चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
लघुकथा फेरी ( संघ कामिनी )
लघुकथा फेरी ( संघ कामिनी )
शीर्षक : माई!
रस्त्यावर बुटांची पॉलिश करणाऱ्या चिमुकलीची नुसती धांदल उडाली होती. पावसाचे टपोरे थेंब रस्त्यावर कोसळू लागले तशी जवळच डिव्हायडरवर ठेवलेली चार पुस्तकं तिने उचलली आणि धावत जवळच्या दुकानाकडे गेली.
"चंदू काका... माझी एवढी पुस्तकं ठेवता का?" दहा वर्षांच्या गौरीनं निरागसपणे विचारलं.
"चंदू काका... माझी एवढी पुस्तकं ठेवता का?" दहा वर्षांच्या गौरीनं निरागसपणे विचारलं.
चंदू काकांनी होकार देताच तिने पटकन पुस्तकं टेबलवर ठेवून दिली आणि उरलेलं सामान आणायला रस्त्याकडं पळाली. तोवर पावसानं चांगलाच जोर धरला होता. गौरी तर पूर्णपणे भिजून गेली होती. तरीही तिचं काम चालूच होतं.
गौरी अनाथ आश्रमातच लहानाची मोठी झालेली. तोच तिचा परिवार होता. गौरी कष्टाळू तितकीच प्रामाणिक आणि हुशार होती. सुट्टीच्या दिवशी किंवा फावल्या वेळात ती बुटाला पॉलिश करणं, चपला शिवून देणं, एवढंच नाही तर ती विणकाम देखील करायची. वेळ मिळेल तेव्हा पुस्तकी ज्ञान देखील आत्मसात करायची. सगळ्यांनाच त्या चिमुकलीचा हेवा वाटायचा. रपरप पडणाऱ्या पावसात तिनं तिचं सामान गोळा केलं आणि जाऊन दुकानाच्या आडोशाला उभी राहिली.
"गौरी आत ये बाळा, थंडी वाजून राहील." चंदू काकांनी आवाज दिला.
पन्नाशीच्या आसपास असलेले चंदू काका अगदी उदार मनाचे. खाऊसाठी येणाऱ्या अनाथ आश्रमाच्या मुलांकडून त्यांनी कधी एक रुपयाही घेतला नाही. चंदू काकांचं गोळ्या बिस्किटांचं दुकान फार मोठं नसलं तरी या लहान मुलांसाठी पुरेसं होतं. तिथून पुढेच पायवाट सोडली की अनाथ आश्रम होतं.
"काका, मी खूप भिजलेय... फरशी ओली व्हायची. मी बाहेरच बरी आहे."
"हा पाऊस आता थांबायचा नाही. जास्तच जोर धरलाय. ही छत्री घे आणि जा, जाऊन कपडे बदल." काकांनी तिच्या हातात छत्री दिली, सोबतच दोन बिस्किटांचे पुडे आणि तिची पुस्तकंही पिशवीत भरून दिली.
"हा पाऊस आता थांबायचा नाही. जास्तच जोर धरलाय. ही छत्री घे आणि जा, जाऊन कपडे बदल." काकांनी तिच्या हातात छत्री दिली, सोबतच दोन बिस्किटांचे पुडे आणि तिची पुस्तकंही पिशवीत भरून दिली.
"काका या बिस्किटांची काही गरज नाहीये."
कधी कधी तर चंदू काकांना तिचं नवलच वाटायचं. इतर मुलं खाऊसाठी जशी धडपड करायची, गौरी मात्र त्यांच्याहून कितीतरी पटीने समंजस होती.
"असू दे बाळा, काकांकडून भेट समज." तिने परत केलेले पुडे काकांनी परत पिशवीत टाकले.
"अश्या रोजरोज किती भेटी देता तुम्ही काका. ठीक आहे काका, हे घ्या वीस रुपये." दहा-दहा रुपयांचे दोन ठोकळे टेबलवर ठेवून गौरी चालती झाली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे काका पाहतच राहिले.
***
अनाथ आश्रमाच्या व्हरांड्यात तिच्याच वयाची वा त्याहून लहान मुलं खेळत बागडत होती. कौलारू छतावरून पडणाऱ्या पावसाच्या धारेत हात नाचवत होती. गौरी आलेली दिसताच सगळ्यांनी एकच कल्ला केला. गौरी म्हणजे सगळ्या मुलांचा जीव की प्राण. अगदी घासातला घास देणारी गौरी मुलांची देखील लाडकी ताई होती. आवाज ऐकून वॉर्डनबाई बाहेर आल्या.
***
अनाथ आश्रमाच्या व्हरांड्यात तिच्याच वयाची वा त्याहून लहान मुलं खेळत बागडत होती. कौलारू छतावरून पडणाऱ्या पावसाच्या धारेत हात नाचवत होती. गौरी आलेली दिसताच सगळ्यांनी एकच कल्ला केला. गौरी म्हणजे सगळ्या मुलांचा जीव की प्राण. अगदी घासातला घास देणारी गौरी मुलांची देखील लाडकी ताई होती. आवाज ऐकून वॉर्डनबाई बाहेर आल्या.
"किती वेळा सांगितलं गं गौरी तुला? नको करत जाऊ काही... काय गरज आहे तुला हे सगळं करायची? भिजलीस ना पावसात! आता आजारी पडलीस तर?" अनाथ मुलांचा सांभाळ करणाऱ्या वत्सलाबाई तिचे केस पुसत ओरडत होत्या. सगळे प्रेमाने तिला माई म्हणायचे.
"माई... ते जाऊ दे. हे बघ, आजचे चारशे रुपये जमा झालेत. हवं तर आज रात्री श्रीखंड पुरी बनव. काय मुलांनो, खायची आहे ना श्रीखंड पुरी?" तिच्या वाक्यावर जो तो आनंदाने ओरडू लागला, नाचू लागला. माई मात्र भरल्या डोळ्यांनी तिच्याकडे बघत होत्या.
"माई, कशाला रडतेय. कष्ट करण्यात कसली आली लाज! कोणाचं फुकटचं खाऊ नये. माझी स्वप्नं खूप मोठी आहेत गं माई. देवाने मला आईबाबा नाही दिले म्हणून काय झालं? तूच माझे आईबाबा आणि ही सगळी माझी भावंडं. यांच्यासारख्या मुलांसाठी मला खूप काही करायचं आहे." असं म्हणून गौरीने माईंचे डोळे पुसले.
"आणि हो... अजून थोडे साठवलेले पैसे आहेत माझ्याकडे त्यातून मुलांना पुस्तकं पण घे." लाकडी कपाटात ठेवलेली मातीची बिशी माईंच्या हातावर ठेवत ती म्हणाली.
वत्सलाबाईंनी आश्रमातच मुलांना शिक्षण देणं सुरू केलं. कालांतराने व्याप्ती वाढत गेली. गौरीही आता मोठी झाली होती. तो दिवस गौरीला चांगलाच आठवत होता. गौरी त्यावेळी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. माई रात्रभर जाग्या होत्या. त्यांचा खोकला काही केल्या थांबत नव्हता. गौरीने जवळच्याच डॉक्टरांना फोन केला. तात्काळ डॉक्टर तपासायला आले.
वत्सलाबाईंनी आश्रमातच मुलांना शिक्षण देणं सुरू केलं. कालांतराने व्याप्ती वाढत गेली. गौरीही आता मोठी झाली होती. तो दिवस गौरीला चांगलाच आठवत होता. गौरी त्यावेळी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाली होती. माई रात्रभर जाग्या होत्या. त्यांचा खोकला काही केल्या थांबत नव्हता. गौरीने जवळच्याच डॉक्टरांना फोन केला. तात्काळ डॉक्टर तपासायला आले.
"गौरी... वत्सलाबाईंना लास्ट स्टेजचा कॅन्सर आहे. काही दिवसांपूर्वीच याची कल्पना मला आलेली. त्यांच्याजवळ थोडेच दिवस आहेत. काळजी घे त्यांची." डॉक्टर सांगून निघून गेले; पण गौरीच्या डोक्यावर आभाळ कोसळलं होतं. पोटच्या मुलांसारखं सांभाळणाऱ्या माई आपल्याला सोडून जाणार हा विचारही तिला करवत नव्हता. नियतीच्या पुढे काहीच चालत नाही. गौरीने ही गोष्ट मनातच दाबून ठेवली आणि होईल तितकं माईंना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न केला. याच कारणास्तव आजकाल गौरी धीरगंभीर आणि गप्प गप्प राहू लागली. एक दिवस माईंनी तिला जवळ बोलावलं.
"गौरी... बाळा आजकाल इतकी शांत का असतेस? काही झालंय का?" माईंनी काळजीने विचारलं.
"नाही माई तसं काही नाही. मुलांचा अभ्यास घ्यायचा असतो त्यात बऱ्याच जणांचं ॲडमिशन देखील घ्यायचं आहे. शिवाय मला पण काहीतरी करावं लागेल." गौरी नजर वळवत म्हणाली.
"माझ्या माघारी पण सांभाळशील ना व्यवस्थित?" माई असं म्हणताच गौरीने चमकून माईंकडे पाहिलं.
"असं काय बोलतेय माई? तुला काही होणार नाही. आम्ही काही होऊ देणार नाही." गौरीने माईंचा हात हातात घेतला.
"मला माहीत आहे गौरी... माझ्याकडे थोडेच दिवस आहेत. याआधीच मला याची कल्पना होती." आता मात्र गौरीचा हुंदका फुटला आणि ती माईंच्या गळ्यात पडून रडू लागली.
"रडू नको बाळ... एक न एक दिवस सगळ्यांना जायचंच असतं. उलट मी निश्चिंत आहे की माझ्या माघारी तू आहेस. तुझ्यावर माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे." माईंनी गौरीला छातीशी कवटाळत तिचे अश्रू पुसले.
दरवाजाच्या आड उभ्या राहिलेल्या मुला-मुलींच्या मुसूमुसू रडण्याचा आवाज हळुवार कानावर पडत होता. माईंनी सगळ्यांना हातानेच इशारा करून जवळ बोलावले तसे सगळे जण धावतच येऊन माईला बिलगले.
"ऐकलंत का मुलांनो... आजपासून गौरीच तुमची माई."
सगळ्यांचा भरून आलेला ऊर त्यावेळी माईंच्या कुशीत मनसोक्त रिकामा होत होता.
अगदी थोड्याच दिवसांत वत्सलाबाई स्वर्गवासी झाल्या. माघारी जन्मली ती नवीन माई... "गौरी!"
***
***
आज गौरी एका कार्यक्रमात भरभरून माईंबद्दल बोलत होती. अनेक अडचणींतून वाट काढत गौरीने मुलांना स्वतःच्या पायावर उभं केलं होतं. आज तिच्या मालकीची पाच अनाथआश्रमं अनेक सुखसोयींनी, आनंदाने चालत होती. कुणी वकील, कुणी इंजिनियर तर कुणी स्वतःचा स्वतंत्र बिजनेस उभारला होता. यामागची प्रेरणा म्हणजे गौरी... आज ती फक्तं अनाथांची माईच नव्हती तर ती एक प्रतिभावान, प्रामाणिक आणि कर्तबगार आय.पी.एस. अधिकारी देखील होती. सुखसोयींनी परिपूर्ण असूनही सतत तक्रार करणाऱ्या मुलांसाठी ती एक चपराक होती.
समाप्त!
©® प्रणाली निलेश चंदनशिवे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा