माझा होशील ना - भाग - 10
( मागच्या भागात आपण बघितले - ड्राईव्हर लक्ष्मीला सांगतो की ताई मी तुम्हाला सत्य सांगतो पण तुम्ही साहेबांना सांगू नका......हो दादा मी कोणाला काहीच बोलणार नाही असं लक्ष्मी सांगते....आता पुढे.....)
ड्राइव्हर बोलू लागतो - साहेब आणि त्यांच्या मित्रांचा कसला तरी वेगळा बिझनेस आहे... त्यांच्या बिझनेस मध्ये दोन महिला पण आहेत...असे सगळे मिळून ते पाच जण आहेत....ते सगळे काहीतरी वाईट कामं करतात हॆ मात्र नक्की....कारण त्यांची कामं लपून - छपून असतात...ते तुम्ही वकील असल्यामुळे तुम्हाला त्यांची कामं समजू नयेत म्हणून सतत प्रयत्न करत असतात....
साहेब बरेचदा दोन - चार दिवसांसाठी ऑफिस च्या फिल्ड व्हिजिट ला जातात असं बोलतात बघा तेव्हा ते इथून जवळपास दोन - तीन तासाच्या अंतरावरचं असतात...ते पाच जण जवळच एका हॉटेल मध्ये राहतात आणि दोन दिवसांनी निघतात...आणि तुम्ही एक नोटीस केलंय कां ते नेहमी सुट्टीच्या दिवशी म्हणजे शनिवार - रविवार चं जात असतात...
लक्ष्मी बोलते पण साहेब नेहमी आपलीच गाडी घेऊन जातात ना..ड्राइव्हर बोलतो तेच तर ना मी लागतो त्यांना बरोबर...मला एक साधी रूम बुक करून देतात आणि बाकी सगळे मोठ्या रूम मध्ये एकत्र राहतात....मला नेतात कां तर त्यांना बाहेरून सिगारेट वैगेरे हवं असेल तर मी आयता गडी असतो ना त्यांचा....
लक्ष्मी बोलते - कसला धंदा करतात पण हॆ सगळे...ड्राइव्हर बोलतो तेच तर कळत नाही ना..आणि मी पण कधी जास्त लक्ष घातलं नाही त्यात, कारण मला नोकरीं सांभाळायची होती...
लक्ष्मी बोलते - पण नक्की काय करत असतील ते सगळे दोन दिवस हॉटेल च्या रूम मध्ये राहून कोण छडा लावेलं ह्याचा..कसं कळणार आता हॆ सगळं....लक्ष्मी बोलते पण हॆ मला माहेरी पाठवत नाहीत, मला एकटीला कुठे सोडत नाहीत ह्या सगळ्याचा संदर्भ कसा लावायचा आता....
ड्राइव्हर बोलतो कसं असतं बाईसाहेब अशा लोकांना बाहेर ची बाई वाईट धंदे करत असली तरी चालते...पण आपली बायको चुकून पण त्या साईट ला जाऊ नये असं वाटतं असतं... त्यामुळे अशा वाईट कामं करणाऱ्या लोकांना स्वतःची बायको कितीही चांगली असली तरी ती असं गुपचूप काही वागेल कां असा सतत संशय येत असतो...त्यामुळे ते आपल्या बायकोवर सतत पाळत ठेवून असतात...
लक्ष्मी बोलते पण ते काय करत असतील...ड्राइव्हर बोलतो ताई तुम्ही माझ्या बहिणीं सारख्या आहात म्हणून सांगतो मी चुकून एकदा सेक्स रॅकेट असा शब्द त्यांच्या तोंडून गाडी चालवताना ऐकला होता....असंच काहीतरी ते करत असावेत....
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - ह्या सगळ्यावर लक्ष्मी ची काय रिऍकशन असेल ते....)
