भाग 5
अंतिम
माझी राधा सापडली
अंतिम
माझी राधा सापडली
आता स्वरा राधा होणार होती हे ठरले होते..
इकडे स्वराला हे ऐकून खुप भारी वाटले होते..मी कधी यांना पाहिले ही नाही तरी कसे एका क्षणाचा विलंब न करता ,मला जाणून न घेता त्यानी माझी राधा हीच असे म्हणाले..
"मी त्यांची राधा ??? मीच त्यांची राधा.. हे किती भारी वाटत आहे ऐकायला, मला ही विश्वास बसत नाही..मला कोण राधा म्हणून शकते.."
"मी त्यांची राधा ??? मीच त्यांची राधा.. हे किती भारी वाटत आहे ऐकायला, मला ही विश्वास बसत नाही..मला कोण राधा म्हणून शकते.."
त्यात सगळे बघतच राहिले
"स्वरा आणि राधा ,कोणत्या नजरेतून राधा दिसली त्याला..ही तीनपट पोरगी मला डावलून पुढे जाऊच कशी शकते." स्वाती आता रागात तिच्या कडे बघत होती ,दात ओठ खात होती
ती आता सूर्याकडे ह्याचा जाब मागायला आली होती ,त्याने तिच्या कडे पाहिले आणि तिला दाखवून दिले तू राधा होऊन शोभत नाहीस..त्यासाठी तसा गुण हवा असतो...
"काय आवडली का माझी राधा..?"
"तुमची राधा नाही ती नाटकातली राधा आहे ,पण सगळ्यांना हे मान्य आहे का विचारा तरी जरा.." ती हेक्यात बोलली
त्याला आता आपण घेतलेला निर्णय पटला होता ,पण ती स्वरावर जळते म्हणून तिला स्वराला राधा केले म्हणून राग राग होत होता.. त्याने तिला काही स्पष्टीकरण देणे लागू नव्हते ,तो त्याचे निर्णय सांगतो ,तो ते कोणालाही विचारत नसतो हे सांगितले..."माझ्या ह्या निर्णयासोबत सगळे आहेत..हवे तर विचार" तो खिश्यात हात घालून म्हणाला
तिला आता त्याचाच राग येत होता ,सगळे त्याच्या हो ला हो म्हणाले ,सगळ्यांनी अंगठा दाखवून सहमती दर्शवली...तसे ते चहाला जाणार इतक्यात समोरून खुद्द स्वरा सगळ्यांसाठी इथेच चहा घेऊन आली होती ,सोबत बिस्कीट ही होते..
तिने सगळ्यांना अगत्याने चहा दिला ,आणि त्यांनी तिला राधा म्हणून स्वीकारले म्हणून त्यांचे धन्यवाद मानले होते.
"आता तर काय सगळ्यांचेच एकमत झालेच आहे तर आता मला माझी जागा दाखवावी सुर्या सर.."
तिला ते स्वराचे चांगुलपणाने सगळ्यांचे मन जिंकणे ही नाटकाचा भाग वाटत होता
"तुम्हाला तर शोभेल असे पात्र तर नाही पण तुम्ही जर त्या पात्राला शोभेल असे वागलात तर मला आवडेल ते पात्र तुम्हाला द्यायला..म्हणजे तुम्ही स्वतःला बदलणार असाल तर...कारण त्यात खूप संयम हवाय..जमतंय का बघा..."
"मी करणार आता किती ही अवघड असो ते पात्र मी करणार.." ती
तो तितक्यात म्हणाला ,"ते पात्र करायचे नाही ,ते अंगिकरायचे आहे..त्याला शालीनता हवी असते..ते पात्र निभवावे लागेल..त्याचे गुण घ्यावे लागतील..जे इतके सोपे नाही..कारण तुमचा स्वभाव गुण आणि त्या पात्राचा स्वभाव गुण ह्यात जमीन अस्मानाचा फरक आहे..त्या कुठे तुम्ही कुठे... त्यांना प्रेम त्याग माहीत होता..अहंकार तर जरा ही नव्हता..असे ते पात्र आहे..."
तिला जणू मुद्दाम पेटवून उठवत होता सुर्या..तिची सगळी जिद्द पणाला लावायची होती..अहंकार धुळीस मिळवायचा होता..
स्वातीने त्याला दोन दिवसांचा वेळ मागितला होता ,"दोन दिवसात सांगते मी ,मी स्वतःच्या रागावर आणि अहंकारावर नियंत्रण मिळू शकले तर सांगेन..आणि तरच हे पात्र करेन."
तर एकीकडे स्वरा तिच्या मोहक सुंदर दिसण्याने त्याला मोहून घेत होती..राधेच्या पलीकडे त्याला खऱ्या जीवनातील राधा सापडली होती..किती शांत..किती लोभस..निरागस..लाघवी स्वभावाची ती म्हणून त्याची नजर तिच्याकडे खिळवून होती..
मनात आले की तिला आजच्या ह्या खास दिवशी प्रेमाची कबुली देता येईल का ?? तिला आवडेल का ??
--------
पण स्वातीला त्याचा राग येतो ,ती नको नको तो त्रास देते स्वराला ,तिच्या ड्रेस वर ती रंग सांडवते.. तिचा पेहराव खराब करते
कारण तिला वाटते असे केल्याने ती त्रस्त होईल ,तिला मनस्ताप होईल...ती स्वतः होऊन म्हणेन मी राधा नाही होऊ शकत ,त्या ऐवजी स्वातीला राधा म्हणू घ्या..
श्याम तरी ही तिला सर्व परिस्थितीत साथ देतच असतो ,तिला खचून देत नाही
इकडे स्वातीला त्यांची जवळीक बघून राग येतो..पण आता श्यामच्या दृढ निश्चयाने तिची हिम्मत तुटून जाते...ती माघार घेते...
म्हणते ठीक आहे तिला राधा म्हणून घे पण मी ही तुझ्या साठी तडफड करते ,मग मला ही खास रोल असलेली जागा दे..
सुर्या तयार होतो तिला एक खास रोल द्यायला म्हणतो,"मी देईल ही जागा तशी पण आधी तुला तसे गुण ,वागणे स्वभावात उतरावे लागतील..कारण तो रोल निभावण्याची तुझी कुवत नाही.."
तो सांगतो ती मीरा होऊन दाखव ,काही दिवस आहेत तर तू तसा स्वभाव अंगीकार मग ठरवू तू त्या पात्रतेची आहेस की नाही ते.
तिला हा रोल करायला अवघड वाटत होते, तर ती म्हणाली,"मी नाटकातून बाहेर पडते ,मी हा रोल किती ही केले तरी करू शकणार नाही ,माझी खरच तशी कुवत नाही.."
इकडे स्वतःहून स्वातीने माघार घेतली होती..
इकडे राधा म्हणून त्याने स्वराला निवडले होते,त्या नुसार त्यांची रोज प्रॅक्टिस चालू झाली होती ,त्यात त्यांची जवळीक वाढत होती..
त्यात स्वतःचा निस्वार्थी जीवाला जीव देणारा स्वभाव त्याला खास वाटत होता...त्याला आता समजू लागले होते की हीच माझी राधा असेल पुढील संपूर्ण आयुष्यात...मला आता इथे ह्या किनाऱ्यावर स्थिर व्हायचे आहे...
हे/ नाटक राधा कृष्णाच्या जीवनावर नव्हते पण एका गावातील राधा श्यामच्या प्रेम कथेवर आधारती होते.. तसेच काहीसे प्रेम होते ,पण ह्यात राधाला श्याम कुठे ही सोडून जाणार नाही ह्याचे त्याने वचन राधेला दिले होते../
त्याने नाटकात सगळ्यांच्या समोर सूर्याने स्वराला प्रपोज केले होते...
इकडे सगळे त्याच्या कडे बघून वेदांत म्हणाला ..
"अरे पण हा डायलॉग नव्हता त्यात श्याम" प्रमोद म्हणाला
"हा वाढीव ओळ आहे, अगदी मनापासून लिहिलेली ,मनापासून आलेली ,ती ही तिच्यासाठी जी माझी राधा आहे..माझ्या खऱ्या आयुष्यातली राधा आहे...." सुर्या
इकडे समोर प्रेक्षकांना मध्ये बसलेली स्वाती हे बघत होती ,पण तिला हे बघवले गेले नाही.ती निघून गेली..
थोडावेळ जाऊन पुन्हा डोळे पुसत आली आणि तिने दोघांसाठी टाळ्या वाजवल्या..
सगळीकडे एकच उत्साह होता ,नाटक सगळ्यांना आवडले ही होते ,पण त्यात जास्त काय आवडले ते सूर्याने सगळ्यांच्या समोर आपल्या प्रेमाची कबुली देणे..आणि मग काय हे ऐकताच सगळे टाळ्या वाजवू लागले होते..
इकडे श्याम मनापासून राधाचा केव्हाच झाला होता ,हे तर फक्त शब्दातून व्यक्त होने राहिले होते."
अष्टपैलू महासंग्राम 2025 साठी
©®अनुराधा आंधळे पालवे
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा