Login

माझा होशील ना - भाग - 16

majha hoshil na
माझा होशील ना - भाग - 16

( मागच्या भागात आपण बघितले - अनिकेतचं सगळंच वागणं कोड्यात टाकणार आहे...आता पुढे.....)


लक्ष्मी ला काय करू नी काय नको असं झालेलं असतं..कोणाजवळ आपलं दुःख व्यकत करू असं तीला होत...

अनिकेत बद्दल तक्रार तीने केलेली असते हॆ ती आणि ड्राइव्हर व्यतिरिक्त कोणाला ही माहीती नसते. तिच्यामुळे अनिकेत जेल गेला हॆ सत्य कोणाला अजून तीने सांगितलेचं नसते.....

लक्ष्मी बोलते अनिकेत बरोबर गोड बोलून कां होईना पण तो असा कां वागतोय हॆ त्याला विचारून घ्यावं..... दुसऱ्या दिवसापासून लक्ष्मी अनिकेत बरोबर जणू काही झालंच नाही असं वागायला सुरवात करते........

अनिकेत लक्ष्मीच्या वागण्याकडे दुर्लक्ष करत होता.... शेवटी तीन - चार दिवस गेल्यावर लक्ष्मीला अनिकेत बोलतो...ओ वकिलीनबाई हॆ चांगल वागण्याचं नाटक बंद करा तुमचं.... मला सगळं कळतंय......लक्ष्मी त्याचं बोलणं ऐकून गप्पचं बसली....

हळू हळू चार, पाच दिवसांनी तिच्या लक्षात आलं की तिच्या सासूच्या वागण्यात फरक पडला आहे....सासू सुद्धा तिच्याशी कमी बोलू लागली.... आता मात्र लक्ष्मी मनातल्या मनात विचार करून हैराण झाली... आणि मग तीने मनाशी हॆ पक्के केले की अनिकेतला विचारावं की माझ्यावर कसला राग आहे एवढा....

युवराज ह्या सगळ्यात लक्ष घालत नव्हता...पण त्याला समजून चुकले होते की, आई - पप्पांचं काहीतरी भांडण चालू आहे...पण तो त्याचा अभ्यास आणि तो असं वागत असे..शाळेतून आल्यावर क्लास ला जातं असे, तिथून आल्यावर अभ्यास करत बसत असे.....

लक्ष्मी ने अनिकेतच्या वकिलांना भेटायचं ठरवलं, आणि तीने त्यांना फोन केला...आणि ते जे बोलले ते ऐकून लक्ष्मी थक्क चं झाली....

सावंत वकील म्हणाले अहो ताई अनिकेतला आणि त्याच्या आईला दोघांनाही हॆ माहित आहे की तक्रार तुम्हीच केली होतीत....मध्यंतरी तुमच्या अपरोक्ष तुमच्या सासूबाई अनिकेतला सतत पोलीस स्टेशन मध्ये येऊन भेटत होत्या....तेव्हाच मला संशय आला होता...तेव्हा मी चौकशी केल्यावर समजले की त्याची आई त्याच्या सुटकेसाठी कितीही पैसे द्यायला तयार होती....... पण अनिकेतचं नशीब म्हणा किंवा गुन्ह्याची तीव्रता म्हणा त्याची सजा कमी होऊ शकली नाही.........


लक्ष्मी हॆ सगळं ऐकून रडून म्हणाली, सर तुम्ही मला आधी हॆ सगळं सांगायचंत ना..त्यावर सावंत वकील म्हणाले.... तुमच्या सासूने मला तुम्हाला सांगू नका असं सांगितलं होत, तरीही मी आज तुम्ही अगदी रडवेल्या आवाजात विचारलात म्हणून मी सांगितलं.....


लक्ष्मी तिच्या ऑफिस मधून घरी येते आणि ह्या सगळ्याचा विचार करत बसते....काय करावं कसा पर्याय काढावा ह्यातुन हेच तिच्या डोक्यात होत...एक मन सांगत होत........घटस्फोट घ्यावा.........कारण आता ती तिच्या पायावर उभी होती....पण मग युवराज चं काय त्याला त्याची आजी आणि पप्पाच योग्य वाटले तर....


सासू आणि अनिकेतने मी ऑफिसला असताना युवराज ला माझ्या बद्दल काही भडकावले असेल तर..... तसंही तो खूप कमी बोलतो घरात त्याला त्याचा अभ्यास आणि तो असं वागणं असतं त्याचं.... मी युवराजला विश्वासात घेऊन सगळं सांगितलं तर.... पण त्याला पटेल कां ते...एकतर हॆ त्याचं दहावीच वर्ष..... लक्ष्मीला विचार करून करून रडायला येत असतं..... पण मग पुढे काय...हा विचार तीला सतावत असतो....

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - ह्या सगळ्या अशा नात्यांचा शेवट काय असेल ते..की अनिकेत आणि लक्ष्मीपैकी कोणा एकाला ह्या नात्यात आपला जीव गमवावा लागेल....)


0

🎭 Series Post

View all