माझा होशील ना - भाग - 22
( मागच्या भागात आपण बघितले - लक्ष्मीला तिच्या सासू ने वरून ढकललं होत तेव्हा समोरच्या बंगल्यातल्या वॉचमन ने बघितलं आता पुढे.....)
सासू बोलू लागते - मी लक्ष्मीला ढकललं ते त्या वॉचमन ने अगदी बॅटरी मारून वर बघितले त्या बॅटरी चा प्रकाश माझ्या तोंडावर पडला होता..आणि त्याने मला चांगलंच ओळखलं....मी घाबरले होते...पण म्हंटल आधी खाली जाऊन रूम मध्ये जाऊन पडते आणि मग काय होत ते बघूया....मी पटकन खाली आहे आणि रूममध्ये पडून राहिले....थोड्या वेळाने नोकर ओरडत आला बाईसाहेब वरून पडल्या....बाईसाहेब असं ओरडत तो बाहेर गेला....
अनिकेत आणि युवराज पण काय झालं ते बघायला बाहेर गेले आणि मग थोड्या वेळाने त्यांच्या मागोमाग मी बाहेर गेले....... लक्ष्मी मेली होती....थोड्या वेळाने पोलीस आले त्यांचा संशय अनिकेतवर होता...पण युवराज अनिकेत ची बाजू घेऊन ठामपणे बोलत होता की पप्पा माझ्या बाजूला झोपले होते......आणि आजी तर रोज दहा वाजताच तिच्या रूम मध्ये जाऊन झोपते....
लक्ष्मीचं प्रेत नेण्यात आलं...मी मनातून म्हंटल चला ह्या असल्या मुलीच्या त्रासातून माझं घरं कायमचं सुटलं...पण मनात एक भीती होती की तो समोरचा वॉचमेन काही पोलिसांना बोलला तर....आणि लक्ष्मी मेल्यापासून तो मला दिसलाच नव्हता..तो त्याच्या नोकरीवर ही त्या दिवसापासून आला न्हवता....
मी मनातून थोडी घाबरले होते...पोलीस रोज घरी चौकशीला येत असतं...अनिकेत आणि युवराजला प्रश्न विचारून भंडावून सोडत असतं...त्यात लक्ष्मीच्या माहेरच्यांचा अनिकेतवर संशय होता...त्यामुळे त्याची कसून चौकशी केली जातं होती...पण अनिकेत म्हणत असे मी नुकताच दहा वर्ष जेल मध्ये काढून आलोय मी लक्ष्मीला मारून पुन्हा त्या नरकात जाण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही....आणि ते ही बरोबरचं होत म्हणा अनिकेत ने दहा वर्ष बाहेर पडण्याचा दिवस येण्याची वाट बघितली होती....
माझं वय बघता आणि मी लक्ष्मी गेल्यावर तिच्यासाठी खूप रडून रडून आजारी पडल्याच नाटक केल्यामुळे माझ्यावर कोणीच संशय घेतला नाही......... युवराजला अनिकेत कुठे होता एवढे वर्ष ते आता कळले होते..त्याने केलेला गुन्हा पण समजला होता..
मला लक्ष्मी गेल्यावर युवराज ने हा प्रश्न विचारला आणि मी त्याला सगळं खरं सांगून टाकलं तो खूप रडला पण आई बरोबर होती हा एवढा मोठा गुन्हा पप्पांनी केलेला असताना एक वकील त्यांना कसं सोडेल...त्यांना तीने दिलेली शिक्षाचं योग्य होती....असं तो बोलू लागला...
मी त्याच्यावर चिडून बोलले पण तुझ्या बालपणात तुला कुठेच तुझ्या पप्पांची साथ लाभली नाही ना आईमुळे....आई ने त्यांना जेल मध्ये टाकलं...आणि तुला पाच वर्ष ते पंधरा वर्ष पप्पांची संगत लाभली नाही.......युवराज बोलला आजी झालं ते झालं आता......माझी आई पण मला सोडून गेली...ती अशी जीव देणारी नव्हती..लढणारी होती...पण कां केलं तीने असं......असं बोलत रडतं रडतं तो त्याच्या रूम मध्ये गेला.....
असाच एक महिना गेला, आमच्या घरचे फोन पोलिसांनी रेकॉर्ड केले असणार हॆ मला माहित होते.....आणि एक दिवस अचानक त्या वॉचमन ने घरच्या फोनवर फोन केला मी तिथे जवळच बसले होते मी च तो फोन उचलला...
मी हॅलो बोलायच्या आत त्या वॉचमेन ने सांगायला सुरवात केली बाईसाहेब मी आज जाऊन पोलिसांना सगळं सांगणार आहे...मी बाईसाहेब पडल्या आणि त्यांना तुम्ही ढकललंत ते पाहून मी गेले महिनाभर पार हादरून गेलो आहे..माझ्या डोळ्यांसमोरून ते दृश्य जातं च नाही आहे...त्यामुळे मी महिनाभर नोकरीवर देखील आलेलो नाही आहे....मला झोप लागत नाही आहे.....मला लक्ष्मी बाईसाहेब डोळ्यांसमोर सतत दिसतात...मी आजच्या आज पोलीस स्टेशन ला जाऊन सगळं सांगणार...मी काही बोलायच्या आत त्याने फोन ठेवला देखील....
मी समजून चुकले होते की आता माझी ह्यातून सुटका नाही..पोलीस घरी येणार मला ओढत नेणार त्यापेक्षा आपण स्वतःच गुन्ह्यांची कबुली द्यावी आणि मी पोलीस चौकीत फोन करून सांगितलं की मला अटक करायला या..मी माझ्या सुनेला मारलं आहे....
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - या सगळ्यावर अनिकेत आणि युवराज ची काय प्रतिक्रिया असेल ते....)
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा