लघुकथा.
एक मध्यमवर्गीय खाऊन पिऊन सुखी कुटुंब. नवरा, बायको आणि त्यांच्या संसाराच्या वेलीवरचे रिया आणि रवी ही दोन फुल.
वडील ही आत्ताच निवृत्त झालेले आणि आई गृहिणी. रिया नुकतीच कॉलेजच्या उंबरठ्यावर होती. तर रवीच नुकतच लग्न झालं होत. अगदी कांद्यापोहेचा कार्यक्रम ठरवून त्यांनी त्यांचा प्रेम विवाह हा अरेंज पध्दतीने घडवुन आणला होता. दूरच नात असलेलं पण एकाच गावातलं. रवी ही चांगला शिकून नुकताच एका मोठ्या हुद्यावर कामाला लागलेला.

ती प्रतिभा, नावाप्रमाणेच प्रतिभा असलेली. फॅशन डिझायनिंगचा कोर्स करून स्वतःच बुटीक उभं केलेली. नाकारण्यासारखं काहीच नाही म्हणुन लगेच संमती आणि लग्न ही उरकून घेण्यात आलं.
नव्याचे नऊ दिवस संपले. त्यांच्या आई वडीलांप्रमाणे ते ही आपल्या संसारात व्यस्त झाले.
नवीन नवीन नातं होत तोवर प्रतिभा रवीच प्रत्येक म्हणणं ऐकत होती. त्याला हवं तस ती जगू देत होती. मग तो आपल्या वडीलांकडे बघून फुशारक्या ही मारायचा.
“लव्ह मॅरेज केल की हा फायदा होतो.” रवी सोफ्यावर पसरुन बसल्या बसल्या आपल्या वडीलांकडे बघून तोऱ्यात बोलला. यावर त्याच्या वडीलांनी फक्त मंद स्मित करून मान डोलावली होती.
उद्या रविवार होता. रवीला सुट्टी होती. तर रविवार म्हणजे प्रतिभाला तिच्या बुटीकवर जास्तीचं काम रहात असायचं. याची कल्पना नसलेल्या रवीनं तिला न विचारता मस्त त्या पाचही जणांसाठी संध्याकाळच्या वेळेचे मुव्हीज टिकीट बुक केली आणि आज रात्री जेवणाच्या वेळेस उद्याचा मुव्हीज प्लॅन सांगीतला. यावर प्रतिभा जरा गांगरलीच. आत्ताच तर ती या घरात आली होती. म्हणुन लगेच काही बोलण तिने टाळलं. पण तिच्या चेहर्यावर पडलेल्या आठ्या रवीला गोंधळात टाकून गेल्या.
“काय गं?” रवीने प्रियाला विचारलं. “एवढं टेन्शन का आलं?”
“त… ते रवीवारी मला बुटीक जास्त काम असतं.” प्रतिभा जरा चाचरतच बोलली.
“तूला माहीत नाही का?” रवीच्या वडीलांनी रवीलाच उलटं विचारलं. रवीन एवढ्या फुशारक्या मारल्या होत्या. तर त्याचा बदला तर घेतला पाहीजे ना. “मला तर माझ्या बायकोच्या सगळ्याच वेळा पद्धतशीर पाठ आहेत बाबा.”
झालं. बाबांचा बोलण ऐकुन प्रतिभा आठ्या पाडुनच रवीला बघायला लागली. तसा रवी अजूनच टेन्शनमध्ये आला.
“तिने तूला आधीच सांगतीलं होत ना.” आईने अजुन आगीत तेल ओतले.
तसा रवी त्याच्या आईकडे ‘तु माझीच आई आहे ना?’ असा बघू लागला.
आता या घडीला रवीच्या विरूध्द जाण्यासाठीची पार्श्वभुमी अशी होती की रवीला घरातली काम सोपी वाटतं होती. एकदा तर रागारागात त्याने ती सगळीच उत्तमरीत्या सांभाळली देखील होती. तेव्हापासून त्याला ते इतकं टेन्शन घेण्यासारखं ती वाटतं नव्हती. त्यावेळेस ‘तुझी बायको आली का निट करायला शिकवेल. तेव्हा तूला समजेल.’ असं त्याला ऐकवलं जायचं.
यावरही तो “माझ्या बायकोला मी माझ्या मुठीत ठेवेल.” अस तोऱ्यात बोलून जायचा.
अशी वरचेवर वाद संवाद घरात चालत रहायचे. आता घर म्हटलं की भांड्याला भांडे वाजणारं की. त्याशिवाय घराला घरपण येत का? संसारात उत्साह ही तेव्हाच येतो की.
घरातलं वातावरण ही अगदीच मोकळ होत. रिया सोबतच रवीला ही किचनची काम सांगीतली जात होती. आधी तो शाळा कॉलेजमध्ये होता तेव्हा त्याची आई छोटी छोटी काम त्याला करायला देत होती. मग ती त्याला सोपीच वाटायला लागली. पण सारखं सारखं कामाला लावतात म्हणुन रवी त्याच्या आईवर चिडायचा देखील.
“एवढूस काम आहे. त्याला किती वेळ लागतो.” हे अस उत्तर तो देत असायचा. तर ही त्याला जबरदस्तीने कामाला लावलचं तर पुढचा डायलॉग मारायचा.
“माझी बायको आली ना की माझी सगळीच काम तिच्याकडून करून घेईल.”
मग आई वडील दोघेही त्याच्यावर हसायचे. शेवटी ऐन तारुण्यात प्रवेश होता त्याचा. स्वतःच्या मनात खरं हे मानण्याच वय त्याच. मग ते ही जास्त डोक लावत नव्हते.
पण आता हातची आलेली हि नामी संधी आई वडील दोघेही थोडीच सोडणार होते. मग आगीत तेल, पेट्रोल, डिझेल सर्व काही ओतायचं काम ते करत होते. तर रवी धक्का लागल्यासारखा दोघांना बघत होता.
“नवीन आहे गं तो जाऊ दे.” रवीची आई प्रतिभाला समजावत बोलली. “नवरा बायकोला ऐकमेकांना समजून घ्यायला वेळ तर जातोच ना.”
“नाही ओ आई.” प्रतिभा रवीला खुन्नस देत बोलली. “मला त्याबद्दल नाही वाईट वाटलं. पण तुमच्या सोबत एक दिवस नाही येऊ शकणार नाही ना याचं जास्त वाईट वाटतं.”
“आता तुच नाही तर आम्ही तरी जाऊन काय करू?” रवीचे वडील तोंड पाडुन बोलले. “कॅन्सलच कर ते.”
वडीलांनी पाडलेलं तोंड प्रतिभाला आज्जीबात आवडलं नाही. लग्नाआधीपासुन गेले दोन वर्ष तिच या घरात येण जाण होत. प्रतिभाला आधीपासूनच अगदी रियासारखी माया लावली होती. मग आपल्या वडीलांच पडलेलं तोंड तिला कस बघवल जाणार होत.
“बाबा, असं नका बोलु.” प्रतिभा हळवी होत बोलली. “हवं तर मी येते. बुटीकच काम त्या कांचनवर सोपवेल. फक्त तिकीट दुपारची काढावी लागतील. कारण संध्याकाळी एकट्याला ते बुटीक सांभाळणे शक्य नाही.”
“पण मग त्यासाठी पुन्हा पैसे खर्च करावे लागतील.” रवी डोक खाजवत बोलला.
“मी तर माझ्या बायकोसाठी असे पैसे खर्च करताना कधीच विचार केला नाही.” रवीचे बाबा आरामात जेवणाचा एक घास खात बोलले.
“बाई काय ही आजकालची मुल” रवीची आई “आधी विचारत ही नाही आणि आता बायको तयार आहे तर विचार करत बसलाय.”
“खरंय खरंय.” रिया पण आता त्या दोघांनाच सामील झाली.
रवीने डोक्यालाच हात लावला. ‘मला उचलून आणलं आहे का हॉस्पिटलमधून.’ तो मनातच विचार करत राहीला. “करतो बुक.” रवी नकारार्थी मान हलवत तिकीट बुक करायला मोबाईलकडे गेला. जो हॉलमध्ये चार्जींगला होता. तो गेल्यावर हे तिघे मायलेक हसायला लागले. तर प्रतिभा त्यांना फक्त बघतच राहीली. मग तिला समजलं की त्याची फिरकी घेण्याचं काम चालु होत ते. जे वरचेवर त्या घरात कोणाची ना कोणाची घेण ही रितच होती. मग ती ही हलकेच हसली.
उद्याची दुपार त्या पाच ही जणांनी मस्त मुव्ही बघत, बाहेरच हॉटेलला जेवण करून घालवली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ते सगळेच घरी पोहोचले. आजच्या या आनंदात रवी कालची गोष्ट विसरून गेला.
काही दिवसांनी प्रतिभाच्या बुटीकला जी आठवड्यातुन एकदा सुट्टी असते, ती होती. त्याच दिवशी योगायोगाने रवीला ही सुट्टी होती. रिया तर नेहमीप्रमाणेच तिच्या कॉलेजला गेली होती. त्या दिवशी घरात रवी, प्रतिभा आणि रवीचे आई वडील होते.
रवी त्या दिवशी मस्त सकाळपासून बराच वेळ फक्त मोबाईल चाळत बसलेला होता. त्यात तो नाश्त्यासाठी प्रतिभाला आवाज ही देत होता. रवीच्या आईला ही जरा बरं नव्हतं. मग त्यांना कामाला लावणे प्रतिभाला बरोबर वाटलं नाही. मग ती स्वतःच सगळंच काम करत होती. आता रवीची ऑर्डर ऐकुन तिच्यातली टिपीकल बायको जागी झाली. ती तशीच त्यांच्या बेडरूमच्या दारात गेली.
“घाई असेल तर स्वतः मला मदत करा.” प्रतिभा “नाहीतर वाट बघत रहा. एकतर आधीच आईंना बरं नाहीये. त्यांची तरी विचारपुस केलीत का?”
“आईला बरं नाही?” रवी पटकन उठला. “काल तर बरी होती.” रवी लागोपाठ हॉलमध्ये येऊन त्याच्या आईजवळ बसला. “काय झालं गं?”
“काही नाही रे.” आई “वयोमानानुसार दुखतात घुडघे. तर तुझ्या बायकोने मला ठेवलं बसवुन. जस काय मी म्हातारीच झाली.” त्या जरा तोंड वाकडं करत बोलल्या.
प्रतिभा आता घरातल्या फिरकींना ओळखू लागली होती. म्हणुन तिला त्यांच्या या बोलण्याच वाईट वाटलं नाही.
“मी करतो मदत तिला.” रवी आईला शांत करत बोलला. “आम्ही आहोत ना. तु जे शिकवून ठेवलं आहे ते कधी कामाला येईल? असही घरच्या कामाला कितीसा वेळ लागतो?” रवीचा नेहमीचा तोरा परत फणा काढु लागला.
“तु आधीच त्याला सोपीच करून ठेवत होती म्हणुन तो आता असा वागत आहे.” रवीचे वडील त्यांच्या बायकोकडे बघून हसतच बोलले.
“तो करतोय तरी.” आई ठसक्यात बोलली.
“तेव्हा तु होतीस.” वडील “आता बायको आहे.”
“तिच तर गम्मत बघायची आहे त्याची.” आई हळुच हसत बोलल्या.
रवी प्रतिभाला काय करू? अस विचारू लागला. तस तिने त्याला आधी घरातला केर काढायला लावला. रवी लगेच झाडू शोधु लागला.
पाच मिनिटानंतर प्रतिभाने रवीला आवाज देऊन झाडू मारून झाला का? अस विचारलं. पण तो गेले पाच मिनीट झाडूच शोधत होता. त्याचे आई वडील ही त्याच्यावर हळुच हसत होते.
प्रतिभा किचनच्या बाहेर आली आणि डोक्याला हात लावला. “अहो, दाराच्या मागे असतो झाडू.”
“अच्छा.” रवीने दारामागुन काढू काढला आणि झाडु मारायला घेतला. तसा परत प्रतिभाने डोक्याला हात लावला. कारण तो दाराकडून झाडु मारत किचनकडे चालला होता.
“अहो काय करताय?” प्रतिभा आठ्या पाडुन बोलली.
तसा रवी तिच्याकडे बघू लागला. तसे त्याचे आई वडील अजूनच हसायला लागले. मग रवी त्यांच्याकडे बघू लागला.
“राहु द्या.” प्रतिभा “मीच करते.”
मग रवी ही हातातला झाडु खाली ठेवुन बसायला गेला.
“अहो बसु नका.” प्रतिभाने परत आवाज दिला. “तेवढे कपडे घडी करून ठेवा.”
मग रवी कपड्यांची घडी मारायला गेला. तोवर प्रतिभाने पुर्ण घर झाडून घेतलं. किचनमधलं आवरायचं बाकी होत. फक्त प्रतिभाची चाललेली धावपळ बघून रवीची आई तिला मदतीसाठी उठायला लागल्या. पण प्रतिभानने त्यांना परत बसायला लावलं.
किचनमधलं थोड काम बघीतल्यानंतर प्रतिभा परत रवीकडे गेली. तिकडे जाऊन तिने रवीला पाहीलं आणि परत डोक पकडलं.
रवी न धुतलेल्या कपड्यांची घडी मारत होता आणि धुतलेले कपडे परत वॉशिंग मशिनजवळ टाकलेले होते.
“अहो काय करताय हे?” प्रतिभाला टेन्शन आलं.
“तुच बोलली ना की कपड्यांची घडी मारा.” रवी ही आठ्या पाडुन बोलला.
“मग जे धुवायचे आहेत त्यांची कशाला मारत आहात?” प्रतिभा
तस रवीच्या कपाळावर अजूनच आठ्या आल्या. “दोन्ही कपडे एकाच ठिकाणी का ठेवले? मग असा गोंधळ होतो ना.”
“पण धुतलेले आणी न धुतलेले फरक नाही कळत का?” प्रतिभा “राहुद्या करते मीच.”
परत रवी प्रतिभाकडे वैतागूनच बघू लागला. मग तो तसाच परत जायला निघाला.
“जाता जाता किचनमध्ये गॅसवर दूध ठेवलेलं आहे तेवढं बघून घ्या.” प्रतिभा कपड्यांची घडी मारत बोलली. “आणि कांदे काढुन ठेवले आहेत ते कापुन घ्या.”
रवीने ते ऐकलं आणि किचनकडे प्रस्थान केलं. त्याने जाऊन पहीले दुध पाहील. ते मस्त शांत बसून होत. मग बाजुला ठावलेले लालचुटुक कांदे घेतले आणि कापायला बसला.
थोडावेळ झाला तोच प्रतिभाला काहीतरी जळाल्याचा वास आला. तशी ती पटकन किचनमध्ये आली तर दुध जास्तच गरम झाल्याने ते उड्या मारत मारत भांड्याच्या बाहेर येत होत. रवी कांदा कापण्यात एवढा व्यस्त होता की दुध उतु जाऊन कधी त्याची बायको त्याच्यासमोर दत्त म्हणुन उभी राहीली हे देखील त्याला समजलं नव्हतं.
त्यात रवीने कांदा इतका बारीक कापला होता की जस काही त्याचा किस काढला होता.
प्रतिभला तर आता असं झालं होत की त्याला सांगून चुक तर केली नाही ना? किती तोऱ्यात बोलायचा तो की किचनमधलं त्याला सर्व येत. तीने बाहेर जाऊन तिच्या सासुबाईना आत बोलावलं.
“नक्की काय शिकवलं होत ओ याला किचनमधलं?” प्रतिभा तिच्या कपाळावर आठ्यांच जाळच विणून बोलली.
“येत म्हणजे, तो मला थोडीफार मदत करायचा.” आई हसतच बोलली. “त्याला तो सगळंच येत अस समजू लागला आणि जास्त काम सांगीतली की चिडायचा. मग मी ही जास्त काही त्याला सांगत बसली नाही. म्हटलं आता लग्न झाल की तुच सरळ करशील याला.”
आता मात्र प्रतिभाला हसावं की रडावं समजत नव्हतं. ती कमरेवर हात ठेवत कांदा कापण्यात एकदम तल्लीन असलेल्या रवीला बघत राहीली.
कांदा कापुन झाल्यावर त्याला काहीतरी जळल्याचा वास आला. तसा तो पटकन उठणार तोच त्याला सासु आणि सुन कमरेवर हात ठेवून त्याच्याकडेच रोखून बघत असल्याचं दिसलं. मग त्याला समजून गेल की दुधाचा कार्यक्रम आधीच झाला आहे आता त्याचा नंबर लागणार आहे.
त्याच्या आईने कापलेला कांदा उचलला आणि बोलायला लागली. “आता हा किस कसा वापरायचा तो ही सांग.”
“हा, जरा बारीकच झाला.” रवी उगाच हसत बोलला.
तसे दोघींनी त्याला हात जोडले. यानंतर त्याच्या आईकडून त्याची व्यवस्थित उत्तरपूजा झाली असं समजायला हरकत नाही. मग तो तोंड पाडूनच किचनच्या बाहेर पडला.
“आला होता मोठा शहाणा.” बाबा खुपच हसत बोलले. कारण त्याची चालेली उतरपुजा त्यांनीही ऐकली होती. “मला सगळंच येत. अजुन काय ते? हा बायकोला मी मुठीत ठेवेल.”
हे बोलणं ऐकुन किचनमध्ये असलेली प्रतिभा आणि आई लगेच बाहेर आल्या.
‘मला मुठीत ठेवणार?’ प्रतिभा डोळे वटारून रवीकडे बघत मनातच बोलली.
“हे बोलण गरजेच होत का बाबा?” रवी टेन्शनमध्ये येत बोलला. “आत्ताच आईच प्रवचन ऐकुन आलोय.”
“मग प्रसाद नको प्रवचनाचा.” आई पण हसतच बोलली.
मग रवीला समजून गेलं की आज त्याचीच फिरकी घेतली गेली होती. तसे त्याने आईला आणि प्रतिभाला हातच जोडले.
“सॉरी, मी सगळंच सोप समजत होतो.” रवी “म्हणुन ते तोंडातुन निघून गेल. आता मी घरात मदत करत जाईल.”
रवी प्रतिभाजवळ जाऊन बोलला.
“आज रात्री फक्त बेडरुममध्ये या.” प्रतिभा डोळ्यांचा धाक दाखवत किचनमध्ये निघून गेली. तसा रवीचे आई वडील रवीवर हलकेच हसले आणि आपापल्या जागेवर जाऊन परत बसले.
मग रवी अजूनच टेन्शनमध्ये आला. मग तो हळुच त्याच्या बाबांजवळ गेला.
“त.. ते.” रवी जरा चाचरतच बोलला. त्याच्या वडीलांना समजून गेल होत की प्रतिभा त्याच्यावर चिडली म्हणुन तो त्यांच्याजवळ मार्ग विचारायला आला होता ते.
“आई रूसल्यावर काय करायचे तुम्ही?” रवी
“मी काय करणार?” बाबा दीर्घ श्वास घेत बोलले. “जे करायचं ते तिच करायची.”
तस आईने बाबांच्या हातावर हलकेच चापट मारली. “काहीही काय सांगता?”
“मग काय?” बाबा “एवढे पापड बेलावे लागायचे म्हणुन सांगु.”
तसे आईचे डोळे विस्फारले गेले आणि ती पण त्यांच्यावर डोळे वटारून किचनमध्ये गेली. दोघे ही किचनकडे जाणाऱ्या आईकडे बघत राहीले. नंतर एकमेकांवर नजर टाकुन त्यांचे खांदे उडवीले.
“चला बायकोचा रुसवा कसा काढायचा हे लाईव्ह दाखवतो.” बाबा रवीच्या खांद्यावर हात ठेवत बोलले आणि त्याच्या बायकोला आवडत तस सरप्राईज तयार करायला घराबाहेर पडले.
“हे एवढ्या साध्या वस्तु?” रवी बाबांकडे बघत बोलला. “गजरा आणि चॉकलेट? काहीतरी महागातली साडी घेतली असती.”
“आपल्या गृहिणी असतात ना” बाबा हलकेच हसत बोलल्या. “त्यांना स्वस्त किंवा महाग याने फरक पडत नाही. आपण स्वतःहुन घेऊन आलो हेच त्यांच्यासाठी खूप असतं.”
रवी त्याच्या बाबांच बोलणं ऐकतच राहीला. घरी गेल्यावर आणलेला गजरा आणि चॉकलेट्स बघून दोघा गृहिणींचा चेहऱ्यावरचा पसरलेला आनंद रवीला आश्चर्याचा धक्काच देऊन गेला.
यानंतर प्रतिभाचा राग जाऊन ते दोघं ती रात्र प्रेमात न्हाऊन निघाली हे वेगळं सांगायची गरज नाही.

समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा