माझा होशील ना - भाग - 14
( अनिकेत जेल मधून सुटून येण्याचा दिवस उजाडतो - आता पुढे.....)
अनिकेत एवढ्या वर्षानंतर घरी येणार असतो म्हणून त्याच्या आईने नोकरांना सांगून त्याच्यासाठी सुग्रास जेवण बनवायला सांगितले होते...लक्ष्मी त्याला आणण्यासाठी जेल मध्ये मध्ये जाते...सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून अनिकेतला सोडण्यात येत...अनिकेत लक्ष्मी बरोबर बाहेर येतो आणि गाडीत जाऊन बसतो....
एवढे वर्ष जेल मध्ये राहिल्यामुळे त्याची त्यबेत बरीच खालवलेली असते..अनिकेत गाडीत बसल्यापासून घर येईपर्यंत ड्राइव्हर आणि लक्ष्मी बरोबर एक ही शब्द बोलत नाही.... तो बाहेर बघत गप्प बसून असतो.... लक्ष्मी पण बोलते एवढ्या वर्षांनी बाहेरचं जग बघतोय त्यामुळे तो अस्वस्थ असेल...ती पण गप्प बसून राहते....
घरी पोचल्यावर त्याची आई खुश होते, युवराज पप्पा म्हणून त्याला हाक मारतो, अनिकेत युवराज ला मोठा झालेला बघून त्याला मिठी मारून रडायला लागतो.. अनिकेत जेल मध्ये गेला होता तेव्हा युवराज पाच वर्षाचा होता आता तो पंधरा वर्षाचा झाला होता... कितवीला आहेस असं अनिकेत विचारतो....दहावीला असं युवराज बोलतो.... अनिकेत त्याला जवळ घेवून सोफ्यावर बसतो....
लक्ष्मी बरोबर अनिकेत बोलण टाळतोय.....हॆ तिच्या सासू च्या आणि युवराज च्या लक्षात येत....लक्ष्मी त्याला बोलते चला फ्रेश होऊन छान अंघोळ करून घ्या, आपण सगळे एकत्र मिळून जेवून घेऊया...अनिकेत नुसता हूं..असं बोलून बाथरूम मध्ये निघून जातो....
अनिकेत अर्ध्या तासात फ्रेश होऊन बाहेर येतो, सगळे जेवायला बसतात...अनिकेत जेवताना फक्त युवराज बरोबरचं बोलत असतो... दुपारी जेवून झाल्यावर तो बेडरूम मध्ये निघून जातो.... युवराज ला जाताना बोलतो मी जरा आराम करतो मग आपण संध्याकाळी बुद्धिबळ खेळू...हो पप्पा चालेल असं बोलून युवराज सुद्धा त्याच्या रूम मध्ये निघून जातो...
लक्ष्मीला खूप मनातून वाटतं असतं की अनिकेतने तिच्याशी बोलावं, एवढे वर्ष एकटीने हॆ सर्व कसं सांभाळलस ते आपुलकीने विचारावे, आता तू काय करतेस त्या बद्दल चौकशी करावी पण अनिकेत गप्प होता...तो लक्ष्मीला टाळत होता....ती बेडरूम मध्ये गेली तर अनिकेत शून्यात नजर लावून बसला होता..
लक्ष्मी त्याच्या जवळ जाऊन बसते...आणि विचारते कसे आहात तुम्ही...अनिकेत शांतपणे बोलतो...बरा दिसतोय ना मग बराच आहे मी.... लक्ष्मी बोलते अहो असे कां वागताय, बोलत कां नाही आहात माझ्याशी....अनिकेत बोलतो...कसा वागतोय...बोलतेय की बरोबर, अजून कसं बोलू...आणि तो सरळ दुसरीकडे तोंड करून डोळे बंद करून पडून राहतो....
लक्ष्मी थोडावेळ विचार करत बसते आणि मनातल्या मनात बोलते..अनिकेत असा कां वागतोय....त्याला समजले आहे की काय की त्याची तक्रार मी केली होती ते...की मी माझं ऑफिस टाकलं आहे, मी एक प्रतिष्ठित वकील झाली आहे ह्याचा त्याला राग आला आहे... आणि समजले असेल तर तो एवढा शांत कसा बसला आहे आल्या आल्या भांडला असता माझ्याशी...मला कदाचित घरातून बाहेर सुद्धा काढले असते त्याने..पण हा खूप शांत कां आहे...
वादळा पूर्वीची शांतता तर नसेल ना ही......
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत अनिकेत च्या डोक्यात काय प्लॅन शिजत होता ते...)
