मलाई रवा ब्रेड पिझ्झा
सकाळी सकाळी काय करावे बरं नाश्त्याला? असा प्रश्न सगळ्यांच गृहिणींना पडतो. नाश्ता पौष्टिक पण पाहिजे, पोट भरणारा हवा आणि झटपट होणारा पाहिजे असतो . त्यासाठी मी घेऊन आलेय एक खुप छान रेसिपी, जी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून अगदी थोड्याच वेळात बनते आणि सगळ्यांना आवडेल अशी आहे.
मलाई रवा ब्रेड पिझ्झा
साहित्य : एक मोठी वाटी म्हशीच्या दुधावरची जमवलेली मलाई (फुल क्रिम दुधावरची जाड साय) एक छोटी वाटी बारीक रवा, एक हिरवी मिरची बारीक चिरलेली (तुम्हांला जीतके तिखट पाहिजे तेव्हढी मिरची घ्या) एक कांदा बारीक चिरलेला, टोमॅटो बारीक चिरलेला, पिझ्झा मसाला पावडर असेल तर घालावा आणि तो पाहिजेच तशी काही आवश्यकता नाही, मीठ चवीनुसार आणि मोठे ब्रेड.
कृती : मलाई मध्ये रवा, कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, मीठ घालून सर्व नीट एकत्र करून घेणे. आता ब्रेडला एका बाजूने हे मिश्रण व्यवस्थित लावून घेणे आणि गरम तव्यावर दोन्ही बाजूने खरपूस भाजणे. भाजताना यातून तुप सुटतेच त्यामुळे त्याला वेगळं बटर लावायची काही गरज नसते.
यामध्ये तुम्हांला आवडत असेल तर स्वीट कॉर्न वाफवून आणि शिमला मिरची परतवून त्यावर भरपूर चीझ सुद्धा तुम्ही घालू शकता. खुप पौष्टिक असा आणि मुलांना आवडेल असा पिझ्झा, सकाळच्या चहा बरोबर खुप छान लागतो.
किचन तुमचे आणि रेसिपी माझी, अशाच नवनवीन रेसिपी साठी मला वाचत रहा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि कमेंट करा विसरू नका.
धन्यवाद .
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा