Login

माझा होशील ना - भाग - 15

majha hoshil na
माझा होशील ना - भाग - 15

( मागच्या भागात आपण बघितले अनिकेत लक्ष्मी बरोबर बोलत नसतो आता पुढे...)

लक्ष्मी मनातल्या मनात बोलते, अजून एक - दोन दिवस वाट बघू हा बोलतो कां ते आणि नाहीचं बोलला तर त्याला प्रेमाने विचारून बघूया....


दोनाचे चार दिवस होतात अनिकेत लक्ष्मी बरोबर तुटकपणेचं वागत असतो..लक्ष्मी तिच्या ऑफिसला सकाळी दहा वाजता निघून जातं असे ती संध्याकाळी पाच वाजता परत येत असे...चार दिवसांत अनिकेतने तीला तिचं ऑफिस कुठे आहे किंवा ती आयुष्यात त्याच्या आधाराशिवाय कशी पुढे गेली ह्या बद्दल काहीच विचारले नाही.... लक्ष्मीने त्याच्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न केला पण तो तीला खुपचं टाळत होता....

आठ दिवस वाट बघून मग एके दिवशी लक्ष्मीने त्याला रात्री झोपताना ठणकावूनचं विचारले..तुम्ही कां अशे वागतात माझ्याशी....कां माझा राग राग करताय...माझ्या बोलण्याकडे लक्ष देत नाही आहात....

अनिकेत सुरवातीला पाच मिनटं गप्प राहिला आणि मग बोलला, दहा वर्ष माझ्याशिवाय राहिलीस ना...ह्या घरात एकटी, ह्या बेडरूम मध्ये एकटी मग आता कशाला तुला माझी सोबत हवी आहे...आता ही रहा की मग माझ्या साथीशिवाय..... मी अजूनही शिक्षाचं भोगतोय असं समज की....


लक्ष्मी रडू लागली, तसं अनिकेत बोलला आता समजलं कां एकटं पडल्यावर किती त्रास होतो ते....आता ह्या एकटेपणाची सवय लावून घे..... माझी साथ तू कधीच सोडली आहेस.... आता तू तुझी वकिली कर आणि जा एकटीनेच आयुष्यात पुढे.....


लक्ष्मी बोलली,.... म्हणजे......तुमच्या बोलण्याचा संदर्भ चं लागत नाही आहे मला....अनिकेत बोलू लागला...तुला श्रीमंत नवरा हवा होता ना....भरपूर पैसे वाला..म्हणूनच तर तू दुसरेपणाला मला हो म्हणालीस ना......मी बोलतोय ते सत्य आहे ना.......


लक्ष्मी बोलली अहो हॆ पंधरा वर्षांपूर्वीच कां ऐकून दाखवताय मला आता.......माझी काय चूक ह्यात, गैर काम तुम्ही केलंत त्याची सजा भोगून तुम्ही आलात ना.......हॆ ऐकून अनिकेत जोरात ओरडून बोलला..ये तुझी वकिली ची जुबान इथे चालवायची नाही हा....मला माहीती आहे मी काय केलं होत ते....आणि मला सजा पण झाली त्याची.....


अनिकेत चा जोरात चढलेला आवाज ऐकून युवराज त्यांच्या रूम मध्ये आला आणि पप्पा काय झालं विचारू लागला....अनिकेत अगदी शांत होऊन बोलला अरे मी एवढ्या मोठ्या संकटातून नुकताच आलो आहे आणि तुझी आई पुन्हा दुसरी नोकरीं तरी बघा असं सांगू पण लागली मला...मला जरा आराम करुदेत मग नोकरीं बघू आरामात असं मी बोललो तर तुझी आई चिडली बघ.....

युवराज बोलला आई तू पण ना..पपांना आराम करुदेत ना...असं बोलून निघून गेला....


युवराज गेल्यावर अनिकेतने दरवाजा लावून घेतला आणि तो लक्ष्मी कडे बघत गडगडाटी हसला....आणि बोलला...आता तर खरी सुरवात आहे...बघ तुला अजून काय काय सहन करावे लागेल ते.. दहा वर्षातल्या प्रत्येक दिवसाचा बदला चुकता करायचा आहे तुला....


लक्ष्मी बोलली काय बोललात मी काय केलंयं कां त्रास देताय मला...तसा अनिकेत बोलला.....मी कुठे बोलतोय तू काय केलं आहेस....आणि जोरात हसू लागला.....


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत अनिकेत च्या ह्या अशा वागण्यामुळे तो त्याच्या संसाराची कशी वाट लावतो ते....)


0

🎭 Series Post

View all