चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद लेखन
शीर्षक -
मैत्री- एक मखमली धागा
भाग ३
जलद लेखन
शीर्षक -
मैत्री- एक मखमली धागा
भाग ३
माझ्या नणंदेच्या खट्याळ स्वभावामुळे म्हटलं तरी चालेल. पण माझ्या चेहऱ्यावर हसू दिसायला लागलं. आज ताई लग्न होऊन सासरी गेल्या. पण त्यांनीच मला हसायला शिकवले. असं मी म्हणेन.
"छानच गं रडूबाई.नाही रितू ,आता तुला मी रडूबाई म्हणणार नाही. "
"अरे वसुधा, तू काय म्हणतेस? तुझे ही काही अनुभव सांग ना, अगं इतक्या वर्षांनी भेटतोय आपण." रितू म्हणाली.
"हो हो, वसुधा सांग ना." सर्वांनी एकदम री ओढली.
"अगं ग्रॅज्युएशन झाल्याबरोबर आपण सर्व विखुरलो गेलो. तेव्हा संपर्काची फारशी साधने नव्हती. त्यामुळे आपली भेट तर सोडाच पण साधे बोलणेही होत नव्हते. आज खरंच आपण सर्व भेटलो. खूप छान वाटलं गं.
माझे वडील शेतकरी. त्यामुळे आमचे राहणे खेड्यावर. शिक्षणासाठी जवळच्या शहरात बसने जाणे- येणे केले. ग्रॅज्युएट झाल्यानंतर गावातीलच एका शाळेत मुख्याध्यापकांच्या संमतीनुसार नोकरी सुरू केली. पुढे त्या शाळेकडून माझा बी.एड. साठी नंबर लागला. नंतर मी परमनंट झाले.
माझे वडील शेतकरी. त्यामुळे आमचे राहणे खेड्यावर. शिक्षणासाठी जवळच्या शहरात बसने जाणे- येणे केले. ग्रॅज्युएट झाल्यानंतर गावातीलच एका शाळेत मुख्याध्यापकांच्या संमतीनुसार नोकरी सुरू केली. पुढे त्या शाळेकडून माझा बी.एड. साठी नंबर लागला. नंतर मी परमनंट झाले.
माझ्या वडिलांनी माझे लग्न ठरवले. मी माझ्या बाबांना सांगितले, बाबा मला माझ्या होणाऱ्या नवऱ्या मुलाशी बोलायचे आहे. आई तर नकोच म्हणाली, पण बाबांनी खूप विचार करून परवानगी दिली. माझा नवरा एका बँकेत नोकरी करत होता. मी त्यांना माझ्या घरच्या परिस्थितीची संपूर्ण कल्पना दिली. माझ्या वडिलांनी आहे त्या परिस्थितीत मुलांना शिकवले. मला एक लहान भाऊ व एक बहीण आहे. म्हणून मी माझ्या नोकरीमध्ये दर महिन्याला मिळणाऱ्या मिळकतीचा काही वाटा माझ्या माहेरी देईल. माझ्या मते मुलगा व मुलगी समान आहेत. तुम्हाला पटत असेल तर हो म्हणा.माझ्या नवराही यासाठी तयार झाला."
तो म्हणाला की,"मला काही प्रॉब्लेम नाही. तू तुझे पैसे खर्च करू शकतेस. मी माझे. यात दुमत नाही आणि या अटीवर माझे लग्न झाले. मी माझ्या बहीण भावाचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या लग्नासाठी खर्च केला .आज ते दोघेही चांगल्या नोकरीवर आहेत. यासाठी आजही मी माझ्या नवऱ्याचे आभार मानते."
"आज आपण सर्व जबाबदारीतून मुक्त झालो आहोत. आता प्रत्येकीचे काही ना काही काम छंद सुरू असेलच." सरिता म्हणाली.
"आमचे तर सारखे या मुलाकडे दोन महिने, त्या मुलाकडे दोन-चार महिने असे सुरू असते." माधुरी म्हणाली.
"पण एक सांगू कां? आपण त्यावेळी कॉलेजमध्ये स्टेज गाजवत होतो. कुणी भाषण, कुणी कविता, म्हणजेच कुणामध्ये वक्तृत्व गुण होता तर कुणामध्ये लेखन कला. कुणाला गायन कला अवगत होती."
पुढील भाग अवश्य वाचा
क्रमशः
सौ.रेखा देशमुख
क्रमशः
सौ.रेखा देशमुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा