माझा होशील ना - भाग - 9
( मागच्या भागात आपण बघितले - अनिकेत चं वागणं दिवसेंदिवस विचित्र होत चालले होते - आता पुढे....)
अनिकेतला त्याची आई हॉल मध्ये घेऊन गेली, आणि इकडे लक्ष्मी सगळ्या गोष्टींचा विचार करू लागली....
अनिकेत मला कधीच एकटीला कुठेच बाहेर कां पाठवत नाही.... ड्राइव्हर किंवा तो असतोच बरोबर...आणि तो ड्राइव्हर दादा पण आपल्यावर सतत लक्ष ठेवून असतो हॆ मला नेहमीच वाटतं असे... तो मला कुठेही गाडीने घेऊन गेल्यावर तो ही बॉडीगार्ड सारखा पाठी असे सतत माझ्या....
मी वकिली करण्यासाठी कॉलेज ला गेली असताना ड्राइव्हर जेवढा वेळ मी वर्गात असेन तेवढा वेळ तो बाहेर गाडी मध्ये बसून राहत असे..मी खूप वेळा बोलत असे...दादा तुम्ही कां थांबताय चार तास...मला डायरेक्ट कॉलेज सुटल्यावर न्यायला येत जा..पण ते काही केल्या ऐकत नसतं...
अनिकेत च्या आईला काही अनिकेत बद्दल सांगायला गेलं तर तिचं एकचं म्हणणं असे की तू त्याला समजून घेत जा..तो रागीट आहे...पण चांगला आहे... तो कायम दुःखातून गेल्यामुळे असा वागत असेल...त्याचे वडील, बायको आणि मुलगी पण त्याला सोडून गेल्यामुळे तो व्यथित असतो, विचारात असतो...त्यामुळे त्याला राग अनावर होतो...
मी वकिली पूर्ण केल्यावर त्याने ऑफिस उघडून द्यायला टाळाटाळ केली...मग मला वकिली करायला तो हो कां बोलला असेल, तो सर्वांसमोर चांगुलपणाचं नाटक करत असेल.....तो सर्वांना देखावा करत असेल कां बघा त्याने त्याच्या बायकोला लग्नानंतर पण शिकायला परवानगी दिली....
माझ्या माहेरच्यांसमोर तो एवढा चांगलं वागतो आणि आता त्यांच्या पाठीमागे मला बोलतोय युवराजला मी तिकडे कधीच पाठवणार नाही...त्यांचं घरं छोटं आहे..अरे हॆ काय..... त्याचं घरात मी लहानाची मोठी झाले आणि त्याचं घरी जायला मला परवानगी नाही.....
मी आता गप्प बसणार नाही, उदया अनिकेत ऑफिसला गेला की कुठे तरी, काहीतरी घेण्याचं निम्मित करून मीबाहेर जाते...ड्राइव्हर दादांना गाडी काढायला सांगते आणि मग त्यांना विचारून बघते की असं कां...अनिकेतने माझ्यावर त्यांना हेरगिरी करायला ठेवलं आहे... बघू काय बोलतात ते....
दिवसभर अनिकेत लक्ष्मी बरोबर एक ही शब्द बोलला नाही, आणि ती सुद्धा बोलायला गेली नाही....
लक्ष्मी मनातल्या मनात बोलू लागली काय आहे हॆ प्रकरण त्याचा मी छडा लावणारच...
लक्ष्मीने दुसऱ्या दिवशी सासू ला सांगितले की मी जरा ब्युटी पार्लर ला जाऊन येते एक तासात...ड्राइव्हर दादांना घेऊन जातेय...सासू हो चालेल..बोलली....
लक्ष्मी ने ड्राइव्हर ला गाडीमध्ये बसल्या बसल्या विचारलं.....दादा कां हॆ तुम्हाला माझ्यावर पाळत ठेवायला सांगतात...तसें ते चपापले..त्यांना हा प्रश्न अपेक्षितच नव्हता.... ते लगेचं ताई असं काही नाही असं बोलू लागले...
लक्ष्मी बोलली दादा तुम्हाला तुमच्या एकुलत्या एक नवसाने झालेल्या मुलीची शपथ आहे...प्लिज मला सत्य सांगा मी तुमचं नावं कुठेच येऊ देणार नाही.... तेव्हा ड्राइव्हर ताई प्लिज तुम्ही साहेबांना काही सांगणार नसाल तर मी सत्य सांगतो तुम्हाला....
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - अनिकेतचं सत्य....)
