Login

मैत्री - एक मखमली धागा भाग ४

मैत्री- एक मखमली धागा भाग ४
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025
जलद लेखन
शीर्षक -
मैत्री- एक मखमली धागा
भाग ४(अंतिम)

"आज आपण सर्वजणी घरबसल्या लेखन तर निश्चितच करू शकतो. लेखणी एक प्रभावी अस्त्रच आहे. आपल्याला एवढ्या वर्षाचा अनुभव आहे. अनेक उन्हाळे, पावसाळे तसेच समाजातील स्थित्यंतरे आपण अनुभवली आहेत. हेच लेखणीतून आपल्याला समाजापुढे मांडायचे आहे. आपल्या अनुभवातील अनेक समस्या, अनेक ज्वलंत प्रश्न आपण लेखणी द्वारे हाताळू शकतो."

जसे की सीमाला आलेला अनुभव. आजही समाजात हुंड्याचा ज्वलंत प्रश्न आहे. फक्त त्याचे स्वरूप बदलले.
"आम्ही वर्गणी घेत नाही. दानपेटीत टाका."  यासारखे सुरू आहे. एवढं सोनं मुलीच्या अंगावर घाला. आम्हाला हुंडा नको. म्हणजे सोन्याची खाण काय घरच्या शेतीत आहे का? अलिकडे हे असंच चालू आहे.

"आपण आपल्या लिखाणातून त्यावर प्रकाश टाकू शकतो. समाज प्रबोधन करू शकतो." वसुधा म्हणाली.

" अरे हे तर आमच्या लक्षातच आले नाही. ठीक आहे. 'शुभस्य शीघ्रम'. आजचं ईरा ॲप डाऊनलोड करून देते, मी तुम्हा सर्वांना. खूप चांगले व्यासपीठ आहे हे. या व्यासपीठावर अनेक उपक्रम, स्पर्धा नेहमी सुरू असतात. खूप शिकायला मिळतं गं येथे. मी तर केव्हाच सुरुवात केली आहे ईरावर लिहायला."

सर्वांनी होकार भरला.

वसुधाने सर्वांना ईरा ॲप डाऊनलोड करून दिले. ईरा व्यासपीठाची माहिती दिली आणि सर्वांना सांगितले की, काही अडचण आली तर मला विचारा. मी केव्हाही तुम्हाला मदत करीन. स्मार्टफोन प्रत्येकी जवळ आहेतच.

"अगं माधुरी, तुझ्याजवळून तर खूप काही शिकण्यासारख आहे. तू विनम्र स्वभावाची मुलगी. आज आपण समाजात पाहतो. मुली स्वतःच म्हणतात, मला सासू-सासरे जवळ राहिलेले आवडणार नाही. मला मोठे कुटुंब नको. मग आई वडिलांनी कुठे जायचं? त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या बहीण भावांनी काय करायचं? ज्या आई-वडिलांनी मुलांना लहानाचे मोठे केले. त्यांच्यावर आज वाईट वेळ आलेली आहे. यावर तू बरच काही लिहू शकतेस. एकत्र कुटुंबाची महती पटवून  देऊ शकतेस."

"सरिता, तू संशय किती जीवघेणा ठरू शकतो यावर बरंच काही लिहू शकते."

" रितू, तू आनंदी कसा राहायचं, सकारात्मक विचार ठेवून स्वतःला आनंदी कसं बनवायचं व दुसऱ्यालाही आनंद कसा द्यायचा यावर लिहू शकते."

मी म्हणजे वसुधा, मुलगा- मुलगी समान आहे आपल्या मिळकतींना वाटा आपल्या माहेरी द्यायलाच पाहिजे तसे करण्यास तिच्या सासरच्यांनीही संमती दिली पाहिजे.
खरंच या सर्व गोष्टींमुळे समाज प्रबोधन होऊ शकतं.
आज हे सर्व ज्वलंत प्रश्न आहेत. आपल्या लेखणीतून निश्चितच आपण त्या प्रश्नांना वाचा फोडू शकतो.

" अरे बघता बघता किती वेळ होऊन गेला कळलेच नाही, पण आज आपली सर्वांची कितीतरी वर्षांनी भेट झाली. आज जीवनातला हा सर्वात आनंदाचा क्षण आहे." सीमा म्हणाली.

सर्वांनी मिळून तिला दुजोरा दिला. पुन्हा असेच भेटत राहू म्हणत सर्वांनी एकमेकींचा निरोप घेतला.

समाप्त
सौ. रेखा देशमुख
0

🎭 Series Post

View all