मैत्रीण की सावली
भाग १
" रश्मी, आज आपण शनिवारवाडा बघायला फिरायला जाऊया का ? तिथे छान भेळ खाऊ."
" रश्मी, आज आपण शनिवारवाडा बघायला फिरायला जाऊया का ? तिथे छान भेळ खाऊ."
अद्वैत आणि रश्मी जेव्हा जेव्हा एकत्र बसून गप्पा मारण्याचा किंवा बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखत, तेव्हा तेव्हा सायलीमध्ये यायची.
एके दिवशी संध्याकाळी, अद्वैत आणि रश्मी रंकाळ्याच्या आठवणी काढत असताना अचानक अद्वैत म्हणाला.
एके दिवशी संध्याकाळी, अद्वैत आणि रश्मी रंकाळ्याच्या आठवणी काढत असताना अचानक अद्वैत म्हणाला.
पुण्यातील डेक्कन जिमखाना ओलांडला की मेन रोड पार केल्यावर बागेच्या बाजूने वाट काढत पुढ आलो अचानक समोर येतो तो पटवर्धन बंगला. पिढ्यान पिढ्यांचा इतिहास उराशी बाळगून उभा असलेला हा बंगला , आजही आपल्या जुन्या लाकडी कोरीव कामाने, भव्य दरवाज्याने आणि दगडी भिंतींनी संस्कृतीची साक्ष देत होता.
बंगल्याच्या लोखंडी गेट मधुन आत पाऊल ठेवले की, बाहेरचा ट्रॅफिक गोंगाट संपून एक वेगळीच शांतता आणि जुन्या पुण्याचा दरवळ जाणवायचा. याच वास्तूत रश्मी पटवर्धनांची सून म्हणून आली.
रश्मी साताऱ्याची. साताऱ्याच्या मोकळ्या हवेत, सह्याद्रीच्या कुशीत वाढलेली ही मुलगी स्वभावाने तितकीच मनमोकळी आणि जिद्दी. व्यवसायाने ती एक निष्णात आर्किटेक्ट होती. तिला जुन्या वास्तूंचे आकर्षण होते आणि योगायोगाने तिला सासरही तशाच एका ऐतिहासिक पद्धतीने बांधलेल्या घरात मिळाले होते. तिचे पती अद्वैतही त्याच क्षेत्रात असल्याने, दोघांचे विचार जुळले होते. घरात सासू-सासरे आणि अद्वैतची धाकटी बहीण सायली होती.
लग्नाआधी रश्मीने स्वप्न पाहिले होते की, अद्वैतची धाकटी बहीण सायली तिची एक चांगली मैत्रीण होईल. दोघी मिळून या जुन्या बंगल्याला नव्या अधूनिक विचारांनी सजवतील. पण वाड्याच्या चौकटीत प्रवेश केल्यावर रश्मीला जाणवले की, इथले नियम आणि इथल्या माणसांची मने समजून घेणे बंगल्याचे नकाशे समजून घेण्यापेक्षा कठीण आहे. सायली पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत होती. घरातील सर्वांची ती प्रचंड लाडकी होती. घरातील प्रत्येक निर्णयाचा केंद्रबिंदू सायली असायचा.
रश्मीला सुरुवातीला वाटलं की हे स्वाभाविक आहे, पण हळूहळू तिला जाणवू लागलं की सायलीचा वावर काहीसा अधिकार गाजवणारा आहे.
रश्मी उत्साहात तयार झाली. तिने छानशी साडी नेसली आणि हॉलमध्ये आली, तर तिथे सायली आधीच तयार होऊन बसली होती. सायलीने अद्वैतकडे पाहिले आणि म्हणाली,
रश्मी उत्साहात तयार झाली. तिने छानशी साडी नेसली आणि हॉलमध्ये आली, तर तिथे सायली आधीच तयार होऊन बसली होती. सायलीने अद्वैतकडे पाहिले आणि म्हणाली,
" दादा, मला नोट्स आणायला अप्पा बळवंत चौकात जायचंय, तू येशील का रे ? कॉलेजचा प्रोजेक्ट सबमिट करायची उद्या लास्ट डेट आहे."
अद्वैतने रश्मीकडे पाहिले. रश्मीच्या डोळ्यांत काहीसा विरस झाला होता, पण अद्वैत म्हणाला,
अद्वैतने रश्मीकडे पाहिले. रश्मीच्या डोळ्यांत काहीसा विरस झाला होता, पण अद्वैत म्हणाला,
"रश्मी, आपण शनिवारवाडा बघायला उद्या जाऊया का ? सायलीचं काम महत्त्वाचं आहे."
रश्मीला त्या दिवशी पहिल्यांदा जाणवले की, अद्वैतच्या आयुष्यात तिची जागा अजूनही दुसरी आहे.
केवळ बाहेर जाणेच नाही, तर स्वयंपाकाच्या चवीवरूनही सायली रश्मीला टोमणे मारायची संधी सोडत नसे. रश्मीने बनवलेली साताऱ्याची झणझणीत भाजी सासू-सासऱ्यांना आवडायची, पण सायली तोंड वाकडे करून म्हणायची,
"आई, वहिनीकडे साताऱ्यात तिखट आणि मीठ जरा जास्तच वापरतात वाटतं ? आमच्या सदाशिव पेठेत चव जरा बेतानेच आणि सोफिस्टिकेटेड असते. इतकं तिखट खाल्लं तर आमची पुणेरी जीभ भाजून जाईल."
अशा छोट्या छोट्या पुणेरी खोचा रश्मीच्या मनाला टोचू लागल्या होत्या. सासू-सासरे सायलीच्या अशा वागण्याकडे हसण्यावारी नेत,
" अगं ती लहान आहे, लाडकी आहे, सोडून दे ना."
असं म्हणून रश्मीला गप्प करत. पण रश्मीच्या मनात सायली बद्दल एक अदृश्य भिंत उभी राहू लागली होती. सायलीचा प्रत्येक शब्द रश्मीला आता एका प्रति स्पर्ध्यासारखा वाटू लागला होता. रश्मीला वाटत असे की, सायली मुद्दाम आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी रश्मीला कमी लेखतेय.
पटवर्धन बंगल्यातील त्या भव्य खांबांमागे आता दोन स्त्रियांचे सुप्त संघर्ष सुरू झाले होते.
पटवर्धन बंगल्यातील त्या भव्य खांबांमागे आता दोन स्त्रियांचे सुप्त संघर्ष सुरू झाले होते.
एका बाजूला साताऱ्याची स्वाभिमानी रश्मी आणि दुसऱ्या बाजूला पुण्याची लाडकी, चतुर सायली. रश्मीला कल्पनाही नव्हती की, ज्या नणंदेला ती आपली शत्रू मानत आहे, तीच नणंद भविष्यात तिच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या वादळात तिची सावली होऊन उभी राहणार आहे.
दिवसामागून दिवस जात होते, पण रश्मी आणि सायली यांच्यातील दुरावा कमी होण्याऐवजी वाढतच चालला होता. रश्मीने आता स्वतःला ऑफिसच्या कामात पूर्णपणे झोकून दिले होते. पुण्याच्या एका प्रसिद्ध हेरिटेज कन्सल्टन्सीमध्ये तिला एका मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी मिळाली होती.
पुण्यातीलच एका प्राचीन वाड्याचे नूतनीकरण करून त्याला आधुनिक 'म्युझियम'चे स्वरूप द्यायचे होते. हे काम म्हणजे रश्मीसाठी केवळ नोकरी नव्हती, तर तिचे स्वप्न होते.
या महत्त्वाच्या कामामुळे रश्मीचा घराकडे थोडा दुर्लक्ष होऊ लागला होता. ती सकाळी लवकर जायची आणि रात्री उशिरापर्यंत डिझाईन्समध्ये मग्न असायची.
सासूबाईंना तिचे हे उशिरा येणे फारसे आवडत नसे, पण अद्वैतही त्याच क्षेत्रात असल्याने तो सुरुवातीला तिला पाठिंबा देत असे. मात्र, सायलीच्या टोमण्यांनी हळूहळू अद्वैतच्याही मनात संशयाचे बीज पेरायला सुरुवात केली होती.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा