महिला दिन विशेष माझी एक कविता
महिला दिन आला उत्साह पहिला..
मनाला खरचं विचार स्वतःला....
स्वातंत्र्य, समानता मिळाली वाटते तुला?
स्त्री म्हणून मान लाभला?
नको अगदी देव्हारा, नको तो झूला
कमीत कमी स्त्री म्हणून नका कमी लेखू तिला
कमीत कमी स्त्री म्हणून नका कमी लेखू तिला
गर्भात मारली, हुंडाबळी झाली छळाला
सासूरवास, टोमणे,बोलणी तिच्या पुजलेले पाचीला
लेकासाठी लेकीची संख्या वाढीला
खरंच लेक म्हातारपणी पहातो तुम्हाला
आजही बंधने आहेत तिला
सातच्या आत घरात नंतर धोका सुरक्षिततेला.
साडी, बांगड्या, टिकली हवीत तिला
संस्कृती जपण्याचा आग्रह तिला..
सीता आणि द्रौपदीच्या काळापासून त्रास तिला
आजतागायत त्रासाची रोज कहाणी येते ऐकायला
ती तरी शिक्षण,पद,प्रतिष्ठेत गेली आज पुढे पहायला
नवे क्षितिज गाठायला
प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घ्यायला
पण तिला आडवे येणारे उभे वाटेला..
ती आता थांबणार नाही आता चला
वेळ आली दुर्गेचे रूप घे दाखवून दे जगाला.
आता कोणी वस्त्रे पुरवणारा श्रीकृष्ण नाही राहिला
आता तूच सिध्द कर ग स्वतःला
तूच सरस्वती,तूच लक्ष्मी,तूच महाकाली ओळख स्वतःला
आता दिवस तुझाच उजाडला
आता दिवस तुझाच उजाडला
तु अन्नपूर्णा होऊन जपते कुटुंबाला
तूच जन्म देते पुरूषाला.
माहेर, सासर तुच असते नांदायला
तुझ्यामुळे घरपण घराला.
शिव्या तुझ्यावर, विनोद तुझ्यावर येतात ऐकायला
तुच दुःखात व्यसन नाही करत जायला.
सगळे अलंकार, व्रत, नाव अहोचे पाळायला
तुझे असे काय आहे विचार स्वतःला
महिला दिन आला उत्साह पहिला..
मनाला खरचं विचार स्वतःला....
सौ भाग्यश्री चाटी सांबरे ©®
8.3.2023
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा