Login

मैत्री :एक बंध भाग १० (अंतिम भाग)

मैत्रिणी ची काहणी
मैत्री : एक बंध
भाग १० ( अंतिम भाग )

मागच्या भागात आपण पाहिले की , सराव परीक्षा होऊन बोर्डाची परीक्षा चालू झालीय .

आता पुढे
नुकतीच बोर्डाची परीक्षा चालू झाली होती. वेगवेगळ्या वर्गात सगळ्यांचा नंबर लागला होता तसेच ही बोर्डाची परीक्षा असल्यामुळे कोणतीच दंगा मस्ती, कॉपी करायला वावच नव्हता. जवळ जवळ महिना भर परीक्षा चालू होती.

शेवटच्या पेपरच्या आदल्या दिवशी सगळ्या जणींचे अभ्यास सोडून उद्या काय करायचे ह्याचे नियोजन चालू होते ते पण फोनवर . शेवटी घराच्यांनी आवाज टाकल्यावर गप्पपणे अभ्यास केला.

दुसऱ्या दिवशी कितीही पुढचे नियोजन असले तरी पेपर व्यवस्थित सोडवला आणि मग वेळ संपल्यावरच बाहेर आल्या. ओरडून ओरडून आपला आनंद व्यक्त केला सगळ्यांनी . नंतर खूप वेळ सगळे मित्र मैत्रिणी गप्पा मारत बसले होते. साधारणतः चार वाजता एका कॅफेमध्ये गेले. तिथे बर्गर, कॉफी खात खात खूप फोटो काढले .

परीक्षा होती तेव्हा त्यांना अजिबात लवकर जाग येत नव्हती पण दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता उठून सायकल घेउन गावातील डोंगरावर आणि नदीकडे फिरायला.

संध्याकाळी ग्राऊंडवर बॅडमिंटन गप्पा अन् दिवसभर झोपा काढणं हाचं काय तो उद्योग . यात त्यांनी आठ दिवस घालवले.

एका रविवारी त्यांनी सगळ्यांनी सायकलवर शिवनेरी गडावर जायचे ठरवले होते त्याप्रमाणे सकाळी सात वाजता गावाच्या वेशीवर सगळ्या जमल्या. बरोबर ७. १५ ला निघाल्या.

रस्त्याच्या एकाबाजूने एकमेकांची काळजी घेत तेर कधी रेस लावत चालल्या होत्या. तेवढ्यात दमल्या म्हणून एका झाडाखाली थांबल्या. त्या झाडाला खूप पारंब्या होत्या. त्याच्याबरोबर झोका खेळल्या थोडावेळ. येणारे जाणारे त्यांच्याकडून बघून हासतं होते .

तर एक आजी येऊन त्यांना म्हणाल्या ," व्वा गं व्वा! मुलींनो असे छान झोके घेत आहात ते बघून खूप छान वाटलं आता असं काही बघायला मिळतं नाही पण तुम्ही त्याचा आनंद घेताय. हे छान केलतं. मला आमचं वेळचं लहानपण आठवलं. खेळा गं खेळा मन भरे पर्यंत खेळा. जाते मी. "

सगळ्या त्यांच्याकडे बघून हसल्या अन् माना हालवून आम्ही खेळतो असे सांगितले.

तेवढ्यात स्वराली म्हणाली," कोणाच्या ओळखीच्या आहेत गं आजी?" सगळ्यांनी नाही अश्या माना हलवल्या.

भक्ती म्हणाली, " पण त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून छान वाटले."

रेवती म्हणाली, " चला निघूया. "

असचं थांबत चालत साधारणतः ९ वाजता गडाच्या पायथ्याशी पोचल्या. तिथे थोडा नाष्टा करून गड चढायला सुरवात केली. गडावर जाऊन थोडी मस्ती केली. तिथे खूप मोकळं असल्याकारणाने शिवणापाणीचा खेळ रंगला. जेव्हा खेळून दमल्यावर भुकेची जाणीव झाली. म्हणून घरून आणलेला डबा खालला.

फोटो काढणं हे शास्त्र असल्याप्रमाणे भरपूर फोटो काढून त्या परतीच्या प्रवासाला निघाल्या.

एका दिवसाच्या ट्रीपची मज्जा घेत संध्याकाळी ६ वाजता घरी पोहचल्या. आल्यावर इतक्या दमली होत्या की लगेच झोपून गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी १० पर्यंत उठल्याच नाही.

नंतर महिन्याभरांनी सगळ्याजणी घरचांच्या बरोबर कुठे ना कुठे फिरायला गेल्या. पण एकमेकींशी संपर्क कायम होताच .
फिरणे, नातेवाईंकांकडे जाणे, चित्रपट पाहणे याबरोबरच आई वडिलांना शेतीत मदत करणे असे उद्योग अख्ख्या सुट्टीभर चालू होते.

म्हणता म्हणता एक दुड महिना उलटला आणि निकालाची तारीख जाहीर झाली .तेव्हा सगळ्यांच्या मनांत धाकधुक व्हायला लागली. सगळे जुने दिवस आठवले. आपल्याला जरं खरचं मार्क नाही पडले ना तर आपण दिलेली टशन आपल्या वरचं उलटायची. असं सारखं मनात यायला लागलं. एकमेकांच्या फोनाफोनीतून सोमवारी बॅडमिंटन खेळायच्या तिथे भेटायचे ठरले.

जो येईल तो त्यांना निकालाची आठवण करून देत. त्यामुळे वैतागून आणि टेन्शन पायी चिडचिड व्हायला लागली.

सोमवारी सगळ्याजणी भेटल्या. आधी थोड्यावेळ बॅडमिंटन खेळल्या पण त्यात त्यांचे मनचं लागेना. शेवटी कंटाळून गप्पा मारत बसल्या.

एकमेकांशी झालेली ओळख हळूहळू सुरू झालेला मैत्रीचा प्रवास एकमेकींचे रुसवे फुगवे थोडीशी भांडण थोडीशी मस्ती मुलांना दिलेली टशन शाळेत झालेल्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन घातलेला गोंधळ लहान मुलांना दिलेला त्रास ह्या आणि अशा अनेक गोष्टींवर गप्पा मारत बसल्या. गप्पा मारता मारता शेवटी आठवला तो परीक्षेचा काळ पेपर मध्ये कायं चुका झाल्या कुठे मार्क जातील याच्यावर चर्चा रंगत गेली.
शेवटी मार्कांचे टेन्शन घेत सगळ्याजणी आपापल्या घरी निघून गेल्या.

उजाडला तो निकालाचा दिवस आणि दुपारी साधारणतः एक वाजता सगळ्यांना आपला रिझल्ट कळला. सह्याद्री आणि रेवतीने ठरवल्याप्रमाणे संस्कृत मध्ये १०० पैकी शंभर मार्क मिळवून शाळेत दिलेला शब्द त्यांनी पूर्ण केला.

बाकी जणींनी ९० टक्क्याच्या वर गुण मिळवले. त्यामुळे सगळे खुश. एकमेकींना प्रेमपूर्वक मिठी मारून 'हुप्पा हुर्रे! ' ओरडून एकच गलका केला.

पुढच्या शिक्षणासाठी कोणी कुठेही गेलो तरी कायम एकत्र राहण्याचे वचन घेतं सगळ्यांनी आपापल्या नवीन वाटा धरल्या.

या नवीन वाटेवर त्यांना यश प्राप्त होवो. ही सदिच्छा.

समाप्त
©®सौ. चित्रा अ. महाराव

🎭 Series Post

View all