माझा होशील ना - भाग - 21
( मागच्या भागात आपण बघितले - लक्ष्मीची सासू सांगणार आहे तीने लक्ष्मीला कसं ढकललं ते....आता पुढे....)
लक्ष्मीची सासू बोलू लागते -........ लक्ष्मी अनिकेत घरी आल्यापासून त्याच्याशी जसं काही झालंचं नाही आहे असं वागण्याचा प्रयत्न करत होती....तो तीला टाळत होता..पण ती तरीही त्याच्याशी नीट बोलण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती...
एवढ्या वर्षाचा मनात साचलेला राग असा अचानक कसा निघून जाईल हॆ तीला समजतच नव्हते..... मला वाटलं होत अनिकेत सुटून आल्यावर तीला सरळ घटस्फोट देईल किंवा घरातून निघून जायला सांगेल.....पण अनिकेतने असं काहीच केलं नाही....
अनिकेत तीला त्रास देत नव्हता..पण तिच्याशी नीट बोलत नव्हता........अनिकेत सहीसलामत सुटून आला होता त्यामुळे मला लक्ष्मी माझ्या घरात, नजरेसमोर सुद्धा नको होती....म्हणून मग मी तीला मारण्यासाठी काय करता येईल याचाचं सतत विचार करू लागले.....
लक्ष्मीला जेवणातून विष द्यावं इथपर्यंत मी विचार करू लागले होते.....लक्ष्मीने जे केलं होत त्यासाठी मी तीला कधीच माफ करु शकत नव्हते... तीने माझं घरं उध्वस्थ केलं होत..तरी नशीब मी आजपर्यंत म्हणजे अनिकेतचे बाबा गेल्यानंतर कोणत्याच नातेवाईकांशी जवळीक ठेवली नव्हती...माझ्याकडे नोकर, चाकर होते..
अनिकेत चे बाबा जाताना भरपूर संपत्ती ठेवून गेले होते, त्यामुळे मला भविष्याची चिंता कधीच सतावली नाही...विधवा झाल्यावर संपत्तीसाठी कोणीही मला गोड बोलून लुबाडू शकत.. ह्या कारणाने मी कोणाशी संबंध ठेवले नव्हते..त्यामुळे अनिकेतला अटक झाल्यावर कोणी नातेवाईक असं कां झालं कसं झालं ही चौकशी करायला आलेच नाहीत....
अनिकेत सुटून आल्यावर मी लक्ष्मीचा काटा कसा काढायचा ह्याच विचारात असायचे.....आणि मला एके दिवशी ती संधी दिसून आली......
त्या दिवशी लक्ष्मी ऑफिस मधून आल्यावर खूप वेळ स्टडीरूम मध्ये बसून होती...मी एकदा डोकावून बघितलं तर ती खुर्चीवर बसून रडतं होती....ती त्या दिवशी जेवायला सुद्धा बाहेर आली नाही... मी तिच्यावर पाळत ठेवून होते....
घरात सर्वांना माहित होते की मी माझ्या रूम मध्ये दहा वाजताच झोपायला जातं असे...त्यामुळे कोणीही माझ्यावर संशय घेणार नव्हतं.... मी खूप वेळ लक्ष्मीवर लक्ष ठेवून होते.....त्या वेळात ती बेसावध असताना गुपचूप जाऊन तिचा गळा दाबावा कां इथंपर्यंत माझ्या मनात विचार आले....
लक्ष्मी अकरा वाजता च्या दरम्यान टेरेस वर गेली आणि पटकन माझ्या डोक्यात आलं हिला वरून ढकलून द्यावं कां...म्हणजे कोणाला काहीच कळणार नाही...सगळ्यांना वाटेल तीने जीव दिला...
टेरेस वर पूर्ण काळोख होता....लक्ष्मीने टेरेस वरच्या लाईट पण बंद ठेवल्या होत्या..ती काळोखात खूप वेळ बसली होती....मी तिच्यावर लक्ष ठेवून होते..मी गुपचूप पायऱ्या चढून वर गेले तीला समजले पण नाही...
मी सर्वात वरच्या पायरीवर एका कोपऱ्यात बसून होते....आणि अचानक लक्ष्मी उठून उभी राहिली आणि टेरेस वरून वाकून खाली बघू लागली...मी पटकन जाऊन ती बेसावध असताना तीला वरून ढकललं.... ती पडली आणि तिचा जीव गेला...मी कोणाला काही कळायच्या आत म्हणजे दोन मिनिटाच्या आत माझ्या रूम मध्ये येऊन पडून राहिले....
पण एक चूक झाली होती...मी लक्ष्मीला ढकललं तेव्हा समोरच्या बंगल्यातल्या वॉचमेन ने मला बघितलं होत...त्याने माझा चेहरा ओळखला होता...
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत -- असं सर्व घडलं असताना लक्ष्मीची सासू स्वतः गुन्ह्याची कबुली कशी देते....)
