Login

माझा होशील ना - भाग - 12

majha hoshil na
माझा होशील ना - भाग - 12

( मागच्या भागात आपण पहिले - लक्ष्मी हॆ सगळं ऐकून सुन्न होते आणि अनिकेतला शिक्षा देणारचं असं ठरवते आता पूढे.....)


लक्ष्मी घरी येते आणि युवराज आणि ती जेवतात. जेवून झाल्यावर ती बेडरूम मध्ये नेवून युवराजला झोपवते... आणि बेडरूम चा दरवाजा लावून घेते आणि तिच्या वकील मैत्रिणीला कॉल करते आणि तीला अनिकेतबद्दल सगळं सांगून तिच्याकडून तिच्या पोलीस नवऱ्याचा मोबाईल नंबर मागते...तिची मैत्रीण पण बोलते अगं पण ह्या गुन्ह्यात अनिकेतला निदान पंधरा ते वीस वर्षाची शिक्षा नक्कीच होईल, तुझा संसार पणाला लागेल ह्यात....

लक्ष्मी बोलते अगं पण गुन्हेगाराला शिक्षा नको कां, नाहीतर अजून कोणतरी अडकेल त्यात, त्यांच्या बरोबर कामं करणाऱ्या मुलीं हॆ सगळं आनंदाने तर करत नसतील ना, त्यांची पण काहीतरी अडचण असेलच ना...म्हणून त्या ह्या धंद्यात पडल्या असतील... आणि हॆ असले अनिकेत सारखे नराधम त्या बाईच्या गरजेचा असा वाईट वापर करून घेतात....

कोणाचा नवरा खूप दारू पिणारा असतो, म्हणून घरं चालण्यासाठी, मुलांच्या भविष्यासाठी त्यांना पैश्याची गरज असते त्यामुळे त्या महिला ह्या कामात येतात...पण मी अनिकेतला अजून हॆ असलं कामं करून देणार नाही......मी अनिकेतला शिक्षा करणारच...तेवढ्यात त्या मैत्रिणीचा नवरा घरी येतो ती लक्ष्मीला बोलते हॆ आलेत तू ह्यांना विचार काय करता येईल ते...लक्ष्मी हो बोलते...

मैत्रिणीचा नवरा लक्ष्मी ला बोलतो...हा ताई सांगा...लक्ष्मी सगळा वृत्तांत सांगते..ते ऐकल्यावर तो पोलीस बोलतो..ताई तुमचं नावं मी येऊ देणार नाही हि जबाबदारी माझी..तुम्ही फक्त ते आता त्या ठिकाणी पुन्हा गेले की मला फोन करून सांगा मी माझ्या टीम ला घेऊन घटना स्थळी पोचून छापा टाकतो.....आणि मग ते सगळे पकडले जातील....लक्ष्मी हो चालेल असं बोलून फोन ठेवते...


आता लक्ष्मी रोज अनिकेत वर लक्ष ठेवू लागली...आणि दहा दिवसांनी अनिकेत तीला बोलला मी सातारा ला जातो आहे ऑफिस मीटिंग साठी तीन दिवस...लक्ष्मी आता सतर्क होती..तीने पटकन ड्राइव्हर ला मेसेज केला की मला साहेब ज्या लॉज वर राहतात तिथला ऍड्रेस पाठवा...ड्राइव्हर ने ओके असा रिप्लाय दिला....


अनिकेत दुसऱ्या दिवशी सकाळी निघाला...लक्ष्मी ने ड्राइव्हरला बजावून ठेवलं की आठवणीने पत्ता मेसेज करा असं....आणि मग अनिकेत गेल्यावर चार तासाने ड्राइव्हरने पत्ता पाठवला... लक्ष्मी ने तत्परतेने त्या पोलीससरांना कॉल केला आणि बोलली सर प्लिज माझं नावं येऊ देऊ नका...पण तिथे छापा टाका...ते हो मॅडम तुम्ही काळजी करू नका मी तुमचं नावं बाहेर येऊ देणार नाही असं बोलले...


ठरल्याप्रमाणे पोलिसांनी तिथे धाड टाकली, त्यात त्यांनी अनिकेतसकट सहा पुरुष, चार महिला मिळाल्या, ह्या सर्वात लॉज मालक हि सामील होता..त्याचे अजून दोन सहकारी हि त्यात होते...त्या सर्वांना अटक झाली....


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - लक्ष्मी अनिकेतला अटक झाल्यानंतर कसं आयुष्य जगते ते....)