजू घरी नसताना. राजुला जेव्हा सरिता सांगे कि मला मारलं रेखाने, त्यावर जेव्हा राजू रेखा ला विचारी तेव्हा रेखा बोलें कि तुमच्या आईच सगळं मी करते हे ऐकत नाही तर त्यांना फक्त बोलते मी आणि त्या तुम्हला माझ्या बदल उलट सुलट सांगतात आणि तुम्ही विश्वास ठेवता. नंतर राजू सरितालाच बोलें. जेव्हा पोलिसाना राजुचा पत्ता भेटला त्यांनी राजुला आई ला घेऊन पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं तेव्हा रेखाने सरिताला आधल्या दिवशी राजु नसताना सरिताला खूप मारलं आणि तिला सांगितलं पोलीस स्टेशन मध्ये सांगयच कि मला एकच मुलगा बाकी सगळी मुलं माझी मेली मला मुलगी नाही आहे. सरिता दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये तसाच बोली त्यादिवशी राधिका खूप रडली......
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा