माझा होशील ना - भाग - 19
( मागच्या भागात आपण बघितले - लक्ष्मीच्या सासूला अटक केली जाते......आता पुढे....)
लक्ष्मीच्या सासूला अटक केल्यानंतर ती जे सांगते ते ऐकून युवराज आणि अनिकेत थक्क होतात....
लक्ष्मीची सासू सांगू लागते.......... लक्ष्मी एका मध्यमवर्गीय घरातली मुलगी होती, आणि अशा मुलीं अति कसला हव्यास न करता सुंदर रीतीने संसार करतात......त्यांना त्यांचा संसार त्यांचं सासर अतिप्रिय असत.......
पण लक्ष्मीची वागणूक पहिल्या दिवसापासूनच मला पसंत पडली नाही.....मला वाटलं होत, तिच्या वडिलांना चार मुलीं होत्या आणि एवढ्या मुलींची लग्न करताना तिच्या वडिलांची खर्चाच्या दृष्टीने दमछाक झाली असेल त्यामुळे त्यांनी हिला जे स्थळ आलं ते दुसरेपणाचं जरी असलं तरी आमचं घराणं श्रीमंत होत म्हणून हीच लग्न त्यांनी अनिकेत बरोबर लावून दिलं...
अनिकेत ची नोकरीं चांगली होती...माझ्या मिस्टरांच्या कृपेनें घरात पहिल्यापासूनच आर्थिक सुबत्ता होती...लक्ष्मीच्या घरची मंडळी हॆ सर्व बघून खुश झाली होती......त्यांना आमचं मोठं घरं आवडलं होत....... पण लक्ष्मीला त्या सगळ्या श्रीमंतीची चार दिवसातचं धुंदी चढली..
माहेरी सायकल ने सुद्धा फिरणारी मुलगी इथे खाली जवळच भाजीवाला असून ही गाडी शिवाय बाहेर जायची नाही.....ती स्वयंपाक घरात चुकूनही लक्ष घालत नसे..तिचे म्हणणे असे की नोकर आहेत ना सगळयांसाठी....मग मी कां जावं किचन मध्ये...नोकरमंडळीवर कामं सोपवलं की झालं...असं असे तिचं.....
नवीन नवरी म्हणून तीला घरातल्यांना काहीतरी पदार्थ करून घालण्याची हौसचं नव्हती.... ती बेडरूम मध्ये बसून नोकरांना ऑर्डर सोडत असे...त्यात तीने अनिकेतच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन वकिली करण्यासाठी त्याची परवानगी मिळवली....
ती रोज आमच्याचं गाडीने कॉलेज ला ये - जा करू लागली...तीला अनिकेत जे हवं ते सगळं घेत असे...पाच , पाच हजारच्या साड्या तीला तो घेत असे....तीला पार्लर ला दर महिन्याला तीन हजार लागत असतं...ते पण अनिकेत देत असे....तीला छान राहायला आवडत असे..अगदी छान नटून - थटून ती घरात राहत असे.... तिच्या माहेरचे पण खूप खुश असायचे तीला भेटायला आल्यावर......तिचं वागणं, बोलणं आता गर्भश्रीमंतीच झालं होत....
अनिकेतचा स्वभाव थोडा चिडका किंवा कडक होता...पण तो लक्ष्मीला कशाची चं कमी पडून देत नव्हता..लक्ष्मी म्हणाली मला पाच हजार हवेत तर तो पटकन तीला पैसे देत असे.. जास्त चौकशी करत नसे.......
पण हॆ एवढं सगळं चांगल माझा मुलगा हिच्यासाठी करत असताना हिने माझ्या मुलाच्या एका चुकीची शिक्षा म्हणून त्याला थेट जेल मध्ये पाठवलं...स्वतः च्या नवऱ्याला तीने पुरावे गोळा करून अटक करवली....तीने माझ्या एकुलत्या एक मुलाचं आयुष्य असं कां उध्वस्थ करावं...कां तर ही वकील आहॆ म्हणून...पण हिच्या वकिली होण्यासाठी ज्याने पैसे दिले तीला शिकवण्यासाठी ज्याने खर्च केला त्याच्यावर तीने केस टाकावी....
ज्या घरात ती एखाद्या राणीसारखी राहत होती..हॆ सौख्य तीला ज्याच्यामुळे मिळालं होत त्याच्यावर चं तीने केस टाकली..आणि तीला काय वाटलं ही तक्रार कोणी केली हॆ कधीच कोणाला कळणार नाही.........मला अनिकेतला अटक झाली त्याच्या दुसऱ्या दिवशीच हॆ सगळं समजलं होत.....
लेडीज पोलीस तीला मध्येच थांबवून विचारते पण तीला मारायची काय गरज होती..तीला वेगळ्या मार्गाने ही अनिकेत पासून वेगळं करता आलं असतं की......
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - लक्ष्मीच्या सासूचं ह्यावर काय उत्तर असेल ते.....)
