Login

माझा होशील ना - भाग - 17

majha hoshil na
माझा होशील ना - भाग - 17

लक्ष्मी मनातल्या मनात म्हणते माझा चं अट्टहास होता.... की भरपूर श्रीमंत नवरा हवा, त्याच्याकडे नोकर - चाकर हवेत, गडगंज श्रीमंती काय असते ती मला हवी होती....आणि मी ते साध्य पण केलं....पण म्हणतात ना....तसं माझं नशीब दुर्दैवी निघालं....


अनिकेत चं नालायक निघाला... पैश्याच्या हव्यासापोटी नको ती कामं करत होता...भरपूर पैसा चांगली नोकरीं असूनही नको ते वाईट धंदे करत होता..... आणि मी ते प्रकरण उघडकीस आणलं कारण मी सत्या च्या पाठी उभी राहिली...नाहीतर अजून किती तरी मुलीं त्यात भरडल्या गेल्या असत्या....

माझ्या तीन बहिणीं माझ्या सारख्या श्रीमंत नाहीत पण त्यांच्या सासरी सुखात आहेत.... मी चं कायम धावत्या सुखाच्या पाठी पळत राहिली...काय मिळवलं मी ह्या पंधरा वर्षाच्या संसारात....

ना मला अनिकेतचं प्रेम मिळालं की ना मला सुखं मिळालं, मी मृगजळाच्या पाठीमागे धावत राहिले, मी किती श्रीमंत आणि सुखी आहे, माझ्या घरी काहीच करावं लागत नाही, सगळी काम करायला नोकर माणसं आहेत...मी अनिकेतला अटक होण्याआधी मी किती ऐटीत राहायचे....


अनिकेतच्या त्या हसऱ्या चेहऱ्यामागे कायम चं काहीतरी दडलेलं असायचं...मला कुठेही गाडी घेतल्याशिवाय जाऊ न देणे असायचे त्याचे नेहमी...तेव्हा मला वाटयचं की आपली बायको गाडीनेचं फिरवी असं त्याला वाटतं असेल..पण ते तसं नव्हतं तर त्याचा संशयी स्वभाव होता.....


लक्ष्मी खूप वेळ स्टडी रूम मध्ये बसून हॆ सगळं आठवत राहिली...तिच्या डोळ्यांतुन झरझर पाणी वाहू लागले.... त्या रात्री ती जेवली सुद्धा नाही...आणि मग खूप वेळ स्टडी रूम मध्ये बसून राहिल्यावर तीला अस्वस्थ वाटू लागलं म्हणून ती टेरेस वर फेरफटका मारायला निघून गेली......

एवढ्या वेळात कोणीच तीला ती कुठे आहे किंवा कां जेवली नाही हॆ विचारायला आलं नाही...रात्रीचे पावणे बारा वाजत आले होते तरी ती टेरेस वर होती...... मध्येच बारा वाजून दहा मिनिटांनी तीला गरम झाल्यासारखं वाटू लागलं आणि ती खुर्चीतून उठून पुढे गेली आणि टेरेस वरून खाली वाकून पाहू लागली..तेवढ्यात तीला कोणीतरी पाठून जोराचा धक्का दिला....ती टेरेस वरून खाली पडली....आणि तिचा जीव गेला....

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - लक्ष्मीला कोणी ढकललं होत ते....)