मैत्री... भाग - २
अनयाच्या घरात त्या दिवशी वेगळंच वातावरण होतं. दाराच्या बाहेर वारा जोरात वाहत होता, पण घराच्या आत शांततेपेक्षा ताण जास्त होता. बाबा चुलीपाशी बसून काहीच न बोलता कागद पाहत होते. आईच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती.
अनया शांतपणे उभी होती. तिच्या हातात शाळेचे कागद होते, गुणपत्रक, स्कॉलरशिपची माहिती, आणि मुख्याध्यापकांनी लिहून दिलेलं एक पत्र. “बाबा…” अनयानं हळूच सुरुवात केली. बाबांनी वर पाहिलं. “काय आहे?” आवाजात थकवा होता, राग नव्हता. “मला पुढे अकरावीला प्रवेश घ्यायचाय, सायन्सला.”
क्षणभर शांतता पसरली. आईनं काळजीतून विचारलं,
“पण घरचं काय? तुझ्या लहान भावाची शाळा, खर्च…?”
अनयानं खोल श्वास घेतला. “आई, स्कॉलरशिप मिळू शकते. शाळेचे सर म्हणाले आहेत.” बाबांच्या कपाळावर आठी पडली. “शिकून काय करणार आहेस? नोकऱ्या कुठे मिळतात आजकाल?”
“पण घरचं काय? तुझ्या लहान भावाची शाळा, खर्च…?”
अनयानं खोल श्वास घेतला. “आई, स्कॉलरशिप मिळू शकते. शाळेचे सर म्हणाले आहेत.” बाबांच्या कपाळावर आठी पडली. “शिकून काय करणार आहेस? नोकऱ्या कुठे मिळतात आजकाल?”
तो प्रश्न अनयाच्या मनात आधीच अनेकदा घोळत होता. पण आज तिनं पहिल्यांदाच ठामपणे उत्तर दिलं. “मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, बाबा.” तो आवाज थरथरत होता, पण त्यात भीतीपेक्षा निर्णय जास्त होता.
बाब उठले. “पुरुषांनाही आजकाल नोकरीसाठी संघर्ष करावा लागतो. तू मुलगी आहेस, उद्या लग्न होईल, घर सांभाळावं लागेल.” हे शब्द अनयाला नवीन नव्हते, पण आज ते जास्त बोचरे वाटले.
बाब उठले. “पुरुषांनाही आजकाल नोकरीसाठी संघर्ष करावा लागतो. तू मुलगी आहेस, उद्या लग्न होईल, घर सांभाळावं लागेल.” हे शब्द अनयाला नवीन नव्हते, पण आज ते जास्त बोचरे वाटले.
ती काही न बोलता आतल्या खोलीत गेली. त्या रात्री अनया उशीखाली पुस्तक ठेवून झोपली. झोप येत नव्हती. मनात प्रश्नांचा गोंधळ होता, स्वप्न पाहणं चूक आहे का?
मी फार जास्त अपेक्षा तर नाही करत?
मी फार जास्त अपेक्षा तर नाही करत?
दुसरीकडे, मीराच्या घरी वातावरण वेगळं होतं. मोठं घर, प्रशस्त खोली, पण मीराच्या मनात अस्वस्थता होती.
“मीरा, उद्या शहरात क्लास पाहायला जाऊया,” आई म्हणाली. “तुला चांगल्या कॉलेजमध्ये टाकायचं आहे.”
मीरा थांबली. “आई… मला एक गोष्ट सांगायची आहे.”
आईनं तिच्याकडे पाहिलं. “काय?”
“मीरा, उद्या शहरात क्लास पाहायला जाऊया,” आई म्हणाली. “तुला चांगल्या कॉलेजमध्ये टाकायचं आहे.”
मीरा थांबली. “आई… मला एक गोष्ट सांगायची आहे.”
आईनं तिच्याकडे पाहिलं. “काय?”
“अनयाला पुढे शिकायचं आहे, पण तिच्या घरचे तयार नाही.” आई शांत झाली. “मग?” “मला तिच्यासाठी काहीतरी करायचं आहे.” आईनं हलकं हसत उत्तर दिलं,
“तू खूप भावनिक आहेस. सगळ्यांच्या आयुष्याची जबाबदारी आपण घेऊ शकत नाही.” मीरा पहिल्यांदाच आई-वडिलांच्या मताशी सहमत नव्हती. “पण आई, आपण मदत करू शकतो ना?”
“तू खूप भावनिक आहेस. सगळ्यांच्या आयुष्याची जबाबदारी आपण घेऊ शकत नाही.” मीरा पहिल्यांदाच आई-वडिलांच्या मताशी सहमत नव्हती. “पण आई, आपण मदत करू शकतो ना?”
त्या रात्री मीरा वडिलांच्या खोलीत गेली. “बाबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे.” सरपंच असलेले वडील खुर्चीत बसले होते. “बोल.” मीरा थेट मुद्द्यावर आली.
“गावात हुशार मुलींना पुढे शिकण्यासाठी मदत करणारी योजना का नाही?” वडील आश्चर्यचकित झाले. “हे अचानक कसं?” “कारण मी एका मुलीचं स्वप्न मोडताना पाहतेय,” मीरा म्हणाली.
“गावात हुशार मुलींना पुढे शिकण्यासाठी मदत करणारी योजना का नाही?” वडील आश्चर्यचकित झाले. “हे अचानक कसं?” “कारण मी एका मुलीचं स्वप्न मोडताना पाहतेय,” मीरा म्हणाली.
वडील गंभीर झाले. “राजकारण, निधी, लोकांची मतं… सगळं सोपं नसतं.” “पण सुरुवात तरी केली पाहिजे,” मीरा ठाम होती. तो क्षण मीराच्या आयुष्यात महत्त्वाचा होता. पहिल्यांदाच तिनं केवळ ऐकणं नाही, तर प्रश्न विचारणं सुरू केलं होतं.
दोन दिवसांनी शाळेत अनया आणि मीरा भेटल्या. अनयाचा चेहरा उतरलेला होता. “काय झालं?” मीरानं विचारलं. “बाबा अजूनही तयार नाहीत,” अनया म्हणाली.
“मला वाटतं, इथेच थांबावं लागेल.” मीरा लगेच म्हणाली,
“नाही. अजून पर्याय आहेत.” “मीरा, सगळ्यांकडे तुझ्यासारखी साथ नसते.” मीरा तिचा हात पकडून म्हणाली, “मग आजपासून तू एकटी नाहीस.”
“मला वाटतं, इथेच थांबावं लागेल.” मीरा लगेच म्हणाली,
“नाही. अजून पर्याय आहेत.” “मीरा, सगळ्यांकडे तुझ्यासारखी साथ नसते.” मीरा तिचा हात पकडून म्हणाली, “मग आजपासून तू एकटी नाहीस.”
त्या दिवशी दोघी मुख्याध्यापकांकडे गेल्या. सरांनी गावातल्या एका स्वयंसेवी संस्थेबद्दल सांगितलं, जी गरजू मुलींच्या शिक्षणासाठी मदत करत होती. “पण घरच्यांची परवानगी लागेल,” सर म्हणाले. हा शब्द पुन्हा समोर उभा राहिला, परवानगी. त्या संध्याकाळी मीरा थेट अनयाच्या घरी गेली.
पहिल्यांदाच दोन वेगळ्या जगांचा प्रत्यक्ष सामना झाला.
अनयाचे बाबा थोडे संकोचले. “मीरा, तू मोठ्या घरची मुलगी आहेस. तुला आमचं काय कळणार?” मीरा शांतपणे म्हणाली, “कळत नाही म्हणूनच शिकायला हवं आहे.” ती पुढे म्हणाली, “अनया फक्त स्वतःसाठी नाही, तुमच्यासाठीही काहीतरी करू शकते.” आईनं हळूच विचारलं, “पण उद्या लोक काय म्हणतील?” मीरा उत्तरली, “आज लोक काय म्हणतात, त्यावर आपण जगलो, तर उद्या आपण काय बनलो असू?”

घरात शांतता पसरली. बाबांनी काही वेळाने खोल श्वास घेतला. “ती शिकली, तर आम्हाला फायदा होईल याची खात्री आहे का?” अनयाच्या डोळ्यांत पाणी आलं. “बाबा, मी प्रयत्न करीन. हार मानणार नाही.”
तो क्षण निर्णायक होता. त्या रात्री बाबांनी झोपण्याआधी आईला म्हटलं, “आपण तिला एक संधी देऊया.” आईनं काही न बोलता मान हलवली.
दुसऱ्या दिवशी अनया शाळेत धावत आली. “मीरा! बाबा तयार झाले!” मीराने आनंदाने तिला मिठी मारली. पण आनंदासोबतच नवीन भीतीही आली. कारण आता संघर्ष फक्त घरापुरता नव्हता, तो समाजाशी, व्यवस्थेशी आणि स्वतःशीही होता.
त्या संध्याकाळी वडाच्या झाडाखाली बसून मीरा म्हणाली,
“आपण दोघी बदलत आहोत, अनया.” अनया हसत म्हणाली, “आणि बदल सोपा नसतो.” आकाशात ढग जमू लागले होते. वादळ येणार होतं आणि कधी कधी, वादळच माणसाची खरी ताकद दाखवून देतं.
“आपण दोघी बदलत आहोत, अनया.” अनया हसत म्हणाली, “आणि बदल सोपा नसतो.” आकाशात ढग जमू लागले होते. वादळ येणार होतं आणि कधी कधी, वादळच माणसाची खरी ताकद दाखवून देतं.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा