माहेरच्या अंगणातल्या चिमण्या
सकाळचे अकरा वाजले होते, मंगलाताई आपल आटपून टीव्हीवर मालिका पाहण्यात गुंग होत्या, निशा त्यांची सून काम आटपून आंघोळीला गेली होती. मुलगा मनीष कामावर.
तेवढ्यात स्कुटी थांबल्याचा आवाज आला आणि मोठी नात नुपूर बाहेर धावली
“तु कां घेऊन गेलीस स्कुटी? आता मला कॉलेजला जायला उशीर झाला ना! तुला ठाऊक होतं ना आज माझा प्रॅक्टिकल होतं!”

“ हो ग ताई ,पण काय करू माझी सायकल पंक्चर झाली होती काल! आणि आज सकाळी सकाळी दुकान—-
“ किती वाजले जरा पहा?
“ आले ना मी?”
“हो उपकारच म्हणावे तुझे!
दोघी जोरात जोरात वाद घालत होत्या तो आवाज अगदी आंघोळ करत असलेल्या निशाच्या कानावर गेला, ती कपडे करून घाईघाईने बाहेर आली.

“काय हे, किती भांडताय जोरात?”
“ आई मी निघते मला उशीर होतोय “म्हणत नुपूर गेली.
“ हळू चालव ग” म्हणत निशा आत आली.
“ हळू चालव ग” म्हणत निशा आत आली.
“ काय हे नेहा तुमच, बाहेर काय भांडता? चार घरी ऐकू जातं!
“हो तू मलाच रागाव! एक दिवस स्कूटी नेली तर काय बिघडलं?” म्हणत ती खोलीत गेली.
निशा मंगलाताईं कडे पाहत म्हणाली” आई तुम्ही होत्या ना इथे ?मग किती जोरजोरात भांडत होत्या दोघी .तुम्ही काहीच का नाही बोलल्या? चांगलं रागवायचं त्यांना.”
मंगलाताईंचं निशाच्या बोलण्याकडे लक्षच नव्हतं त्यांच्या कानात असेच भांडणाऱ्या दोन बहिणींचे आवाज घुमायला लागले…..

मंगला आणि सरला, सरला मोठी तर मंगला दोन वर्षांनी लहान. सरला ताई नाजूक, बारीक तर मंगला जरा थोराड बाबांसरखी. त्यामुळे दोघीबरोबरीच्याच वाटत.
आईने दोघींना एक सारखेच एकाच कापडाचे फ्रॉक शिवले. त्या काळात तशीच पद्धत, एक दिवस ताई दुपारची शाळा म्हणून शाळेत गेली होती .मंगलाची सकाळची शाळा. मंगलाला मैत्रिणीकडे जायचे होते पाहिलं तर फ्रॉक खूपच मळलेला तिने हळूच ताईचा फ्राक घालून घेतला, विचार केला ताई शाळेतून यायच्या आधी बदलून ठेवून देईन.
आईचं पण लक्ष नव्हतं .
मंगला घरी आली तर ताई दारात उभी होती” “पहा पहा आई तिने माझा फ्रॉक घातलाय आता मी काय घालू?” हिच नेहमीच आहे स्वतःचं नीट ठेवत नाही.
आई पण खूप ओरडली किती नीट ठेवते ताई बघ तिचे कपडे, तिचे कपडे पहा आणि तुझे तुझेच कसे लवकर फाटतात? काटे आहे कां अंगावर ?
खरंच होतं ताई खूप व्यवस्थित होती नवीन कपडे बाहेरूनआल्याबरोबर बदलायचे नीट घडी करून ठेवायची, तेवढीच मंगला आळशी अशाच भांडत भांडत दोघी मोठ्या झाल्या ..
.
ताईच्या लग्नाची बोलणी चालली होती. ताईचं लग्न ठरलं भाऊजी बँकेत होते नोकरी चांगली पगार चांगला, दिसायलाही ठीकठाक असावे मंगला नी भावजींना पाहिलंच नव्हतं फक्त अंदाज होता.
आई-बाबा एक दिवस बोलत होते मुलगा छान आहे सगळं छान आहे फक्त अंगाने फार बारीक आहे सरला सारखाच.
एक दिवस आई घरी नव्हती घर आवरण्यावरून ताई व मंगलाच जोरदार भांडण झालं. ताई चिडून म्हणाली ‘किती आळशी आहे जरा कामात लक्ष दे नुसती खाते आणि लोळत पडते पहा जरा स्वतःकडे फुगत चालली हत्ती सारखी ‘
मंगला ला हा टोमणा सहन झाला नाही” हो कां आणि तू? अशी किडी काट या काठी सारखी, तू आणि तुझे तेही असेच कीडीकाट काठीसारखे..
हा टोमणा मात्र ताईच्या जिव्हारी लागला बरं प्रतिटोला द्यायला तिच्याजवळ काही शब्द नव्हते .क्षणभर तिचा चेहरा पडला मग काठी घेऊन ती मंगलाच्यामागे धावली . नशिबाने तेवढ्यात आई आली तशी ताईने रडत सर्व सांगितले मग मात्र आईने मंगलाची चांगलीच खरड पट्टी काढली.
रात्री ताई न बोलता पाठ करून झोपली. तेव्हा मंगला लाआपली चूक उमजली ‘चुकले मी ताई’ म्हणत तिचा हात धरला तेव्हा तिने माफ केले.’ बघ त्यांच्याविषयी परत असं कधी बोलू नको’ म्हणाली .दोघी गळ्यात गळे घालून झोपल्या.

ताईच्या लग्नाच्या आधीची दिवाळी… तेव्हाचा प्रसंग मंगला ला आठवला .भाऊजी भेटायला येणार ऐकून आईने छान छान पदार्थ बनवले जेवण झाल्यावर भाऊजी ताईला बरोबर घेऊन फिरायला गेले. ते गेल्यानंतर ‘हे बघ मंगल हे मागचं आता सर्व तुला आवरायचंय मी खूप थकले जरा पडते म्हणत आई निघून गेली. मंगलाला खूप राग आला ताईचा. त्यांनी म्हटलं तर लगेच गेली, खोटं खोटं का होईना पण मला चालते का असे विचारले ही नाही आणि हा पसारा आता मला एकटीला आवरावा लागेल या कल्पनेने तिची चिडचिड सुरू झाली.
संध्याकाळी दोघं फिरून आले भाऊजींनी मंगला साठी सुंदर असे कानातले टॉप्स आणले. ते पाहून मंगलाचा राग पळाला.
हळूहळू भाऊजींविषयी तिचं मत बदललं पुढे ताईचं लग्न झालं सर्वात जास्त रडू ही मंगला ला आले ताई शिवाय करमतं नसे, हळूहळू मंगला ला शहाणपण आलं. आईने कामाला जुंपले आणि ती ही कंटाळा न करता काम करू लागली.
नशिबाने लग्नानंतरसासर, सासूबाई खूप चांगल्या मिळाल्या त्यांनी ही सांभाळून घेतलं..

सुरवातीला भेटणारी ताई कितीतरी वर्ष झाली आता तिची फारशी भेटही होत नाही. कधीतरी फोनवर बोलणं होत. हे सर्व मागच्या आठवून मंगला ताईंच्याच डोळ्यात पाणी आल.
जेवतानाही त्या आपल्याच विचारत असल्याचे पाहून निशा म्हणाली “आई या रस्त्यावर इतक्या भांडत होत्या आणि तुम्ही काहीच बोलल्या नाही?”
“ हो ना, नेहमी तर आजी आम्हाला सारखी रागवत असते भांडू नका भांडू नका म्हणत असते .”
भांडू दे ग त्यांना, मंगलाताई हळवेपणाने म्हणाल्या.” माहेरच्या अंगणातल्या चिमण्या ह्या चार दिवस दाणे टिपतील भांडतील आणि एक दिवस वेगवेगळ्या वाटेला उडून जातील किती किती दिवस एकामेकिंची तोंडही नाही दिसणार त्यांना.
आज सासूबाईंना काय झाले आहे? इतक्या इमोशनल का झाल्या आहेत चा विचार करत निशा टेबल आवरू लागली
मंगलाताई डोळ्यातल पाणी पुसत हात धुवायला उठल्या.
—--------------------------------------------.

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा