भाग 4
माझी राधा सापडली
इकडे कोणी तरी आपल्याला बोलले ,हा अपमान सहन झाला नसल्याने लगेच स्वाती फोन ठेवतात तडक हॉलच्या दिशेने निघाली..
"कोण आहे हा ज्याने माझ्याशी टक्कर घेतली आहे..? "
ती तशीच निघाली आणि पुढच्या पाच मिनिटात सुर्या समोर होती..सुर्या स्टेज कडे बघत होता ,सगळे डायरेक्शन देत होता , त्याची पाठ स्वाती कडे होती...तिने हाताची घडी घातली..आणि मोठा श्वास सोडत , लांबूनच आवाज देत आली..आणि वेदांतला उद्देशून म्हणाली
"वेदांत कोण आहे तो ज्याने मला नातकातून काढण्याची धमकी दिली..?"
वेदांत ही तिच्या कडे बघत मुक्याने सुर्याकडे बोट दाखवत म्हणाला ,"ते आहेत ते...ते.."
"ते असो वा तो..मला नाटकातून काढणारा तो कोण लागून गेलाय असा मोठा कोणी..?"
तितक्यात तिचे सगळे नखऱ्याचे बोलणे ऐकताच सुर्या ,लगेच वळला..आणि तिच्या समोरच येऊन हाताची घडी घालून तिच्या नजरेला नजर मिळून म्हणाला, "तो मी आहे..जो तुम्हाला म्हणाला नाटकातून काढून टाकेन तो मीच..बोला आता बोला..काय कुठे तक्रार करायची आहे माझी तर खुशाल करावी..." तो तिच्या समोर जाऊन तिला जणू चॅलेंज देत म्हणाला
"तुम्ही तुम्ही कोण ??" स्वाती थंड होत
"मी ते नंतर सांगतो ,आधी माझी तिकडे जाऊन तक्रार करणार होतात ,म्हणून लगेच आलात तर जा तक्रार करा..मी ही बघतो तुमचे ऐकतात की माझे..?" सुर्या अडवून बघत राहिला
स्वातीला कळले हा सूर्याच असावा, नाहीतर इतका सुंदर ,राजस्वी दिसणारा..तडक बोलणारा..कोण असू शकतो..हा माझा हार्ट थ्रोब सुर्या..
"मी नकळत बोलून गेले ,पण त्याबद्दल खरच सॉरी..पुन्हा नाही होणार.." स्वाती खजील होत म्हणाली
"फर्स्ट इम्प्रेशन इस द लास्ट इम्प्रेशन फॉर मी..चूक ती चूक..पण जाणून बुजून वागणे ही चूक नसते.. तुमचा attitude इथे दाखवला ते न पटण्यासारखे आहे..पुन्हा नाही घेणार मी तुम्हाला.. ही वेळ पहिली आणि शेवटची असेल.."
स्वाती मान खाली घालुन ऐकत होती ,आणि त्यात तो ही आता बोलून झापुन शांतपणे तिला नाटकाबद्दल सांगत होता, तिला सुर्या जवळ आहे ह्यात मनापासून आंनद होत होता...
"माय लव.." स्वाती मनात पुटपुटली
त्याने ते ऐकले ,पण त्याला शब्द कळले नाही ,तोच तो म्हणाला
"काही अजून बोलायचे राहिले असेल तर बोलून घ्या.."
"ती अजून का नाही आली ,तिला नाही का कोणी रागावणार..? तिची ही सुनावणी घ्यावी ना अशीच ,जशी माझी घेतली आहे तशी..." स्वाती लगेच स्वराबद्दल तक्रारींचा मोड वर आली
आता सुर्या ही लगेच म्हणाला ,"येस ,येस..ती दुसरी मुलगी स्वरा की काय ती कुठे..तिला बोलवा..लगेच तोपर्यंत मी राधा ठरवणार नाही.."
स्वाती लगेच सावध झाली ,आणि तिला वाटले स्वरा नाहीच आहे तर आपण पुढे जाऊन सूर्याला म्हणावे मला राधा व्हायचं आहे तुझी...दोन्ही अर्थाने.."मी होऊ का राधा श्यामची..?"
सुर्या हसून तिच्याकडे बघत राहिला, त्याने डोक्यायला हात मारला..मोठा सुस्कार सोडला...राधा राधा म्हणत त्याने तिच्या भोवती फेर घातला...तिला वरून खाली बघत म्हणाला ,"राधा व्हायचे आहे का तुम्हाला?? मला ही वाटते माझी राधा परफेक्ट दिसावी, पण जरा थांब..अजून एक आहे ना ,तिला बघून ठरवू..राधा तू की ती असावी..."
ती शांत बसली होती ,सगळ्यांनी सुर्या कडे चहाची फरमहिश् केली ,आता थकलो आहोत तर मस्त चहा घेऊन येऊ..आणि मग राधा ठरवू..नाहीतर चिट काढू.. वेदांत सुचवत म्हणाला
तितक्यात तिकडून पळतच सूर्याला टक्कर देणाऱ्या त्या राधा सारखी कोणी तरी दिसली..अगदी तशीच तीच राधा...जिच्या वर हा सुर्या भाळला...तिला जवळ जवळ येतांना पाहिले होते..हॉल लांब होता..
त्यात हे सगळे चहा साठी निघाले होते ,ती त्यांना ही टक्कर देणार इतक्यात सर्याने तिला येऊन सावरले होते..
उतरत्या उन्हात ती अजूनच सुंदर भासली होती ,तिचे डोळे बोलके भासले होते..तिच्या डोळ्यात एक ओढ दिसत होती..थकलेले अंग आता पडता पडता सूर्याचा हात समावले होते..
त्याने तिला वाचवले होते ,तो खूप जवळून तिला बघत होता..त्याचा तिचा श्वास सोबत आणि जोरात चालला होता..एकमेकांकडे बघत होते..तिचे केस त्याच्या माने भोवती पिंगा घालत होते..तो तिचा तो सुगंध त्याला परत वेडे करत होता...सुंदरच ,सुंदर..!! तिला आता हात अवघडल्यासारखे झाले होते..तो अजून ही गुंग झाला होता. सोडले तर ती पुन्हा अशी इतकी जवळ कशी आणि कधी असेल...
"मी उठू शकते का ,प्लिज हात सोडू नका माझा मी पडेल.." ती म्हणाली
त्याने तसे तिला आधार देत उठवून घेतले..ती सावरली पण तो सावरून ही हरवला..तो बघतच राहिला आणि टाळी वाजवत म्हणाला
"माझी राधा मला सापडली आहे, अँड शी इस माय राधा..सुर्याज राधा...हीच शोधत होतो मी..हिच्या नजरेत राधा दिसली मला..आता ठरलंय राधा हीच.. "
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा