Login

माझा होशील ना - भाग - 13

majha hoshil na
माझा होशील ना - भाग - 13


मागच्या भागात आपण बघितले - अनिकेतला अटक होते आता पुढे.......


अनिकेतला अटक होते, केस कोर्टात चालू होते, त्याला दहा वर्षाची शिक्षा होते.... इकडे अनिकेतची आई हॆ सगळं ऐकून आजारी पडते.....खाणं - पिणं सोडते.... अनिकेत असं काही करेल ह्यावर तिचा विश्वास चं बसत नव्हता.... हॆ सगळं काय होऊन बसलं माझ्या लेकाच्या संसाराचं, त्याला पैश्याची कमी नसताना असं हॆ घाणेरडं कामं करण्याची वृत्ती कुठून सुचली , त्याने युवराज चा तरी विचार करायला हवा होता....असं ती बडबडत राहत असे..... लक्ष्मी ला म्हणतं असे....त्याला पोलीस चौकीत भेटायला जा..त्याला जेवण तरी मिळतंय कां तिथे ते विचारून ये.....आणि मग जोरजोरात रडायला लागत असे....

लक्ष्मी ने तिची वकिलीची प्रॅक्टिस पुन्हा चालू करायचा निर्णय घेतला... देवाच्या कृपेनें आर्थिक स्थिती अगदी व्यवस्थित होती...त्यामुळे तीला अनिकेत नसल्यामुळे घरं कसं चालेल ह्याची चिंता सध्या तरी नव्हती.... त्यामुळे ती थोडी तरी निर्धास्त होती..युवराज पप्पा कुठे आहेत असं विचारून तीला सतत हैरान करत असे.....पण ती हा बाळा पप्पा लवकरच येतील असं सांगून वेळ मारून नेत असे....


लक्ष्मी च्या माहेरी हॆ सगळं कळल्यावर सगळे ऐकूनच शॉक झाले..कारण अनिकेत सगळ्यांच्या नजरेत कायम चांगलाचं वागत असे... अनिकेतला अटक होऊन चार महिन्यानंतर सासूबाई जरा स्थिरावल्या.... लक्ष्मी ने त्यांना खूप समजावलं..मी आहे ना तुमच्यासाठी तुम्ही कसलं टेंशन घेऊ नका... असं ती त्यांना सतत सांगत असे...


युवराज पाच वर्षाचा झाला होता, ह्या सगळ्यात त्याच्या शाळेचा विषय मागे पडला... एक दिवस लक्ष्मी जाऊन त्याचं एका शाळेत ऍडमिशन घेते, युवराज हळू हळू मोठा होत असतो, लक्ष्मी तिची वकिलीची प्रॅक्टिस पूर्ण करून एक स्वतः चं ऑफिस उघडते...


लक्ष्मी ची घरासाठी असलेली धडपड बघून तिची सासू पण तिच्याशी चांगली वागत असते... लक्ष्मी अल्पावधीमध्येच चांगली वकील होते, तिच्याकडे स्त्रियांच्या केसेस येणे चालू होते.. ती स्त्रियांना योग्य तो न्याय मिळवून देत असे....

युवराज मोठा होत होता, तो सतत अनिकेत बद्दल विचारत असे, लक्ष्मीला मनातून खूप वाटतं असे की त्याला जेल मध्ये न्यावे आणि अनिकेतची भेट घडवून द्यावी...पण तिचं मन मानत नसे, ती म्हणत असे एकदा अनिकेतला त्याला भेटायला नेलं की तो सतत त्याला भेटण्याची इच्छा व्यक्त करेल...आणि त्याच्या ह्या वयात आपले पप्पा जेल मध्ये आहेत हॆ त्याला लक्ष्मीला समजून द्यायचे नव्हते....ती अनिकेत लवकरच येईल असं त्याला सांगून गप्प बसत असे....


बघता बघता दहा वर्ष निघून जातात...अनिकेत सुटण्याची वेळ जवळ येत असते. युवराज दहावीला असतो....लक्ष्मी मनात म्हणत असते अनिकेत आल्यावर तो घरात कसा वागेल काय रिऍक्ट करेल, त्याला मी त्याच्या विरोधात तक्रार केली होती हॆ एवढ्या वर्षात कोणाकडून समजले तर नसेल ना.... तो जेल मध्ये होता हॆ युवराज पासून तीने एवढे वर्ष लपून ठेवले होते...त्याला आता काय सांगायचे की पप्पा कुठे होते... ती सासू ला विचारून बघते की आई - युवराजला काय सांगूया..


सासू बोलते आपण त्याला एवढे वर्ष पप्पा एका संकटात अडकले आहेत असं बोलत होतो ना आता तेच बोलू की पप्पा एके ठिकाणी कंपनी च्या कामानिमित्त गेले असताना तिकडे संकटात अडकले होते..आता ते तिथून सही - सलामत सुटून घरी येत आहेत....


बघता बघता अनिकेत सुटण्याचा दिवस उजाडतो.....

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - अनिकेत एवढ्या वर्षांनी घरी आल्यावर त्याची वागण्याची पद्धत कशी असेल.....)