Login

मखाना रेसिपी इन मराठी

Recipe
मखाना सगळ्यात पौष्टिक, त्याच्यात लोह, आयर्न, कॅलसिअम, पोटॅशिम, कारबो च प्रमाण असत. मखाना कमळाच्या बियापासून बनलेले असतात. त्यामुळे ते खायला चविष्ट लागतात.

मखाना पासून अनेक गोष्टी बनवता येतात, जसं कि मखाना लाडू, मखाना चिवडा, मखाना खीर. आज आपण तेच पाहणार आहोत मखानाची रेसिपी चला तर मग पाहूया.

साहित्य आणि कृती. ( मखाना खीर )

कृती -

1 वाटी मखाने.
3 वाटी दूध.
3 चमचे तूप.
1 वाटी साखर.
1 वाटी काजू, बदाम, पिस्ता.
1 चमचा वेलची पावडर.

साहित्य -

सर्वात आधी एक पॅन ठेवा, पॅन गरम झाले कि त्यामध्ये तूप घाला. तूप जरा तापले कि त्यात मखाने घाला आणि मखाने चांगले परतवून घ्या.

आता गॅस बंद करा आणि ते एका प्लेट मध्ये काढा. आता एका टोपात दूध गरम करायला ठेवा.

दुधाला उकळी आली कि त्यात साखर, काजू, बदाम, पिस्ता आणि वेलची पावडर घाला.

आता दूध चांगल उकळल कि त्यात भाजून घेतलेले मखाने घाला आणि पुन्हा दूध चांगले उकळवा.

10 मिनिट उकळवा आता वरतून हवं तर तुम्ही केसर ही टाकू शकतात.

********************************************

मखाना चिवडा.

साहित्य -

1 वाटी मखाना.
½ वाटी सुके खोबरे.
1 वाटी काजू बदाम मनुके.
1 वाटी पिठी साखर.
कडीपत्ता.
½ वाटी शेंगदाणे.
तेल.
चिवडा मसाला.
गरजेनुसार मीठ.


कृती -

सर्वात आधी कढई घ्या त्यात तेल घाला तेल तापले कि त्यात मखाना घाला.

मखाना चांगला भाजून फुलवून घ्या, आता त्याला एका प्लेट मध्ये काढा.

पुन्हा तेल तापवा त्यात सुके खोबरे आणि शेंगदाणे तळून घ्या. तळले कि त्याला ही बाजूला काढा.

आता एका पॅन मध्ये काजू बदाम थोडेसे शॅडो फ्राय करून घ्या. कडीपत्ता सुद्धा तळून घ्या.

सगळं तयार झालं कि एक पसरट भांड घ्या, त्यात मखाना, सुके खोबरे, कडीपत्ता, शेंगदाणे आणि काजू बदाम मनुके हे एकत्र करा.

आता ह्यात चिवडा मसाला आणि गरजेनुसार मीठ आणि पिठी साखर घाला आणि पुन्हा सगळं एकत्र करा.

झाला तुमचा मखाना चिवडा तयार.