चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद लेखन
शीर्षक -
मैत्री-एक मखमली धागा भाग १
जलद लेखन
शीर्षक -
मैत्री-एक मखमली धागा भाग १
आज वसुधा खूप खूश होती. त्याला कारणही तसंच होतं. तिला तिच्या कॉलेजच्या वर्ग मैत्रिणी भेटणार होत्या. आजवर ऑनलाईन भेटणाऱ्या मैत्रिणींनी ऑफलाइन एकत्र यायचं ठरवलं होतं. त्यासाठी त्यातल्याच एका मैत्रिणीकडे सर्व जमणार होतो. एकमेकींना एवढ्या वर्षानंतर भेटण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
चुलबुली सरिता, प्रेमळ व नम्र स्वभावाची माधुरी, स्पष्टवक्ती सीमा, सतत चेहऱ्यावर बारा वाजलेले असणारी रितू अशा आम्ही सर्व मैत्रिणी एकमेकींना भेटणार. खूप मजा येईल. शेवटी आम्ही सर्व मैत्रिणींनी माधुरीच्या शेतावरच्या बंगल्यात एकत्र जमण्याचे ठरविले. त्यानुसार सर्वजणी एकत्र आलो. अगदी आनंदाचा परमोच्च क्षण होता तो. एकमेकींना आलिंगन देत आम्ही आनंदाश्रूंना जागा करून दिली.
गेल्या गेल्याच "चला गं जेवायला. स्वयंपाक तयार आहे." माधुरीने आवाज दिला.
" हो, हो चला. खूप भूक लागली आहे. चला जेवूया."
जेवणाचा अस्सल गावरान बेत असल्यामुळे सर्वांनी यथेच्छ ताव मारला. आराम झाला आणि आम्ही सर्व मैत्रिणी निवांत गप्पा मारत बसलो. प्रत्येक जण आपापल्या लग्न झाल्यापासूनच्या आठवणी अगदी मोकळेपणाने सांगत होत्या.
अगं ग्रॅज्युएट झाल्यावर मी बी.एड. केलं आणि नुकतीच एका शाळेत रुजू झाले होते. त्याच वर्षी माझं लग्न झालं. स्पष्टवक्ती म्हणून ओळख असणारी सीमा सांगू लागली.
मी जरा स्पष्टवक्ती आहे हे तुम्हाला माहीतच आहे. माझ्या लग्नात माझा नवरा लग्नात गोफ पाहिजे म्हणून मारुती वर रुसून बसला होता. माझ्या आई-बाबांना तर घामच फुटला. कारण तसे काही ठरले नव्हते. माझ्या आई बाबांची तेवढी परिस्थितीही नव्हती. शेवटी मी तिथे गेले. त्यावेळी नवरदेव नवरी लग्नात आजच्यासारखे लग्नाच्या आधी तर नाहीच पण लग्नातही एकमेकांशी बोलत नव्हते. पण मी माझा हिसका दाखवलाच. त्यांना सांगितले, गोफ वगैरे मिळणार नाही. तुम्ही जसे आले तसे परत जा. "नवरदेवाकडील मंडळी पाहतच राहिली, पण त्यामुळे माझ्या नवऱ्याने पुढे गोफाचे नावच काढले नाही. मला सुरुवातीला त्यामुळे थोडा त्रासही झाला. पण पुढे जाऊन सारे व्यवस्थित झाले."
"अगं बाई ग्रेटच गं तू." अत्यंत प्रेमळ व नम्र स्वभावाची माधुरी म्हणाली.
"आता मी सांगते. "माधुरीने बोलायला सुरुवात केली.
"मला एका मोठ्या संयुक्त कुटुंबात देण्यात आले. आमचे हे सर्वात मोठे. तीन लहान भाऊ व एक बहीण.माझे सासू-सासरे अत्यंत समजूतदार, देव माणसं. माझे पती शेती पाहायचे. आई-वडिलांकडे आमचे चौकोनी कुटुंब. त्यामुळे आम्ही दोघे बहीण भाऊ अत्यंत लाडाकौतुकात वाढलेले होतो. त्यातही भाऊ मोठा व मी लहान. लग्न झाल्यावर मात्र मी सर्वात मोठी होते."
पुढील भाग अवश्य वाचा.
क्रमशः
सौ. रेखा देशमुख
क्रमशः
सौ. रेखा देशमुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा