मैत्रीचा ओलावा
भाग १
भाग १
" सुयश, तुझा लॅपटॉप बॅगेत ठेवलाय, राघवचा डबा वॉटर बॉटलसह त्याच्या सॅकमध्ये आहे आणि नेहा... तुझा तो महत्त्वाचा प्रेझेंटेशनचा पेन ड्राईव्ह तुझ्या पर्सच्या वरच्या कप्प्यात ठेवलाय बरं का ! " शुभांगी काकूंनी स्वयंपाकघरातून बाहेर येत एका दमात सर्व सूचना दिल्या.
घरात सकाळची एकच लगबग उडाली होती. सुयश घड्याळाकडे पाहत घाईघाईत आपल्या बुटांची लेस बांधत होता, तर नेहा आरशासमोर उभं राहून आपले केस सावरत फोनवर कोणाशी तरी 'डेडलईन्स'बद्दल बोलत होती.
" थँक्स आई ! तुम्ही आहात म्हणून आमचं सगळं वेळेवर होतं, नाहीतर आमची रोजच फजिती झाली असती. "
सुयशने धावता धावता आईच्या खांद्यावर हात ठेवला आणि कपाळावर घाम पुसत बाहेर पडला. नेहानेही एक स्मित हास्य दिल आणि ती ही आपल्या कामाच्या विश्वात निघून गेली.
घराचा मुख्य दरवाजा जोरात बंद झाला आणि त्या क्षणी 'स्नेहबंध' या टोलेजंग बंगल्यात एक प्रचंड शांतता पसरली. शुभांगी काकू त्याच जागी उभ्या राहिल्या. पहाटे पाच वाजल्यापासून त्यांचं शरीर एका यंत्रासारखं धावत होतं.कधी गरम चहा, कधी मऊ पोळ्या, तर कधी राघवचा हट्ट पुरवण्यात.
पण आता, जेव्हा घराचा उंबरठा ओलांडून सर्वजण आपापल्या जगात निघून गेले होते, तेव्हा त्यांच्याकडे स्वतःचं असं काहीच उरलं नव्हतं.
शुभांगी काकूंचा दिवस तसा खूप 'आरामदायी' होता. सुयश एका मल्टिनॅशनल कंपनीत उच्च पदावर होता, तर नेहा स्वतः एक डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट होती. त्यांनी आपल्या आईसाठी घरात सर्व काही आणलं होतं.रिमोटने चालणारे पडदे, हाय-डेफिनिशन स्मार्ट टीव्ही, व्हॅक्युम क्लीनर आणि मदतीसाठी दोन घरकामगार मावशी.
शुभांगी काकूंचा दिवस तसा खूप 'आरामदायी' होता. सुयश एका मल्टिनॅशनल कंपनीत उच्च पदावर होता, तर नेहा स्वतः एक डिजिटल मार्केटिंग एक्सपर्ट होती. त्यांनी आपल्या आईसाठी घरात सर्व काही आणलं होतं.रिमोटने चालणारे पडदे, हाय-डेफिनिशन स्मार्ट टीव्ही, व्हॅक्युम क्लीनर आणि मदतीसाठी दोन घरकामगार मावशी.
सुयशला मनापासून वाटायचं की त्याने आईला जगातील सर्व सुखं दिली आहेत. तो अभिमानाने आपल्या मित्रांना सांगायचा,
"माझ्या आईला आता वयाच्या साठाव्या वर्षी काहीही काम करण्याची गरज नाही, ती एकदम आरामात असते ! "
पण सुयशला हे कधीच कळलं नाही की, आराम आणि आनंद यात खूप मोठी दरी असते.
शुभांगी काकू बाल्कनीतल्या आपल्या लाडक्या आरामखुर्चीत येऊन बसल्या. समोरच्या रस्त्यावर गाड्यांची ये-जा सुरू होती. प्रत्येक गाडीत बसलेला माणूस कुठे ना कुठे तरी पोहोचण्याच्या घाईत होता. कोणाला तरी भेटायचं होतं, कोणाशी तरी बोलायचं होतं. काकूंनी एक दीर्घ निश्वास सोडला. त्यांच्या समोरचा स्मार्ट टीव्ही त्यांना पाचशे चॅनेल्स दाखवत होता, पण त्या पाचशे चॅनेल्समध्ये त्यांच्या मनातल्या एकाकीपणावर बोलायला कोणीच नव्हतं.
शुभांगी काकू बाल्कनीतल्या आपल्या लाडक्या आरामखुर्चीत येऊन बसल्या. समोरच्या रस्त्यावर गाड्यांची ये-जा सुरू होती. प्रत्येक गाडीत बसलेला माणूस कुठे ना कुठे तरी पोहोचण्याच्या घाईत होता. कोणाला तरी भेटायचं होतं, कोणाशी तरी बोलायचं होतं. काकूंनी एक दीर्घ निश्वास सोडला. त्यांच्या समोरचा स्मार्ट टीव्ही त्यांना पाचशे चॅनेल्स दाखवत होता, पण त्या पाचशे चॅनेल्समध्ये त्यांच्या मनातल्या एकाकीपणावर बोलायला कोणीच नव्हतं.
त्यांना आठवलं, काही वर्षांपूर्वी जेव्हा सुयश लहान होता, तेव्हा घर छोटं होतं, सोयी कमी होत्या, पण घरात दिवसभर किलबिलाट असायचा. शेजारच्या काकू यायच्या, गप्पा रंगायच्या, कुणाकडून तरी भाजी निवडायला मदत मिळायची. आता मात्र सगळं कसं स्मार्ट झालं होतं. सोशलाईजिंग म्हणजे आता व्हॉट्सॲपचे 'गुड मॉर्निंग' मेसेजेस झाले होते, जे काकूंच्या फोनवर दररोज शेकडोंनी यायचे; पण त्यातील एकही मेसेज त्यांची वैयक्तिक चौकशी करणारा नसायचा.
दुपारचे दोन वाजले. घरात फक्त घड्याळाची 'टिक-टिक' ऐकू येत होती. काकूंनी जेवणाचं ताट घेतलं, पण एकटं जेवताना अन्नाला चवच लागत नव्हती.
"आई, नीट जेवत जा, औषधं वेळेवर घेत जा,"
असं सुयश फोनवरून दिवसातून एकदा नक्की सांगायचा, पण 'आज तुला कसं वाटतंय?' हा प्रश्न विचारायला त्याच्याकडे वेळ नसायचा.
शुभांगी काकूंकडे एक खूप मोठी कला होती. पाककला आणि मेहंदी. त्यांच्या हाताला जणू जादू होती. एकेकाळी त्या संपूर्ण कॉलनीच्या लाडक्या होत्या, कोणाच्याही घरी समारंभ असला की शुभांगी काकूंची मेहंदी आणि त्यांचे पदार्थ ठरलेले असायचे. पण आज, पुण्याच्या या पॉश एरियातल्या हाय-प्रोफाइल सोसायटीत, कोणाकडेही एकमेकांसाठी वेळ नव्हता. प्रत्येकजण आपापल्या 'प्रायव्हसी'च्या भिंतीआड सुरक्षित होता.
संध्याकाळी सात वाजता काकूंनी देवासमोर दिवा लावला. काचेच्या खिडक्यांमधून बाहेरची झगमगती रोषणाई दिसत होती. सुयश आणि नेहा रात्री आठ-नऊच्या सुमारास थकून घरी यायचे. जेवतानाही त्यांचे डोळे मोबाईलच्या स्क्रीनवर असायचे. राघव आपल्या टॅबवर गेम खेळण्यात दंग असायचा. शुभांगी काकू तिथे असूनही जणू त्या घरासाठी 'अदृश्य' होत्या. त्यांच्या अस्तिवाचा हुंकार त्या भिंतींमध्येच कुठेतरी विरून जायचा.
त्यांना जाणवत होतं की, आधुनिकतेच्या या शर्यतीत त्या मागे सुटल्या आहेत. सुयश आणि नेहासाठी त्या एक 'सिस्टम'चा भाग होत्या, ज्या सिस्टमचं काम घर व्यवस्थित चालवणं होतं. पण एका साध्या, निखळ संवादासाठी त्या आसुसलेल्या होत्या.
"आई, आज खूप थकायला झालं, मी झोपतोय..." सुयश जेवण झाल्यावर निघून गेला.
"गुड नाईट आई!" नेहाने लॅपटॉप बॅगेत भरता भरता म्हटलं.
शुभांगी काकू पुन्हा एकदा आपल्या खोलीतल्या त्या शांततेच्या स्वाधीन झाल्या. घराची 'बॅलन्स शीट' पैशांनी तर भरलेली होती, पण 'संवादाचा ओलावा' मात्र तिथे शून्यावर होता. नेहा, जी जगाला ब्रँडिंग आणि मार्केटिंग शिकवत होती, तिला स्वतःच्या घरातल्या एका मौल्यवान 'ब्रँड'चं
तिच्या सासूबाईंच्या कलेचं आणि त्यांच्या मनाचं . मार्केटिंग करायची गरज आहे, हे अद्याप उमजलं नव्हतं.
तिच्या सासूबाईंच्या कलेचं आणि त्यांच्या मनाचं . मार्केटिंग करायची गरज आहे, हे अद्याप उमजलं नव्हतं.
एकाकीपणाचा हा कोपरा आता शुभांगी काकूंना गिळू लागला होता. पण या अंधारात नेहाकडून एखादी छोटीशी ठिणगी पडणार होती का?
काकू मधील ती सुप्त कला पुन्हा एकदा जगासमोर येणार होती का?
हे नातं सासू-सुनेच्या औपचारिकतेतून बाहेर पडून मैत्रीच्या ओलाव्यात रूपांतरित होणार होतं का? हे पाहणं रंजक ठरणार होतं.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा