भाग दोन
माझी राधा सापडली
स्वाती हेकेखोर तशी स्वरा गोड..
कसा जमेल मैत्रीचा जोड..
स्वार्थ आणि अहंकार आला की नाते ओझे वाटू लागते.. मैत्रीत ही तेच..मी मी आणि माझे माझे..सगळीकडे मीच असावी..माझेच नाव असावे..
"नाटकात कोणाला लीड रोल द्यायचा आता सुर्या ठरवेल.." वेदांत
सगळ्यांनी त्याचे निर्णय ऐकत सोबत होकार दिले..
"बरोबर तोच येईल आणि ठरवेल कोणत्या डोकेदुखीला त्याची राधा म्हणून निवडायचे ते." रुपाली म्हणाली
"पण त्यात एकच डोकेदुखी आहे, स्वाती.." प्रवीण
"अरे माहीत नाही का मला ते, पण स्वरा घेतले तर तरी ही डोकेदुखीच उद्धभवणार नाही का.?"
"हो ती महा माया आडवी येणार..आणि तिला स्वतःला केले तर ती आपली डोकेदुखी ठरणार..सगळ्यांना कामाला लावणार..हुकूम करणार.." वेदांत हसत म्हणाला
सगळे चर्चा करत होते..मुळात आता हा ताप ,हा प्रश्न सुर्या कसा हाताळणार ह्या कडे लक्ष लागले होते.
"सुर्या कुठे आहेस..?"वेद
"कॉलेजमध्ये आहे ,आलोच!!"
"तू ये आणि सुरू कर एक एक रोल द्यायला." वेदांत
"अरे येऊ तर दे मला आत.." सुर्या
इकडे सुर्या जो ह्याच कॉलेजमध्ये शिकलेला होता ,तो दरवर्षी प्रमाणे नाटकात भाग घ्यायला आणि नाटक बसवायला मुद्दाम येत...त्याची सर्वांना माहिती होती..त्याला सगळे ओळखत होते..
दिसायला हँडसम, राजबिंडा..सरळ स्वभाव..आणि खरे तेच बोलणार.. मग कोणाला किती ही राग येवो..त्याची बोलण्याची शैली खूप खास होती..कोणी ही लगेच प्रेमात पडत..त्याचे बोलणे सहसा मुली लगेच आपले मन लावून ऐकत..तो मात्र अजून ही कोणाच्या प्रेमात पडला नव्हता.. तशी त्याची नायिका त्याला भेटली नव्हती.
इकडे स्वरा स्वाती त्याच्या साठी अनोळखी होत्या ,नवीन फ्रेश बॅच होती त्यांची म्हणून तो ओळखत नव्हता..पण स्वाती मात्र ओळखून होती..त्याचे खूप नाव ऐकले होते.. बाकी काही असो तो दिसायला भारी डॅशिंग होता म्हणून त्याच्या बद्दल आवड निर्माण झाली.
इकडे तो आत शिरत होताच तोच स्वरा येऊन त्याला धडकून गेली..तिच्या धक्क्याने त्याचा मोबाईल पडला..पण ती तरी थांबली नाही..
पाठमोरी तिची आकृती बघतच राहिला..तिचे छान सुंदर केस..तिच्या पाठीवर सळसळत होते..मध्यम उंची असणारी ती..सुडोल बांध्याची..चंचल मुलगी अशी कोणत्या घाईत पळत आहे त्याला तिला बघून वाटले.. साधे पाहिले पण नाही कोणाशी आपली टक्कर झाली आहे ते.../ टक्कर झाली नाही दिली मॅडम ने जबर टक्कर../ फोनला काही झाले नाही नशीब नाहीतर तिला पळत गाठले असते..
पण खरंच सुंदर होती ती...तिची लांब ओढणी..लांब केस..सुडोल बांधा...निम सावळी ,पण मनात भरली...माझ्या नाटकाची राधा अशीच असायला हवी..जशी ही..त्यात कोणता परफ्युम होता की मी त्याच्या मुळे पुरता शांत झालो...मला ही मुलगी हवी आहे राधा म्हणून.
"अरे काय रे काय बघतोस तिकडे, मी इकडे आहे समोर तुझ्या.." वेदांत
"राधा टक्कर देऊन गेली बघ जस्ट.." तो
"तू काही ही विचार करू शकतोस, कुठे त्या दोन ज्या राधा होण्याची वाट बघत आहेत ,आणि कुठे कोण ती टक्कर मारून गेलेली राधा तुला मनात भरली आहे...कमाल आहेस.." वेद
"नाही हीच राधा हवी आहे मला, देशील.." सुर्या
तिने धावपत पळत येऊन अचानक त्याला टक्कर काय दिली आणि त्याची राधा त्याला तिच्यात दिसली.. वेड म्हणावे ते हे असेल...हीच खरी राधा म्हणत त्याने सगळ्यांना सांगितले...राधा मला सापडली आहे पण मला ती शोधायला मदत करा ..
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा