सिएटलच्या साधारण दक्षिणेला माऊंट रेनिअर ही साधारण १४,४७० फूट उंच पर्वत रांग आहे. ती माऊंट रेनिअर नॅशनल पार्क मध्ये आहे. आम्ही फक्त एकच दिवस हाताशी असल्याने पॅराडाईज पॉईंट जवळची काही स्थळे बघितली, जस Myrtle फॉल्स, Reflection लेक, आणि थोडंफार हायकिंग केलं.
ती स्वच्छ हवा, लख्ख सूर्यप्रकाश, त्यात न्हाहून निघालेली झाडं, उंच हिमाच्छादित Mt. Rainier च शिखर, त्याच्या पायथ्याशी अंथरलेला हिरवागार गालिचा आणि त्यावर मध्येच कुठे फुलांची नाजूक नक्षी, चढ चढताना दम लागला तर वाईच विश्रांती घ्यायला आणि पाय बुडवायला छोटे लाहानखानी धबधबे (फॉल्स ), ओहोळ , एखादा चढ खूपच उभा आणि अवघड वाटला म्हणून धापा टाकत वर जाऊन बघाव तर नजर जाईल तोवर पसरलेले हिरवे गालिचे, आणि थंड वाऱ्याची झुळूक, मध्येच एखादं चुकार फुलपाखरू, हरीण, किंवा सुळकन गेलेली खार.
जे नैसर्गिक सौंदर्य अनुभवायला मिळालं ते जमेल तस कॅमेरात कैद करण्याचा प्रयत्न केला पण जो कित्येक अंशी तोकडा वाटतो.
विमानातून दिसलेला Mt. रेनिअर