यात आठवणींचे काही कवडसेही असतील . . कुठलीच कथा पुर्ण कथा म्हणून समोर येणार नाही.? त्यातला तो रेशमी व मखमली कवडसा तुम्हाला अनुभवायचा आहे. . इतकच!
वाचून प्रतिक्रिया नक्की द्यावी.?
प्रोत्साहन आणि स्टिकर्स च्या प्रतिक्षेत- सखी)
(ही संकल्पना किंवा डायरी ९०च्या दशकातली लिहिलेली असेल. . तर त्या कालखंडाला त्याप्रमाणेच समजून घ्यावं .)
१०. अनामिकेची प्रतिक्षा
आजची संध्याकाळ काहीतरी वेगळंच घडवून गेली!
तुझी येण्याची वेळ टळून गेली तरीही तू आला नाहीस.
तुझं येणं किंवा तुला येण्यास उशीर झाला तर वाट पाहणं हे माझ्या नित्यक्रमातलं एक सदर होऊन गेलं होतं, माझ्याही नकळत पण अपरिहार्यच !
तू एव्हाना येऊन जायला हवं होतं. .असं सतत वाटायला लागलं. तसं तुझ्याशी भेटणं बोलणं व्हायचं नाही पण तू तुझ्या घरी अाहेस . .यात कसली तृप्ती कसलं समाधान होतं मला कळत नाही.
तुला जास्तीत जास्त होऊ शकणारा उशीरही गृहीत धरला तरी तू आला नाहीस.
मी वेड्यासारखी वाट पाहत राहिले .
तुझं घर वरच्या मजल्यावर अन माझं खालच्या मजल्यावर! तर सतत , येते जाता तुला पाहणं हा जणू मला छंदच जडला होता.
प्रत्येक चाहुलीला वर पाहत राहिले आणि डोळ्यात निराशा घेऊन खाली पाहायची.
तुला काय कळणार त्या निराश झालेल्या डोळ्यातली मुकी वेदना !
तुला काय कळणार त्या निराश झालेल्या डोळ्यातली मुकी वेदना !
प्रत्येकवेळी नाराज होऊन खाली पाहताना मनात उठणारी कळ, ती मीच जाणते!
घरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी मी तुझी वाट पाहत राहिले. . पाहत राहिले . . कितीतरी वेळ . . मग समोरच्या खिडकीत वाचत बसले तुला दिसेल अशी.
पण छे! काहीच वाचू शकले नाही आणि तू ही आला नाहिसच!
स्वत ला नेमकं काय होतंय हे व्यक्त करायला जेव्हा मी असमर्थ ठरते त्यावेळी त्याचं कारण असतोस तू. . . फक्त तू !
मला कुठे चैन पडत नव्हती, कशातच मन लागत नव्हतं !
अनामिक अस्वस्थता, अस्थिरता, बेचैनी हे सगळे शब्द मी ऐकून होते पण त्यांना. . आज . . . अनुभवलं ! पण ते आज अनुभवताना कळत होतं की खरंच जगण्यात आणि ऐकण्यात किती फरक असतो !
तू केवळ एकदा ओझरता दिसलास तरी पुरे त्या आत्मिक समाधानावर माझा दिवस सहज जातो ,तुझं फक्त एक झलक दिसणं. .मला महत्वाचं !
काल ही तू दिसला नाहीस.
\"गावाला चाललोय, उद्या संध्याकाळी उशीर होईल\" असं तू पुटपुटला होतास पायर्यांवर . . मला ऐकू जाईल असं . .मुद्दामच !
गावाला गेला होतास ठीक आणि आज सरळ ऑफिसला येणार . . परत आल्यावर तरी दिसशील वाटलं . . पण कदाचित आजही मी तुला पाहू शकणार नाही !
नाहीरे! कल्पनाच सहन होत नाही !
मी मैत्रिणीत जाऊन पाहिलं पण आज तेथेही मन ताळ्यावर नव्हतं. त्या गप्पांमध्येही मला आज रस वाटेना.
सगळंच कसं निराश व निरस!
मग मैत्रिणींचाही कंटाळा आला तेथूनही निघुन आले.
माझं लक्ष तुझ्या वाटेवर होतं पण तू आला नाहीस.
जीव कळवळला ,चेहऱ्याचा रंग उडून गेला
कुणीतरी विचारत होतं " काय झालं ?"
कुणीतरी विचारत होतं " काय झालं ?"
काय सांगणार? कप्पाळ !
आकाशात ढग गोळा व्हायला लागले.
संधी प्रकाश जीव जाळू लागला. त्या आकाशाचे निरीक्षण करीत किती वेळ तरी गच्चीवर बसले. पण आज सर्वच निराळं!
संधी प्रकाश जीव जाळू लागला. त्या आकाशाचे निरीक्षण करीत किती वेळ तरी गच्चीवर बसले. पण आज सर्वच निराळं!
ढगांच्या त्या निरनिराळ्या आकारात मला चक्क तू दिसायला लागलास!
वेगवेगळ्या मुद्रेत तुझं हसणं, कधी मुक्त, कधी कुटील की उपहासात्मक, कळत नाही. . तेही आता आठवलं.
जेव्हा त्या आभाळानेही मनात आठवणींचा डोंब अधिकच वाढवला तेव्हा मी वैतागून खाली आले. . तरीही तू आला नव्हतास!
अंधार पडायला लागला तुझी प्रतीक्षा जास्तच गूढ झाली.
घरातल्या एका छोट्याशा पूजेसाठी बरेच नातेवाईकात घरात आलेले होते, परिचितही!
पण मी त्यांच्यातही मिसळले नव्हते.
अंधारा सोबतच तुझी प्रतीक्षा चिंतेत बदलली. काळजी वाटायला लागली.
तुझी फास्ट गाडी चालवण्याची सवय मला ठाऊक नाही की काय?
म्हणजे रस्त्यातच कोठेतरी?. . छी! कसले अभद्र विचार!
मन चिंती ते वैरी न चिंती म्हणतात.
नाही तू व्यवस्थित घरी येशील, मला तेवढंच पुरे आहे, मग उशीरा आलास तरी चालेल मला! पण चुटपूट मनाला कुरतडू लागली.
घरातल्या छोट्याशा कार्यक्रमासाठी आलेले काही पाहुणे आणि आई मात्र मला कामात गुंतवू पाहात होती.
पण छे रे तिथेही काय- काय राडे केले कोण जाणे?
मला माझी स्वतःची वैयक्तिक खूपशी कामं करायची होती पण तुझ्या चिंतेत ती कामही परकी झाली.
नाईलाजाने मला त्या पाहुणे मंडळीत बसावं लागलं.
ते त्यांच्या हास्य कल्लोळात दंग! मला काहीच उमजेना, त्यांच्या वंशाची नसल्यागत मी त्यांच्याकडे पाहायला लागले.
इतक्या कर्कश आवाजात, बोलण्यात, गोंगाटात, हसण्यातही माझे कान तुझ्या स्कूटरचा आवाज शोधत होते.
त्या गर्दीतही मी सर्वस्वी एकाकी, एकटी होते. मी पूर्णतः संपल्यात जमा होते.
इतक्याच तुझ्या स्कूटरचा आवाज व हॉर्न वाजला.
मी इतकी अगतिक व व्याकूळ झाले होते. . काळजी अश्रुत रूपांतर होण्यापूर्वी तू आला होतास.
मी इतकी अगतिक व व्याकूळ झाले होते. . काळजी अश्रुत रूपांतर होण्यापूर्वी तू आला होतास.
मी वेडय़ासारखी सगळ्यातून उठून पळाले, दार उघडलं, तू तुझ्या घराच्या पायर्यांवर होतास . .मी आनंदले होते, तू नेहमीसारखं तिरकस पाहिलंस अन् हसलास . . का माहीत नाही!
अरे पण एक अघटित घडलं. . माझ्या मनाच्या मखमली कप्प्यात दडवलेलं , पोसलेलं नाजूक स्वप्न. .अन् गुपित सगळ्यांसमोर उलगडल्या गेलं!
मी लज्जेने, शरमेने, भीतीने, न जाणो काय काय झाले. .!
हे सगळं व्हायला नको होतं ना, हे टाळायला एकच मार्ग होता. . तुझं वेळेत येणं!
"का उशीर केलास रे ? तुझ्यासाठी आम्ही सगळे जेवायचे थांबलोत ! ये लवकर !"
बाबांनी सर्वांसमोर त्याला विचारलं.
" फ्रेश होऊन आलोच काका! तुम्ही पानं वाढायला घ्या. " म्हणत तू वर गेलास जातानाचा तिरकस कटाक्ष अन स्माईल . . माझ्याकडे पहात. . . तेही सर्वांसमक्ष !
त्याच्या आठवणीत उपाशी बसलेल्या मला मात्र \" बाबांनी ज्या सहजपणे तुला बोलावलं व तू तितकाचं सहज होकार दिलास \"हा मुद्दा पचवावा की न जेवताही तृप्तीने ढेकर द्यावी हे कळत नव्हते.
समाप्त
© स्वाती बालूरकर देशपांडे , सखी
दिनांक १८ .१ .२१
दिनांक १८ .१ .२१
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा