भाग 3
माझी राधा सापडली
इकडे त्याला वेड लावून गेलेली राधा म्हणजे नेमकी कोण होती हे कोणाला ही समजत नव्हते..
कोण होती ती मुलगी जिच्या मध्ये सूर्याला राधा दिसली.??
नाटकासाठी जमलेले सगळे तिथे हजर होते.. फक्त त्या दोन नवीन मुली नव्हत्या
"कुठे गेल्या ह्या दोन मुली ??" वेदांत
"अरे ती इथेत तर होती, तिला बोलवा कोणी तरी.." रुपाली म्हणाली
"ही वाली जी आहे ती सुंदर आहे सुर्या अगदी तुला वाटेल हीच राधा व्हावी तुझी.." वेदांत म्हणाला
सुर्या बसून होता ,कधी उठून तिला त्याची नजर शोधत होती..जिथे टक्कर झाली तिच्याशी त्या तिकडे सतत नजर जात होती
"आपली सगळी टीम मला इथे आत्ता हवी आहे,वेळ नाही मला की मी खुद्द त्यांची वाट बघत बसेल..नाहीतर त्यांना माहीत नाही मी त्यांची वाट लावेल..त्यांना सरळ आउट करून दुसऱ्या कोणी मुली निवड करून घेईल.." सुर्या रागावत म्हणाला
सगळ्यांनी आता त्यांना फोन लावायला सुरुवात केली होती, तितक्यात सुर्याला वेदांत म्हणाला तू हा नंबर घे तूच कॉल कर आणि बोलव त्यांना..
"ही स्वाती कोण आणि कशी आहे.." सुर्या
"सुंदर दिसते,उंच आहे ,गोरी आहे.."
"केस कसे आहेत तिचे.?" सुर्या
"ते तर छोटे आहेत रे.."
"नखरे कसे आहेत मॅडमचे..? " सुर्या
"जबरदस्त attitude देते.." वेदांत
"तुला काय वाटते तिच्या बद्दल." सुर्या
"गुड ,तिला करू शकतोस राधा.?"
"मी ठरवणार रे ,तू नको सांगू मला..राधा कोणी एरिगैर नव्हती ,ती तशी हवी जी मनात भरावी सहज "
"सुर्या मग ती ती टक्कर वाली शोधली पाहिजे.."
"तिने मला वेड लावले तसे तिने इतरांना ही वेड करावे..अशीच ती.."
वेदांत ने स्वातीला फोन लावला...तशी ती म्हणाली "हॅलो काय हे सर किती मिस कॉल केलेत..?"
"ते जरा अर्जेन्ट आहे,लगेच या इथे हॉल मध्ये..तुमच्या मैत्रिणीला ही घेऊन या सोबत.."
"मी इथे माझे बघू की तिला शोधत बसू.."
ती असे उद्धट बोलत असावी म्हणूनच वेदांतचा चेहरा उतरला हे पाहून लगेच सुर्या म्हणाला , "स्पीकर वर लाव मी बोलतो.."
"मी येतेच आहे ,जरा धीर तर धरावा माणसाने..तर किती तुमचा त्रास..इतके फोन कोणी करते का.? " स्वाती भडकून म्हणाली
"तुम्हाला इथे पुढच्या पाच मिनिटात यायचे आहे ,नाहीतर तुम्ही नाटकातून आउट !!" सुर्या लगेच म्हणाला
ती तर दंग झाली , "हे कोण इतके तडक निर्णय घरणारे ,कोण आहे जो मला काढून टाकण्याची भाषा करत आहे वेदांत. हे तू बोलतोय का ??" स्वाती भडकली
सुर्या लगेच म्हणाला, "फोन कट कर ,आणि येऊ दे तिला..आता खरी परीक्षा सुरू होते..माझ्याशी नडते ही..ही राधा असणार का माझी..?"
-----
तिला आता कळेल तिने सूर्याला डिवचले आहे, मोठी आली होती attitude वाली ,हिची सूर्याच चांगली जिरवू शकतो...त्यात ती स्वरा तिने तरी वेळेत यायला हवे ना...तिला ही हेच ऐकायला लागणार वाटते..
"गेल्या दोघी ही मैत्रिणी कामातून गेल्याच आता ,त्यांची आता खैर नाही.."रुपाली
"नाही त्या स्वातीचा तर attitude खल्लास झालाच समज जर ती पाच मिनिटात आली नाहीतर..."
"नाही येणार ,ती आउट होणार..मला तेच हवे आहे...कारण तिने सूर्याला ओळखले नाही अजून...प्रेमळ तर प्रेमळ आणि टशन तर टशन..है अपना सुर्या...
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा