मैत्रबंध
मैत्रीची खरी सुरवात होते ते वय वर्ष आठ नऊ ते तेरा चौदा या कालावधी मध्येच.हे वय म्हणजे ना बालपण संपलेल असतं ना तरुण पण आलेलं असतं.
अगदीच स्वच्छंदी,आनंदी, स्वतःचे विश्वात रमणारे ,खट्याळ,खेळकर.या वयामध्ये च मैत्रीचे खरं बीज पेरले जाते.
शामली अन् सायली अशाच दोन मैत्रिणी .सकाळी सात वाजता शाळेच्या घंटे सोबत यांचा दिवस सुरू व्हायचा दुपारी बारा ला शाळा सुटल्या नंतर आख्खा दिवस मग यांचाच.कधी सायलीच्या घरी शामली तर कधी शामलीच्या घरी सायली येणे जाणे चालायचं.धमाल यायची ती सुट्टीच्या दिवसांमध्ये .
शामली चे घरी दिवाळी अन् सायलीच्या घरी ख्रिसमस साजरा व्हायचा. सायलीच्या घरचे ख्रिसमस स्पेशल डोनट शामलीचे फेवरेट होते.आणि शामलीच्या आईच्या
हातचे बेसन लाडू म्हणजे दिवाळीच्या फराळा मधली खासियत असायची.
हातचे बेसन लाडू म्हणजे दिवाळीच्या फराळा मधली खासियत असायची.
सायली साठी दिवाळी म्हणजे शामलीच्या आईने बनवलेले बेसन लाडू. बहुतेक वेळा शामली सुट्टी मध्ये तिच्या आजोळी जायची.पण जाण्याआधी किंवा जाऊन आल्यानंतर सायली साठी बेसन लाडू राखीव ठेवायची.
आता शामली अन् सायलीचे शालेय शिक्षण संपले होते ,सायली तर पुण्यातच कॉलेज करायची पण शामली तिच्या शिक्षणासाठी तिच्या आजोळी गेली होती.शामली दिवाळीच्या सुट्टीत पुण्यात आल्यावर सायलीला बेसन लाडू साठी घरी बोलवायची.का..??माहीत नाही पण शामली चे घरचे बेसन लाडू सायलीला भारीच खास वाटायचे.....कदाचित त्यात त्यांच्या मैत्रीचा गोडवा ,यामुळं असेल....ते वय तसे फार काही विचार करण्याचे नसतेच मुळात...त्यामुळं मैत्रीच्या फिलॉसॉफीचा विचारही केला जात नाही.
आताशा तारुण्याचे पदार्पण झाले होते. अभ्यास ही वाढत होता, आणि त्याच बरोबर जबाबदारीची जाणीव ही व्हायला सुरवात झाली होती.
दिवस भरभर पुढे जात होते.शिक्षणा नंतर जॉब साठी कुठे जावे लागेल हे निश्चित नव्हते.
कोणतीही मुलगी एक उत्तम स्त्री म्हणून प्रदर्शित होण्याचा एक पुरावा असाही असतो तो म्हणजे तिने स्वयंपाक घरात घेतलेला इंटरेस्ट...!!
त्यावर्षी ख्रिसमसला शामलीने सायलीच्या घरी डोनट बनवण्यासाठी तिच्या आईला मदत करण्याचे ठरवले होते.म्हणजे डोनटची रेसिपी आणि प्रत्यक्ष कृती करून बघायला मिळणार होती.
अशाच एका दिवाळी मध्ये ,शामली आली असताना सायलिने तिला,' तिच्या आईचे स्पेशल बेसन लाडू ची रेसिपी ' विचारली.
शामली अन् सायली दोघी शामलीच्या घरी आल्या,मग शामली ने लाडू बनवण्याचे प्रात्यक्षिक च करून दाखवले.
वां..!!काय मस्तच झाले होते लाडू.
'आता तुला जेव्हा कधी खावेसे वाटेल तेव्हा करून खात जा 'असं म्हणाली होती शामली.
आणि दिवाळी नंतर डिसेंबर मध्ये येतो ख्रिसमस.मग त्या वर्षी ख्रिसमसला शामलीने सायलीच्या घरी जाऊन तिचे आवडते डोनट बनवण्यासाठी शामलीच्या घरी तिच्या आईला मदत करण्याचे ठरवले होते.म्हणजे डोनट ची
रेसिपी आणि प्रत्यक्ष कृती करून झाली होती.
रेसिपी आणि प्रत्यक्ष कृती करून झाली होती.
म्हणता म्हणता दिवसां मागून दिवस गेले.....महिने गेले...आणि तीस वर्षेही गेली....
शामलीला प्रत्येक ख्रिसमसला सायलीच्या घरचे डोनट आणि ख्रिसमसचे डेकोरेशनची आठवण आल्याशिवाय रहात नाही.
आणि आजही सायली जेव्हा लाडू बनवते तेव्हा तेव्हा तिला शामलीची आठवण येते..
...कितीही हुबेहूब जसेच्या तसे बनवले तरी ,बालपणी खाल्लेल्या त्या लाडूंची चव येतच नाही,अशी रुख -रूख वाटते..... त्यात त्या अल्लड, निरागस, मैत्रीचा आस्वाद विसरता विसरत नाही.....!!
दर वर्षी दिवाळी येते.....अन् दर वर्षी ख्रिसमस ही येतो..दर वर्षी दिवाळीला लाडू करताना ...आणि ख्रिसमस ला डोनट करताना आठवण यायची...आजही येते.....अन् पुढेही येणारच.......!!
म्हणूनच असं म्हणतात की,माणसांपेक्षा त्यांच्या आठवणी जास्त प्रामाणिक असतात .कारण त्या तुम्हाला कधीच सोडून जात नाहीत...!!
©® Sush.
©® Sush.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा