माझा होशील ना -भाग - 18
( मागच्या भागात आपण बघितले की लक्ष्मी चा जीव जातो.....आता पुढे.....)
लक्ष्मी वरून पडली आणि तिचा जीव गेला...
जोरात आवाज झाला..... नोकर मंडळी जोरजोरात ओरडू लागली...बाईसाहेब पडल्या असं तिन्ही नोकर बोलू लागले....सगळीकडे पळापळ सुरु झाली.........
आई ला काय झालं म्हणून युवराज सुद्धा रडतं रडतं आला.....त्याच्या पाठोपाठ अनिकेत पण काय झालं बघायला आला....... घरात पोलीस आले......चौकशी चालू झाली.....
युवराज बोलला - पप्पा आणि मी एकाच रूम मध्ये झोपलो होतो....आणि आजी तर रोज दहा वाजताच झोपते ती नेहमीप्रमाणे तिच्या खोलीत झोपली होती....... ती तर तिच्या वेळेनुसारच झोपली होती.......
अनिकेत नुकताच सजा भोगून आला होता त्यामुळे सगळा संशय त्याच्यावर होता...... पण युवराज पप्पा माझ्या बाजूलाच झोपले होते हॆ अगदी जोरजोरात पटवून देत होता.... लक्ष्मी ची सासू तर खूप जोराजोरात माझी लक्ष्मी माझी लक्ष्मी गेली...असं बोलून रडतं होती....
लक्ष्मी च्या माहेरचे तर अनिकेत वर चं संशय घेत होते.... पोलीस त्यांच्या परीने प्रत्येकावर संशय घेत होते..... पण काहीच निकष लागेना....सासू तर म्हणत होती ती चुकून पडली पण असेल.....
आरोप, प्रत्यारोप खूप झाले..... आणि पोलीस एक महिन्यानंतर लक्ष्मीच्या सासूला अटक करून घेऊन गेले.....अनिकेत, युवराज सगळेच अचंबित झाले..... लक्ष्मी च्या माहेरचे बोलू लागले, तिच्या सासूबाई असं करणार चं नाहीत, त्या चांगल्या आहेत खूप..... पण लेडीज पोलीस त्यांना सरळ घेऊन गेल्या.......
अनिकेत ओरडू लागला, आई बोल ना मी काहीही केलेलं नाही आहे....पण सासू एकदम गप्प होती, ती शांतपणे त्या लेडीज पोलीस बरोबर निघू लागली.....
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - लक्ष्मीच्या सासूने तीला वरून कां ढकलून दिले होते ते.....)
