माझा होशील ना - भाग - 8
( मागच्या भागात आपण बघितले - अनिकेत युवराज तीन वर्षाचा झाला तरी लक्ष्मी ला माहेरी पाठवत नव्हता......) आता पुढे......
लक्ष्मी दरवेळी माहेरी निघाली की तो काही तरी कारण काढून तीला थांबवत असे, कधी आजारपणाचं नाटक करे तर कधी ड्रायवर ला घेऊन अचानकचं दुसरीकडे निघून जातं असे.... त्याला काही बोलायला गेलं की तो लक्ष्मीवरच चिडत असे.......
युवराजला साडे - चार वर्ष झाली होती...आता अनिकेत ने युवराजला शाळेत टाकायला हवं असं लक्ष्मीला सांगितलं...त्यावर ती म्हणाली..त्या आधी मी त्याला घेऊन चार दिवस माहेरी जाऊन येते ना...मग एकदा शाळा सुरु झाली की लगेचं जाता यायचं नाही, आई -बाबा पण नेहमी बोलत असतात..रहायला ये असं...
अनिकेत बोलला, तुझ्या आई - बाबांना म्हणावं युवराजला भेटायचं असेल तर इथे घरी येत जा..तो कशाला तिकडे जायला हवा आहे.....
आता मात्र लक्ष्मीचा राग अनावर झाला....आणि ती ओरडून बोलली.....तुम्हाला काय अडचण आहे ओ....मी माहेरी गेलेली तुम्हाला कां आवडत नाही...लक्ष्मी चा चिडका आणि भांडणाचा स्वर होता...
तीला चिडलेलं बघून अनिकेत म्हणाला...ये आवाज खाली समजलं ना......त्या तुझ्या माहेरच्या एवढ्याशा घरात मला माझ्या सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेल्या युवराजला पाठवायचं नाही आहे...समजलं तुला....वकील झालीस म्हणून मोठी शहाणी झालीस काय.....म्हणूनच मी तुला तुझं ऑफिस खोलून देत नाही आहे....
लक्ष्मी ओरडून बोलली काय - तरी मी म्हणतेय एवढे दिवस मी बोलतेय माझी वकिलीची प्रॅक्टिस करण्यासाठी मला ऑफिस किंवा कन्सलटसी चालू करून दया तर तुम्ही लक्ष चं देत नव्हतात...काय आहे काय तुमच्या मनात....असं बोलल्यावर मात्र अनिकेत चपापला.....
लक्ष्मी बोलली..सांगा काय चाललंय तुमचं ते कां असे वागताय....कां मला एकटीला कुठे सोडत नाही आहत तुम्ही...आणि माझ्या माहेरी तुमच्या सारखी श्रीमंती नसली म्हणून काय झालं...माझ्याशी लग्न केलंत तेव्हा त्यांची गरिबी तुम्हाला दिसली नव्हती कां.....कां तेव्हा त्या सगळयांशी अगदी गोड गोड बोलत होतात मग....कां असं केलंत काय आहे तुमच्या मनात ते मला कळूदेत तरी....
अनिकेत ओरडून बोलला..ये वकिल झालीस म्हणून आवाज चढवतेस काय...आणि त्याने तिच्या कानाखाली मारली.....लक्ष्मी ओरडली तशी तिची सासू बेडरूम मध्ये येऊन बोलली...काय भांडण लावली आहेत तुम्ही दोघांनी....अनिकेत चल बाहेर चल...तसा अनिकेत पटकन बाहेर गेला.....
( अनिकेत कां आणि कशासाठी लक्ष्मी बरोबर असं वागत असेल...ते आपण पुढच्या भागात बघणार आहोत....)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा