Login

माझी राधा सापडली भाग 1

Majhi Radha
माझी राधा सापडली

भाग 1

"स्वाती, स्वरा तुमची निवड झाली आहे ह्या नाटकात ,तुम्ही दोघी ही आता फुल्ल तयारी करा ,सराव करावा.. नाहीतर मागच्या वेळी जे झालं ते ह्या वेळी होता कामा नये.. समजलं का तुम्हाला..." वेदांत निवड झालेल्या दोघी मैत्रिणींना दटाऊन सांगत होता

दोघींच्या आनंदाला पारा नव्हता...मस्तच निर्णय दिला होता परीक्षण कर्त्या शिक्षक लोकांनी.. ज्यात एकीला वगळून एकीला घेतले असते तर दोघी नाराज झाल्या असत्या... मैत्रीत दुरावा निर्माण झाला असता.

स्वाती स्वार्थी ,अहंकारी कामापूर्ती मैत्रीण ,पण दिसायला उजवी..सुंदर ,उंच गोरीपान..बोलणे नुसते गोड.. मुलं फिदा होत..तिला अशी मैत्रीण हवी होती जी तिच्या पुढे पुढे करेन..


तशीच होती अगदी स्वरा..गोड मुलगी..मनाने चांगली..थोडी सावळी.. प्रेमळ ,जीवाला जीव देणारी..कोणावर ही सहज विश्वास ठेवणारी..स्वतःबद्दल विश्वास कमी असलेली..एकच तळमळ मैत्री टिकावी..

कॉलेजमध्ये ह्या चर्चेला उधाण आले होते की ह्यात स्वातीला घ्याला नको होते पण स्वरामुळे घेतले होते...त्यात त्या दोघी फक्त सुर्यासाठी वेड्या असल्याने दोघी खूप मेहनत घेत होत्या..

सुर्या तो तर ह्या दोघींना भाव देणार नाही ,त्यात त्याला आपल्या सरावातून वेळ मिळत नाही..तो फक्त ह्या कॉलेजमध्ये शिकला आहे ,आणि आपल्या कॉलेज ची शान दरवर्षी प्रमाणे अबाधीत ठेवायची आहे म्हणून येतो..नाहीतर अश्या त्याच्या मागे वेडावलेल्या किती तरी मुली आहेत...ह्या स्वरा स्वाती तर काय त्याच्या मागे लागल्या तरी त्याला भाव देणाऱ्या इतर मुलींसारख्याच असतील...इतर मुलींच्या संख्येत दोन वेड्या मुलींची वाढ ,भरीत भर पडणार आहे...तो एकीला ही भाव देणार नाही हे नक्की..


"मला तर खरंच वाटत नाही ,आपली निवड झाली आहे ह्या नाटकात.." स्वरा स्वातीला मिठी मारत

स्वाती तिला नेहमी सारखी तुच्छ नजरेने बघत होती ,आणि चेहऱ्यावर गूढ स्माईल देऊन तिची मारलेली मिठी सोडून तिला म्हणाली.."ते ठीक आहे पण आता निदान तुझ्या मुळे नाटक फसायला नको हे मात्र कर..कारण तुझी काही मेहनत नसते..तुझी लायकी नसतांना... तुझ्यात काही खास हूनर नसताना ही तुला घेतले आहे...निदान त्याचे श्रेय त्या शिक्षक लोकांना दे...बाकी तू बॅक फूट वर रहा..मुख्य पात्र घेण्याची हिम्मत करू नकोस...कारण त्यातील हिरोची जी मुख्य नायिका असेल ती मीच असेल"


स्वरा आता दुःखी झाली होती ,आपली मैत्रीण किती बदलली होती...तिला आपला राग राग का यावा...त्यात माझा दोष काय.. मी काय केले आहे असे...मी काय करू म्हणजे माझी मैत्रीण मला परत पहिल्या सारखी पुन्हा बोलेल ,ती माझीच होऊन राहील...? किती जीव आहे माझा तिच्यावर तरी तिने असे का झिटकरून लावावे मला...माझ्या आयुष्यात तिची किती मोठी जागा आहे.. आणि तिच्या आयुष्यात माझी जागा फक्त राग, द्वेष, हेवा, मत्सर..आणि तुच्छ वागणुकीने घेतली आहे... मग ते मैत्रीतले प्रेम कुठे विरले...?

"मला फक्त तुझ्या सोबत वेळ मिळावा म्हणून मी नाटकात भाग घेतला आहे स्वाती मी तुला ह्या काही दिवसात गमावल्या सारखे वाटत आहे म्हणून मी म्हणाले सरांना मी हवी ती मेहनत घेईल सर पण मला स्वाती सोबत नाटकात घ्या...! " स्वरा जीव ओतून स्वतःची बाजू मांडत होती..

"राहू दे ,तुला नेहमी मला ग्रहण लावायचे असते..माझे थोडे काय कौतुक झाले ते तुला बघवत नसते... मी जरा झेप घ्यायला गेले की तू ही तीच ,तिथेच झेप घेणार...तुला माहीत आहे मी तुझ्या पेक्षा कैक पट सरस आहे ,चांगली आहे..पण तुला जळकी लागते मी कुठे ही सरस ठरल्यावर..." स्वाती खूप तोडून बोलत होती

"मी नाही ग तशी, तुझी सोबत हवी असते म्हणून नाटकात भाग घेतला.."

"रडून काय दाखवतेस स्वरा राणी..?"

"मला सहन नाही होत तुझे हे असे मनाला त्रास देणारे बोलणे.." स्वरा

"तू इथून जा हा इमोशनल drama करू नकोस ,सगळे बघत आहेत आपल्या कडे..जा तयारी कर.." स्वाती उद्धट उर्मट स्वार्थी होती ,वागण्याची बोलण्याची पद्धत नव्हती. काम पडले की जवळ करायचे आणि पुढे गेल्यावर मागच्या त्याच कामी पडलेल्या माणसाला विसरायचे

-----------

स्वाती आणि स्वरा ह्यांच्या ह्या संवादातून सगळे बाजूला झाले..त्यात स्वरा कशी मूर्ख म्हणून तिला हेटाळू लागले.

"मी आहे म्हणून मैत्री टिकली आहे..पण सतत कशी सांभाळून घेऊ हिला..?" स्वाती रूपाली ला म्हणाली

"तुम्ही तुमचे बघा बाबा..मी नाही पडणार ह्यात." रुपाली

स्वाती म्हणाली "मी हिची मैत्रीच तोडून मोकळी होणार..आपण आपले बघायचे की तिचे रड गाणे ऐकायचे..पायात बेडी असते तशी ती..नाटक दूर दूर पर्यंत येत नाही..पण हे नाटकं छान जमते.."

"प्लिज नको ओढू मला ह्यात ,प्लिज.!" रूपा

"कसली ग तू ,मी मस्त मूड मध्ये आहे ,आणि तू ऐकत ही नाहीस.." स्वाती

रुपाली आता हिच्याच रडगण्याला वैतागून हॉल मध्ये निघून जाते.. सगळा वेड्यांचा बाजार त्यात स्वाती अति शहाणी ,जणू तिला खूप नाटकातले येते..ती स्वरा तरी बरी..मदत करशील का म्हंटले तर लगेच हातचे ठेऊन येते मदतीला..म्हणूनच ह्या स्वातीचे तिच्या विरुद्ध बोलणे ऐकून घ्यावे वाटत नाही.. कुचकी आहे नुसती नंबर एक ची..