Login

मळ्यातील सावली | भाग ४

A Story Of The Shadow In Village Land.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

भाग ४

रमेशच्या घरच्यांच्या दुःखात संपूर्ण गाव सहभागी झाले. ' रात्रीच्या वेळी त्याने तिथून नको जायला हवं होतं, सर्वांच्या तोंडी हीच चर्चा होती सर्वांच्या तोंडी हीच चर्चा होती.

त्या सर्वांमध्ये विष्णू देखील होता. विष्णू आजच गावात आला होता. तो गावातील एका घरात पाहुणा म्हणून आला होता. गावात अशी दुखत घटना झाल्याची समाजातच तो देखील त्यात सामील झाला.

लोकांमध्ये उभा असताना त्याने गावकऱ्यांच्या त्या मळ्याबद्दल सगळ्या गोष्टी ऐकून घेतल्या. मग तो ज्यांच्या घरी आला होता त्यांना विचारू लागला,
" दादा, हे सगळे म्हणत आहेत ते भाऊ त्यांना सोडून गेलेत. मग त्यांची डेड बॉडी कुठे आहे?"

त्यावर ते त्याला सांगू लागले," त्या मळ्यातून गायब झालेल्या लोकांची डेड बॉडी देखील त्यांच्या परिवाराच्या नशिबात नसते विष्णू..."

ते ऐकून विष्णू विचारत पडला आणि पुढे बोलू लागला," असं कसं शक्य आहे? तुम्ही मला तो मळा दाखवता का?"

त्यावर ते घाबरूनच त्याला बोलू लागले, " आता ? नाही रे बाबा रात्रीचे तर तिथे जायचं नसतं."

त्यांचा नकार ऐकून विष्णू उदास झाला, तरी त्यांच्याकडून त्याने त्या मळ्याची माहिती मिळवली आणि हळूहळू तो तिथून लोकांच्या गर्दीतून सटकून मळ्याच्या दिशेला निघून गेला. जाताना त्याने आठवणीने त्याची पिशवी सोबत घेतली.

काही अंतर चालत तो त्या मळ्याजवळ पोहोचला. लोकांकडून ऐकलेल्या गोष्टी त्याला चांगल्याच ध्यानात होत्या, म्हणून तो थेट मळ्यात न शिरता बाहेरच थांबला. सर्वत्र आता भयानक अंधार पसरला होता.

तो आत न शिरता त्या मळ्यापासून काही अंतरावर असलेल्या एका झाडाखाली शांत चित्ताने खाली ध्यानाला बसला.

ध्यान करता करता अचानक त्याने घाबरून डोळे उघडले. त्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. जणू त्याने बंद डोळ्यांनी काही तरी भयानक पाहिलं असावं. तो तसाच उठला आणि आपली पिशवी खांद्याला लावून त्या मळ्याच्या दिशेला चालू लागला.

चालता चालता तो तसाच मळ्यात शिरला. त्याला मळ्यात शिरताना मागून त्याच्या नावाची हाक ऐकू आली, पण तो थांबला नाही.

ती हाक तो ज्यांच्या घरी आला होता त्यांची होती. त्या कडे दुर्लक्ष करून तो थेट आत चालत गेला. त्याच्या मागून जाण्याची त्यांची हिंमत झाली नाही. त्यांनीत्यांनी जाऊन ही घटना गावकऱ्यांना सांगितली, पण रात्रीच्या वेळेस कोणीच त्या मळ्यात जाऊ शकत नव्हते. त्यांनी सकाळी लवकरच आत जाण्याचं ठरवलं.


विष्णूने आत प्रवेश करताच बाहेरच्या जगाशी तो अगदी अपरिचित झाला. त्याला देखील रमेश सारखेच त्या सावलीचे भास होऊ लागले. तो न घाबरता त्याच्या पिशवीत हात घालून तसाच पुढे चालत राहिला. चालता चालता तो त्या झाडाजवळ पोहोचला. तिथे पोहोचताच ती सावली त्याच्या समोर आली.


तिला बघताच त्याने पिशवीतल्या वस्तूला घट्ट धरले. तिने त्याला देखील रमेश सारखे जमिनीवर पडून फरफटत झाडाजवळ नेले.

क्रमशः

लेखक : चेतन सुरेश सकपाळ
0

🎭 Series Post

View all