Login

माझा होशील ना - भाग - 20

majha hoshil na
माझा होशील ना - भाग - 20

( मागच्या भागात आपण बघितले - लेडीज पोलीस लक्ष्मीच्या सासूला बोलते - लक्ष्मीला मारायची काय गरज होती तुम्हाला - आता पुढे.....)

लक्ष्मीची सासू बोलू लागते - कां मारलं मी तीला कारण एवढ्या वर्षाचा अठरा वर्षाचा तिरस्कार, राग मनात भरून ठेवला होता मी....तो राग तीला अनिकेत पासून वेगळं करून किंवा घटस्फोट द्यायला सांगून शांतच झाला नसता......त्यात तिचं हॆ वागणं मी मनात नसूनही एवढे वर्ष सहन करत असूनही तीने काय केलं.......

माझ्या एकुलत्या एक मुलाला जेल मध्ये टाकलं......त्याच्यावर पाळत ठेवून, पुराव्यासहित त्याला तीने पद्धतशीर त्या केसमध्ये अडकवलं.........तीने त्याच्या हालचालीनंवर नजर ठेवली, तो कुठे जातो, कधी जातो, काय करतो ह्याचा तीने पाठ - पुरावा केला....


अनिकेत पहिल्यापासूनच श्रीमंतीच, सुखासीन आयुष्य जगत आला होता...त्याने तो झाल्यापासून कधीच आमच्या गाडीशिवाय दुसऱ्या कुठल्याही वाहनाने...ट्रेन, बस ने प्रवास केला नव्हता...त्याला मी पहिल्यापासूनच जे पाहिजे ते देत गेले...आणि त्यामुळेच तो कदाचित रागीट, गर्विष्ठ असा बनला असेल.......पण लक्ष्मीला तो तसा मारायचा वैगेरे नाही...फक्त कडक स्वभावाचा आहे तो.....


लक्ष्मीने त्याला अटक करवली हॆ मला माहित झाल्यापासून मला तर ती नजरेसमोर आली तरी चिडचिड व्हायची माझी....तीने माझ्या मुलाला त्या जेलच्या एवढुश्या रूममध्ये पाठवलं ते पण दहा वर्षांसाठी......त्याला मी जेलमध्ये भेटायला गेली की माझं रडू आवरत नसे....ती जेल ची खोली, त्यातला तो काळोख...हॆ सर्व माझ्या मुलाला त्याच्या बायकोमुळे बघावं लागतं होत.....


मी मान्य करते तो मित्रांच्या संगतीने त्या वाईट कामात गुंतला.....पण त्याला समजावून त्याला ओरडून मी त्याला ते कामं करण्यापासून बंदी घातली असती ना....लक्ष्मीने परस्पर गुपचूप तक्रार केली आणि त्याला पोलिसांनी पकडले....तो अनभिज्ञ असताना अचानक पोलीस तिथे पोचले त्याला पकडून नेलं.....


माझा अनिकेत जेल मध्ये गेला ती दहा वर्ष मी कशी काढली आहेत ते माझं मलाच माहित, मला प्रत्येक वेळी जेवताना पहिला घास तोंडात टाकताना अनिकेतला कसलं जेवण मिळत असेल तो काय जेवत असेल अशी चिंता सतावत असायची.....


लक्ष्मीला मी घटस्फोट द्यायला अनिकेतला सांगू शकत होती....पण त्याने काय झालं असतं...तीने फारकत घेतली असती आणि ती स्वतः आता चांगली कमवती होती तिची वकिली चांगली चालत होती....तीला तिचे चांगले पैसे मिळत होते त्यात ती घटस्फोट घेवून एकतर माहेरी गेली असती किंवा कुठेतरी दुसरीकडे रुम घेऊन एकटी निवांत, आरामात, खुशीत राहिली असती...आणि तेच मला नको होत.....

माझ्या अनिकेतला ज्या मुलीमुळे दहा वर्ष रडतं काढावी लागली तीला मी या पुढे सुखाने कां जगून देऊ....मी तीला दुःख, यातना काय असतात त्या दाखवून देणार होती....पण अनिकेत जेल मधून सुटण्यासाठी मी एक एक दिवस मोजत होती....अनिकेत एकदाचा सुखरूप घरी आला की मी मोकळी झाले असं मी सतत म्हणतं असे....


अनिकेत एवढ्या वर्षांनी सुटून आला त्यामुळे मी आता लक्ष्मीला आमच्या आयुष्यातुन दूर करण्याचे मार्ग शोधू लागले...... लक्ष्मीला मारून मी अनिकेत आणि युवराज घेऊन कुठेतरी फरार होणार होते कायमची........

लेडीज पोलीस लक्ष्मीच्या सासूला बोलते मग तुम्ही स्वतः पोलीस स्टेशनला फोन करून मला अटक करायला घरी या........माझ्या घरी या, मी माझ्या सुनेला मारलं आहे असं कां सांगितलंत.....

( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - लक्ष्मीच्या सासूने तीला टेरेस वरून कसं आणि कसा प्लॅन करून ढकलले ते.....)


0

🎭 Series Post

View all