Login

मैत्री नात्यापलीकडची.. अंतिम भाग

कथा जीवाला जीव लावणाऱ्या मैत्रिणींची


मैत्री नात्यापलीकडची... भाग ३


अशा रीतीने स्पृहाचे बाळ शमाकडे लागले. त्याचे नाव शमाच्या आग्रहाने स्पृहाने श्रीरंग ठेवले. त्याला बघितले की प्रतीकचा जीव वरखाली व्हायचा. फक्त स्पृहामुळे तो गप्प बसला होता. ते बघून स्पृहाने लगेचच दुसरे बाळ होऊ देण्याचा निर्णय घेतला. यावेळेस तिच्याकडे एक छानशी परी आली. तिला बघून शमाला खूपच आनंद झाला.
" मी ना आज खूप खुश आहे स्पृहा. तुझ्यामुळे आमच्या श्रीरंगदादाला एक बाहुली मिळाली." शमा बोलत होती.. श्रीरंगदादा हा शब्द ऐकून स्पृहाने श्रीरंगच्या गालावरून हात फिरवला. तिच्या डोळ्यातून अश्रू घरंगळले.
दोन्ही मुले मोठी होत होती. शमा कटाक्षाने श्रीरंगला परीला बहिण म्हणून वागवायला लावायची. श्रीरंग पुढील शिक्षणासाठी परदेशी जाणार होता. शमाने स्पृहा, प्रतीक आणि परीला घरी बोलावले होते.
शमाने बोलायला सुरुवात केली.
" आज माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. आज आपला लेक परदेशी चालला आहे." स्पृहाचा हात हातात घेत शमा बोलली..
" हो मला ही गोष्ट माहीत आहे. स्पृहा तू श्रीरंगचे डोळे कधी पाहिलेस? ते अगदी तुझ्यासारखेच आहेत. ते बघून मला संशय आला होता. खोदून विचारल्यावर समीरने खरे ते सांगितले. मी श्रीरंग तुला परत देणार होते. पण मोह सुटला नाही ग. विचार केला देवाने नाही दिले बाळ. पण मैत्रिणीने तर दिले. त्याचा अपमान करायचा नव्हता. थोडा मोठा झाल्यावर आम्ही ही गोष्ट श्रीरंगलाही सांगितली. तो ही तुझाच मुलगा त्याने आजवर त्याचा परत उल्लेख नाही केला. तुला खरं सांगू स्पृहा मैत्रीच्या पलीकडे जाऊन तुम्ही सगळ्यांनी जे केले आहे ना त्याला तोड नाही.. मैत्री कशी असावी याचे उदाहरण आहेस तू. हे ऋण फेडले तर जाणार नाहीच. आज असे वाटले खूप झाले ही लपवाछपवी. मैत्रीत धन्यवाद म्हणत नाहीच.. पण कृतज्ञता नक्कीच व्यक्त करू शकते ना?" स्पृहाच्या डोळ्यातील अश्रूच तिचे भाव सांगत होते..
0

🎭 Series Post

View all