मागच्या भागात आपलं पाहिलं मिहिर व रागिणीच लाईफ...... ऑफिस व इतर........आता पुढे!!
असेच छान दिवस जात होते, रागिणीला कविता करायची खूप आवड होती, ती जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कविता करायची, तिच्या या आवडली साथ होती मिहिरची, त्याला माहित होते तिचे कवितेचे वेड अगदी कॉलेजमध्ये असल्या पासून होते. तिचा हा छंद तिने जोपासला होता, तिला कविता लिहून खूप वेगळाच आनंद मिळत असे, ती ऑफिस, घर सांभाळून हे सारे करत होती.
तिला आवडायचे कविता लिहीत बसायला त्याही वेगवेगळ्या विषयांवर!!!!!!! खरतर आपल्याला समजून घेणारे, प्रोत्साहन देणारे, नीट मार्गदर्शन करणारे कोणी आपल्या सोबत असेल, तर वाट किती ही खडतर असली तरी आज ना उद्या योग्य दिशा सापडते........????????असच छोटे स्वप्नं रागिणेचे होते, ती फक्त मिहिर ची पत्नी आणि सासू सासरे यांची सून, वहिनी, एक बहीण, काकी, मामी, मुलगी ही सारी नाती योग्य आणि व्यवस्थित सांभाळत होती पण तिला तिचे स्वतःचे अस्तित्व बनवायचे होते, एक वेगळी ओळख निर्माण करायची होती, कारण आज सारे तिला मिहिर ची पत्नी म्हणून ओळखत होते, बस हीच ओळख तिला वेगळी निर्माण करायची होती, आणि म्हणून तिचा हा छोटासा प्रयत्न ती करत होती, आपण स्वप्नं बघतो बस गरज असते आपल्या स्वप्ननांना उंच भरारी घेण्याची, अथांग पसरलेल्या आकाशात आपल्या स्वप्नांना उत्तुंग भरारी घेण्याची????️.
तिच्या या स्वप्नांना घरच्यांची साथ होती, पण अजून एक व्यक्ती होती जी तिच्या सोबत तिच्या प्रत्येक क्षणी, चांगल्या वाईट प्रसंगांत, आनंदाच्या वेळी होती ती म्हणजे फेसबुक वर झालेल्या एका मैत्रिण ग्रुप ची सखीची, तिची आणि या नव्या सखीची ओळख जरी एका माध्यमातून झाली असली तरी तिला या सखी सोबत का कोणास ठाऊक खूप आपूलकीचे नाते आहे असे वाटत होते, ...............अश्या तिच्या त्या सखीचे नाव होते आकांक्षा, हो तिची एक नवी पण आपलीशी वाटणारी सखी. ज्या सखीमुळे तिला पुन्हा नव्याने स्वतः शी ओळख झाली होती, ज्या आकांक्षाला ती कधीच भेटली नव्हती, तिची आणि आकांक्षाची मैत्री दोन वर्षे फेसबुक वरून झाली होती मग व्हाट्सएपच्या द्वारे गप्पा आणि चांगल्या विचारांची देवाण घेवाण,कसलाच खोटेपणा नाही, मोठेपणा नाही, केवळ निखळ आणि निर्मल मैत्रीचे नाते, जे विश्वास आणि आपलेपणा वर टिकले होते. तस पाहायला गेले तर आपले इतके मित्र मैत्रिणी असतात पण आपल्या आनंदात आनंद मानणारे, आपल्याला प्रोत्साहन देणारे असे फारच कमी आणि मोजकी लोक असतात. हो ना !! काही तर आपल्यावर जळणारे पण असतात. नेहा जी ऑफीसची मैत्रीण होती पण तिने कधिच रागिणीला प्रोत्साहित नाही केलं पण आकांक्षा ने केेल.
आपल्या कलेला वाव देणारे, प्रेरणा देणारे, लिखाण करण्यासाठी उत्तेजित करणारी फारच दुर्मिळ आहेत, पण आपल्याला पावलोपावली टोचून बोलणारी आपलेच लोक जे खोटेपणाचा मुखवटा घालून मिरवत असतात, (नेहा सारखे)आपल्या यशात सहभागी न होता आपल्याला कसे खाली पाडत येईल, आणि आपल्याला त्रास कसा देता येईल अशी मुखवटा घातलेली लोक आपल्या आजूबाजूला खूप भेटतील, पण आकांक्षा सारखी निस्वार्थ भाव मनात असणारी लोक फारच कमी असतात. आज रागिणी जवळ खूप मैत्रिणी मित्र होते तिला त्यांच्या कडून चांगले - वाईट अनुभव आले होते, म्हणूनच ती सहसा जास्त कोणावर विसंबून नव्हती, पण आकांशा जिला तिने न भेटता मैत्री निभावली, विश्वास ठेवला कारण अस म्हणतात आपलेच लोक केसांनी गळा कापतात........तिला म्हणून जास्त कोणावर विश्वास नव्हता, पण आकांक्षाला भेटल्या पासून हे सारे मनातून निघून गेले होते. अशी होती त्या दोघींची निखळ मैत्री............
मिहिर ने जातीने लक्ष घालून तिला तिचे स्वतःचे एक मस्त कवितांचे पेज बनवून दिले( जिथे तिच्या कविता, तिचे विचार ती व्यक्त करू शकते).खरच मिहिर चे योगदान तिच्यासाठी महत्वाचे होते, तिच्या इतर खूप मैत्रीण होत्या पण मिहिर,आई, बहीण आणि ही ऑनलाईन वाली नवी सखी आकांक्षा. तिचे हे छोटे विश्व तिला आपले जवळचे वाटू लागले, फसव्या या जगात वावरताना कुठे तरी आपल्या या जगात ती आनंदाने जगायला शिकत होती, नव्या संकटांना न घाबरता न डगमगता लढायला शिकत होती, तिला माहीत होत तिची हीच प्रेमाची माणसे तिच्या सोबत होती, रागिणीच्या कविता आज ती स्वतः च्या पेज वर लिहीत होती, आज तिची केवळ ओळख मिहिरची पत्नी न राहता कवियत्री रागिणी अशी झाली होती......
तिच्या कवितेचं आज तिने एक पुस्तक प्रकाशित केले.......
एक छोटं स्वप्नं आज खूप मोठं झालं होतं.....
अस म्हणतात कि एक स्त्री हि एका स्त्रीची चांगली मैत्रीण होऊ शकत नाही, स्त्री ही दुसऱ्या स्त्रीची शत्रू असते पण या सगळ्याला खोट ठरवले या दोघींच्या मैत्रीने, आणि ही म्हण कुठेतरी आज रागिणी आणि आकांक्षाला लागू पडत नव्हती. कारण या दोन मैत्रिणींचे स्वभाव, विचार करण्याची पद्धत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे दोघी उत्तम व्यक्तिमत्त्व होत्या, आज रागिणीच्या यशात आकांक्षाचा सुद्धा मोलाचा वाटा होता, तिचे मार्गदर्शन नसते आणि मिहिरची साथ तर रागिणी फक्त तिथेच थांबली असती, पण म्हातातत ना जे नशिबात असते ते नक्कीच मिळ. अजून एक ऐकले आहे ते म्हणजे असे कि जेव्हा दोन चांगल्या गोष्टी एकत्र येतात तेव्हा एक पॉसिटीव्ह एनर्जी तयार होते........ अशीच होती रागिणीची आणि आकांक्षाची निखळ मैत्री......
कस असताना आपल आयुष्य वळणावळणाचा, प्रत्येक नवे वळण आणि नवी व्यक्ती आपल्याला एक धडा किंवा आयुष्य भराची शिकवण देते....... अस म्हणतात एका पुरुष मित्रांची मैत्री जन्मभर टिकते पण स्त्रियांची नाही.........पण मला नक्कीच अस वाटत रागिणी आणि आकांक्षा सारख्या अश्या लाखो मैत्रिणी असतील ज्या एकमेकींना साथ देऊन सांभाळून घेत असतील!!!!! ज्यांची मैत्री या खोट्या व्याख्या बदलून टाकत असतील, अशीच प्रत्येक स्त्रीची एखादी तरी आकांक्षा सारखी मैत्रीण असावी असे प्रामाणिकपणे वाटते. होना!!!! आपल्या आयुष्यात कोण येणार हे नशीब ठरवते कारण ते आपल्या हातात नसते, पण नशिबाने आलेली व्यक्ती जोडून ठेवणे हे आपल्या हातात मात्र नक्की असते.????????
मैत्री तुझी माझी ????????
मैत्री तुझ्या सुखात वाटा मागणारी
मैत्री तुझ्या दुखात साथ देणारी
मैत्री तुझ्या माझ्या संवादात झालेल्या त्या निखळ हस्स्याची
मैत्री तिच तुझ्या माझ्या संवादात झालेल्या आठवांची
मैत्री तुझ्या माझ्या विचारांची
मैत्री आपुलकीची
मैत्री प्रेमाची
मैत्री काळजी घेणारी ..
मैत्री काळजीवर न हसणारी ..
मैत्री श्वासाची
मैत्री विश्वासाची
मैत्री तुझ्या माझ्या आठवणींची
मैत्री आयुष्य बिघडवणारी ..
मैत्री आयुष्य घडवणारी सुद्धा ........
मैत्री तुझी माझी????????????
कसा वाटला हा लेख? जरूर कळवा!!
@श्रावणी देशपांडे✍️
गोष्टी मनातल्या♥️
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा