माहेरचं वाण...भाग 4 अंतिम

Maherch wan
माहेरचं वाण...भाग 4 अंतिम

अदितीने सायलीच्या घराची दारावरची बेल वाजवली. सायलीने दार उघडलं.

"वेलकम अदिती सौरभ.".
सायलीने हसून दोघाचं स्वागत केलं.

दोघेही आत गेले.

हॉलमध्ये एन्ट्री करताच डोळ्यासमोर जे दृश्य दिसलं, दोघेही बघतच राहिले.

इतक्या सुंदर पद्धतीने दोन पाट सजवून ठेवलेले होते. पाटाच्या भोवताल रांगोळी काढलेली होती. आजूबाजूंनी फुलांची सजावट केलेली होती, पंचपक्वाणाने ताट सजवून ठेवलेलं होतं.


"बापरे सायली अग हे काय आहे?"

"तुम्ही या बसा दोघेही."

तिने दोघांनाही पाटावर बसवलं.

सौरभचं औक्षण केलं, त्याला भेटवस्तू दिली त्यानंतर अदितीचं औक्षण केलं. तिची खणा-नारळाने ओटी भरली. अदिती फक्त डबडबणाऱ्या डोळ्यांनी बघत होती.

"अगं अदिती आज तर आनंदाचा दिवस आहे, तुझ्या डोळ्यात अश्रू का?"


"तुला काय वाटलं सायली मला कळत नाही आहे का? का केलंस हे सगळं?"


"तुझ्या आनंदासाठी, आता यानंतर म्हणायचं नाही की मला माहेराला कुणीच बोलवणार नाही. हे तुझं माहेरचं आहे."

"अग पण तू तर लहान असूनही इतकं सगळं केलंस माझ्यासाठी."


"मी लहान नाही दोन महिन्यांनी मोठी आहे तुझ्यापेक्षा.

"पण म्हणून काय झालं?"


"मोठ्या बहिणीचा अधिकार आणि हक्काने केलं मी हे सगळं."

"सायली तू माझ्यासाठी हे जे काही केलं ना ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाहीये. माझ्या जीवनातला अविस्मरणीय क्षण आहे, हे क्षण मी कधीही विसरणार नाही."


"बस झालं, आता दोघेही जेवण करा."

दोघांनी जेवण केलं, गप्पा रंगल्या.


त्यानंतर अदिती घरी जायला निघाली, थोडी समोर गेल्यानंतर मागे वळली.

सायलीला वाकून नमस्कार केला.

"अदिती अग काय करतेस?"

"दोन महिन्यांनी मोठी बहीण आहेस ना तू माझी, आशीर्वाद घ्यायला नको." दोघीही हसल्या आणि एकमेकांना गळ्यात हात घालून रडायला लागल्या.

" थँक यू सायली, माहेरचं वाण देऊन तू आज मला माझं माहेर दिलंस."

समाप्त:

धन्यवाद

©®ऋतुजा वैरागडकर

🎭 Series Post

View all