माझा होशील ना - भाग - 23
( मागच्या भागात आपण बघितले - लक्ष्मीची सासू सर्व सत्य सांगते आता पुढे.....)
लक्ष्मीची सासू बोलू लागते - मी लक्ष्मी मेल्यावर आणि हॆ सर्व प्रकरण निपटल्यावर अनिकेत आणि युवराज ला घेऊन दूर जाणार होते आणि अनिकेतला एक छोटासा कुठला तरी बिजनेस चालू करायला सांगणार होते....
पण माझा प्लॅन फसला आणि त्या वॉचमेन ने मला बघितले - मला वाटलं होत तो भीतीने कोणाला सांगणार नाही, कारण मग त्याला कोर्ट, जबानी ह्यासाठी सतत पोलीस स्टेशन ला जावे लागणार आणि बरेच लोक ह्या सर्व गोष्टींसाठी तयार नसतात...बरेच लोक कोर्टाची पायरी चढायला अजूनही घाबरतात...
वॉचमेन मात्र त्या दिवसापासून नोकरीवर आला नाही हॆ पाहून मी मनातून चरकले होते...मी रोज त्याच्या येण्याची वाट बघत होते.....पण तो एक महिनाभर आलाच नाही आणि मग त्याने हा कॉल केला........आणि मी काही बोलायच्या आत चं सगळं सांगून मोकळा झाला आणि मी अडकले....
अनिकेत हॆ सगळं ऐकून सुन्न झाला...आणि थोड्या वेळाने बोलला आई मी ह्या जेल मध्ये दहा वर्ष कशी काढली ते माझंच मला माहीत पण तू लक्ष्मीचा खून केलास तुला जन्मठेप होईल अगं...तू कायमची आत अडकून पडलीस आता....तू असं न करता मला एका शब्दाने बोलली असतीस ना तर त्या लक्ष्मीला मी घरातून, माझ्या आयुष्यातून बाहेर काढले असते अगं.....
युवराज रडतं रडतं बोलला आजी माझ्या आईला तू मारलसं...कां केलंस असं...कां.......
लक्ष्मीच्या सासूला ( जानकी बाईना जेल झाली ) त्यांना जेल च्या रूम मध्ये टाकण्यात आले....
अनिकेत आणि युवराज घरी आले..... अनिकेत सोफ्यावर बसून खूप रडला...आणि युवराजला बोलू लागला...युवराज मला माफ कर...आजचा हा दिवस तुला माझ्यामुळे बघावा लागत आहे...... ह्या सर्वात माझा चं दोष जास्त आहे.... माझ्यामुळे हॆ सगळं घडलं......
युवराज बोलला पप्पा तुमच्या एका चुकीमुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्थ झालं आहे आपलं...मी कोण तुम्हाला माफ करणार...तुम्ही एका चुकीने हॆ सगळं विस्कटून टाकलंय...मी पहिलं तुमच्या प्रेमाला दहा वर्ष मुकलो आता आई च्या प्रेमाला कायमचा मुकलो...ह्या सगळ्यात मला सजा मिळालीय...
मी हुशार असूनही अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाही आहे त्याला कारण तुम्ही आहात......त्यामुळे मला आता इथे राहायचं नाही आहे...माझं कुठेतरी लांबच्या कॉलेजला ऍडमिशन करून दया तुम्ही....मी इथून दूर राहून माझं शिक्षण पूर्ण करणार आहे....मला तुमच्यासोबत राहायचं नाही आहे....आणि मी माझ्या निर्णयावर अगदी ठाम आहे...मी शिक्षणासाठी बाहेर जाणार म्हणजे जाणार..... युवराज असं बोलून त्याच्या रूममध्ये निघून गेला....
इकडे अनिकेत त्याची हि वाक्य ऐकून घाबरला होता.....त्याच्यासाठी हा धक्का चं होता....माझा युवराज मला एकटयाला सोडून जाणार..आणि मी इथे एकटा कसा राहू, काय करू...मला नोकरीं नाही...आईचे साठ्वलेले पैसे तर खूप आहेत...पण माझ्यासोबतीला कोणीच नाही... जर कोणच नसेल तर या खूप पैश्याचा काय उपयोग मग....असा विचार करून त्याच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं....आणि मग विचार करता करता त्याला रात्री उशिरा झोप लागली....
दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला आठ वाजता च्या दरम्यान जाग आली तर हॉल मध्ये दोन बॅग्स भरून ठेवलेल्या होत्या....अनिकेतने नोकराला आवाज दिला आणि विचारलं ह्या बॅग कोणी भरून ठेवल्या आहेत..तर तो बोलला युवराज साहेब कुठेतरी निघालेत....अनिकेत शॉक झाला आणि त्याने जोरात, ओरडून युवराज ला हाक मारली.....
युवराज शांतपणे बोलला मी माझ्या मोठ्या मावशीकडे पुण्याला जातोय काही दिवसांसाठी...तशी हि माझी दहावीची परीक्षा झाली आहे... आणि माझ्याकडे माझे पैसे पण आहेत आजी मला तिचे पासबुक आणि तिचे व्हयवार सगळं सांगून गेली आहे, मी तिच्या पैश्याचा माझ्या शिक्षणासाठी योग्यच वापर करेन......आणि अजून एक मी सुट्टी संपल्यावर तिथेच कॉलेजला ऍडमिशन घेईन........युवराज एवढं बोलून निघाला पण..अनिकेत रडून त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत होता...पण युवराज निघून गेला.....
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - एकटं पडल्यामुळे अनिकेतची काय हालत होते ते....)
