Login

माझा होशील ना - भाग - 24 ( अंतिम भाग )

majha hoshil na
माझा होशील ना - भाग - 24 ( अंतिम भाग )

( युवराज पुण्याला निघून गेला आता पुढे.......)


अनिकेत खूप वेळ सोफ्यावर रडतं बसला होता आणि मग उठून बेडरूम मध्ये गेला आणि मग युवराजचे लहानपणीचे फोटो कपाटातून काढू लागला...तिथेच त्याला त्याच्या आणि लक्ष्मीच्या लग्नाचा अलबम दिसला तो अलबम काढून ते फोटो बघत बघत अक्षरशः ढसा ढसा रडू लागला.....


थोड्या वेळाने दहा वाजता एक नोकर आला आणि अनिकेतला विचारु लागला साहेब तुम्हाला तुमचं ज्युस आणून देऊ कां.....अनिकेत त्याच्यावर ओरडून बोलला..... जा तू काही नकोय मला.....पुन्हा विचारायला येऊ नकोसं..... नोकर बरं बोलून निघून गेला...... नोकर मंडळी मध्ये आता दोघे चं राहिले होते...एक जेवण करणाऱ्या बाई होत्या आणि एक साफ - सफाई, बाग कामं वैगेरे करायला एक दादा होते....


दुपारी एक वाजताच्या दरम्यान स्वयंपाकिण बाई जेवण घेऊन आल्या..ते पण अनिकेतने नाकारले...आणि त्यांना पण ओरडून बोलला, त्या बिचाऱ्या निमूट मान खाली घालून निघून गेल्या.........असे सतत होऊ लागले, अनिकेत जरासं काहीतरी खात असे किंवा मग तसंच ताट पाठवून देत असे....


अनिकेत उठ - सूट नोकरांवर डाफरत असे ते बघून एक महिन्याने दोन्ही नोकरांनी नोकरीं सोडून दिली...अनिकेत एकटा पडला होता...... त्याने हे सर्व विकून दुसरीकडे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला.....पण त्या घराच्या टेरेस वरून उडी मारून लक्ष्मीने जीव दिला होता.....त्यामुळे घर विकण्यात अडचणी येऊ लागल्या....


एजंट अनिकेतला बोलत असतं घर घेताना लोक आजूबाजूला चौकशी करतात...आणि काही प्रॉब्लेम असेल तर ते घर घेत नाहीत.... त्यामुळे कोणी इकडे घर घ्यायला येत नाही आहे.... अनिकेत म्हणत असे पण आता काय इथे लक्ष्मीचं भूत बसलंय काय.... लोक पण ना काहीही मनात आणतात.....



अनिकेत एकटाच राहत असे..... युवराज त्याला क्वचित चं फोन करत असे. युवराजने पुण्याला कॉलेजला ऍडमिशन घेतले होते..... अनिकेतची आई त्याच्यासाठी पैसे ठेवून गेली होती पण ते पैसेसुद्धा आता संपत आले होते....पण रूम विकली जातं नव्हती त्यामुळे अनिकेत टेन्शन मध्ये असे..शेवटी अनिकेत ने एवढा मोठा बंगला चक्क अर्ध्या किमतीत विकायला काढला....


आणि मग तीन महिन्यांनी बंगला विकला गेला.... अनिकेतने युवराज पुण्यातचं असतो म्हणून कायमचं पुण्याला शिफ्ट व्हायचं ठरवलं आणि एक वन बी एचं के चा फ्लॅट तिथे विकत घेतला.... युवराज ला जेव्हा हे कळलं तेव्हा तो खूप चिडला आणि बोलला पप्पा मुद्दामून माझ्या पाठून इथे आलात ना.... अनिकेतने त्याची माफी मागितली..... त्याच्याजवळ अगदी रडून रडून बोलला..मला माफ कर मी पुन्हा असा वागणार नाही.... पण युवराज त्याच्याबरोबर राहण्यास आला नाही....युवराज हॉस्टेलला राहत असे......


अनिकेतने उदरनिर्वाहासाठी घरातून शेअर मार्केट चं कामं करणे चालू केले... त्यातून तो त्याचा खर्च भागवू लागला... युवराजला तो अधून मधून कॉलेजला भेटायला जातं असे... युवराजला खूप समजावून शेवटी दोन वर्षाने बारावी झाल्यावर युवराज त्याच्याबरोबर घरी राहण्यास आला.... त्या दोघांमध्ये संभाषण खुपचं कमी होत असे, कामापुरते दोघे जरासं बोलत असतं....


युवराज पुढे खूप शिकला, शिकत असतानाच एके ठिकाणी नोकरीं ही करू लागला....आणि डॉक्टर झाला... अनिकेत ने आता वयाची पन्नाशी ओलांडली होती.... तो आणि युवराज एका घरात राहूनही त्या दोघात कायम एक दुरावा होता तो कधीच भरून निघाला नाही....


शिक्षण पूर्ण झालं, युवराज डॉक्टर झाला...आणि त्याने अनिकेतला सांगितलं मी परदेशीं शिफ्ट होत आहे आणि मी लवकरच लग्न करून तिकडेच कायमचा सेटल होणार आहे.... मी मुलगी बघून ठेवली आहे मी आठ दिवसांत चं तिच्याबरोबर रजिस्टर पद्धतीने लग्न करतो आहे... आणि पुढच्या महिन्यात तिकडे शिफ्ट होतोय....


अनिकेत त्याचं हे बोलणं ऐकून अस्वस्थ झाला पण काहीच नं बोलता रूम मध्ये निघून गेला....युवराज ने त्याचा निर्णय सांगितला होता आणि तो सोडून जाणार हे ऐकून अनिकेतला खूप वाईट वाटले.....


रात्री अनिकेत आणि युवराज एकत्र बसून डायनिंग टेबलवर जेवले पण कोणीच काहीच बोललं नाही...दोघे जेवून सरळ झोपायला गेले....सकाळी युवराज क्लीनिक ला जाताना अनिकेतला सांगायला गेला तर अनिकेतचा जीव गेलेला होता...त्याला झोपेतचं हार्ट अटॅक आला होता आणि त्यात तो वारला होता... स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्याने सकाळी अनिकेतला हात लावल्यावरच त्याला अंदाज आला..... अनिकेत नावाचं वादळ कायमचं क्षमलं होत.... ज्या अनिकेतमुळे एक अख्ख घर उद्धवस्थ झालं होत तो आता जग सोडून गेला होता.

लक्ष्मीने पैश्यासाठी ज्याच्या बरोबर लग्न केलं तो अनिकेत तिचा चांगला नवरा कधीच होऊ शकला नाही....उलटं त्या पैश्याच्या मोहापायी ती अजून अडचणीत सापडली आणि तिचा त्यात जीव गेला.......

अनिकेत ना कधी बायकोचा होऊ शकला ना त्याच्या मुलाचा...पैश्याची घमेंड, गर्व आणि संशयी वृत्ती ह्या सगळ्यामुळे आज तो वारल्यावर सुद्धा युवराजला जास्त दुःख झालं नव्हतं....युवराजने अनिकेतचं कार्य केलं आणि तो परदेशीं शिफ्ट झाला.......

आणि अशाप्रकारे अनिकेत आणि लक्ष्मीची ही कहाणी इथे संपते आहे.......