माझा होशील ना - भाग- 11
( मागच्या भागात आपण बघितले - लक्ष्मी ला ड्राइव्हर बोलतो मी साहेबांना सेक्स रॅकेट असं बोलताना ऐकलं आहे..आता पुढे.....)
लक्ष्मी हॆ ऐकून हैराण होते..ती म्हणते हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवतात की काय हॆ पाच जण आणि हॆ असलं घाणेरडं कामं करतात की सगळे मिळून....ड्राइव्हर बोलतो ताईसाहेब हो असं चं काहीतरी आहे हॆ...
लक्ष्मी बोलते काय हा प्रकार...अनिकेत एवढा चांगला नोकरीला आहे, सगळं छान आहे...पैश्याची अजिबात कमी नाही तरी ही अशी कामं करायची दुर्बद्धी सुचली कुठून ह्या माणसाला.......म्हणतात ना सगळं चांगल असलं की माणसाला असं काहीतरी विचित्र सुचतं....
लक्ष्मी ड्राइव्हर ला बोलते..दादा तुम्ही माझी मदत कराल कां...मी तुमची नोकरीं जाऊन देणार नाही, आणि चुकून पण तुमचं नावं कुठेच मध्ये येऊन देणार नाही....पण मी अनिकेतला शिक्षा करणारच...नाहीतर ह्या अशा नीच प्रवृत्ती अजूनच बळावतील....
ड्राइव्हर बोलतो पण ताई मी काय मदत करणार तुम्हाला.....लक्ष्मी बोलते....तुम्ही साहेबांना आता जेव्हा पुढच्या वेळी तिथे गाडीने हॉटेलवर सोडाल ना तेव्हा फक्त मला कळवा.....मी वकिली करत असताना माझी एक मैत्रीण होती तिचा नवरा पोलीस होता...आपण त्यांच्या बरोबर बोलून तिथे पोलिसांना अचानक धाड टाकायला सांगू...म्हणजे ही सगळी जण तिथे भेटतील...
ड्राइव्हर बोलतो - पण ताई ही सगळी पैशेवाली आहेत, पैश्याच्या जोरावर ते लोकांना धमाकावतील, तुम्हाला नकोसं करतील अगदी.... लक्ष्मी बोलते मी त्या मैत्रिणीशी बोलून बघते आणि ती काय म्हणतेय ते बघते...ह्या सगळ्यामुळे अनिकेत ला शिक्षा होणार, त्याला सजा होणार, तो जेल मध्ये जाणार.....
हॆ सगळं अवघड होईल, सासूबाई मला बोल लावतील..... पण हॆ गुपचूप माझं नावं कुठे येऊ न देता कोणीतरी पोलिसांना ह्या रॅकेट ची टीप दिली आणि त्यांनी तिथे धाड टाकली असं करता येईल कां ते त्या मैत्रिणीला विचारून बघते....दादा मी तुम्हाला सांगितलं आहे तेवढं फक्त मला कळवा...साहेब तिथे आता पुन्हा कधी गेले की मला कळवा प्लिज....ड्राइव्हर हो ताई बोलतो...
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - लक्ष्मी हॆ सगळं कसं प्लॅन करते आणी अनिकेत ला काय शिक्षा होते ते......)
