Login

मन हे तुझ्यात गुंतले भाग २

नवा दिवस, नव्या शहरात, नव्या स्वप्नांनी आलेली राधा अजूनही थोडीशी गोंधळलेली होती. बनारसच्या गल्ल्यांतून आलेली, इथल्या उंचच उंच इमारती आणि प्रचंड वेगानं धावणाऱ्या गर्दीमध्ये स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करत होती. लिफ्टमध्ये अडकून पडल्यावर ती फोनवर बोलणं थांबवून आसपास पाहू लागली. अंधार नव्हता, पण एक बेचैनी मात्र नक्की होती. तिच्या कपाळावर आठ्या. पहिल्याच दिवशी उशीर, त्यात लिफ्टमध्ये अडकणं... रडायला येण्यासारखी परिस्थिती. ती स्वतःशी पुटपुटली – “क्या सीन है ये... जॉब का पहला दिन और ये वेलकम है?”
मन हे तुझ्यात गुंतले !
लेखक – पूर्णानंद प्रमोद मेहेंदळे
SWA membership no. 51440
Contact no. 7507734527

( कथेचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. )

नवा दिवस, नव्या शहरात, नव्या स्वप्नांनी आलेली राधा अजूनही थोडीशी गोंधळलेली होती. बनारसच्या गल्ल्यांतून आलेली, इथल्या उंचच उंच इमारती आणि प्रचंड वेगानं धावणाऱ्या गर्दीमध्ये स्वतःचं अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करत होती. लिफ्टमध्ये अडकून पडल्यावर ती फोनवर बोलणं थांबवून आसपास पाहू लागली. अंधार नव्हता, पण एक बेचैनी मात्र नक्की होती. तिच्या कपाळावर आठ्या. पहिल्याच दिवशी उशीर, त्यात लिफ्टमध्ये अडकणं... रडायला येण्यासारखी परिस्थिती. ती स्वतःशी पुटपुटली – “क्या सीन है ये... जॉब का पहला दिन और ये वेलकम है?”
एका कोपऱ्यात शांतपणे उभा असलेल्या संकेतने एकामागोमाग एक लिफ्टची सर्व बटणं दाबून बघितली. सर्व प्रयत्न अयशस्वी झाल्यावर त्याने हळकंच तिच्याकडे पाहिलं. तिच्या नाकपुड्या थोड्या फुगलेल्या, डोळ्यांत भीती दिसत होती पण चेहऱ्यावर एक विशिष्ठ असं तेज होतं. काही सेकंदांनी, राधाने त्याच्याकडे पाहिलं, आणि हलक्याच आवाजात विचारलं, "कुछ किया आपने? कोई अलार्म वगैरह?" संकेतने आपला फोन काढून बघितला. सिग्नल नव्हता. त्याने फक्त 'नकारार्थी' मान डोलावली. ती डोक्यावरून हात फिरवत चुळबुळ करत स्वतःशीच बोलत होती, "उफ्फ... ये शहर तो चैन से खड़े भी नहीं रहने देता।"
या वाक्यावर तो हसला, आणि म्हटला, “मुंबईमध्ये सगळं हालचालीत असतं. उभं राहिलं तरी हालचाल करावी लागते.”
ती थोडी नाराज झाली. "तो आप क्या कह रहे हैं, मैं ही स्लो हूं?"
"तसं नाही," तो म्हणाला. “पण हा शहराचाच स्वभाव आहे. इथे सगळ्यांना पळावं लागतं.”
क्षणभर ती गप्प होती. त्याच्या चेहऱ्याकडे पाहत, जणू काही तो तिला या शहराची ओळख करून देतोय, अशा नजरेने. मग तिने विचारलं, “आप यहाँ कब से हैं?”
“ जन्मापासून ! मुंबई हीच माझी ओळख आहे असं समजा !” हसऱ्या चेहऱ्याने तो म्हणाला.
“ जन्मापासून मतलब ? बचपनसे ना ? सॉरी लेकिन मेरी मराठी इतनी अच्छी नहीं है, थोड़ा बहुत समझमें आता है!”
त्याने फक्त तिला एक हलकं स्माइल दिलं आणि तो तसाच लिफ्ट सुरू व्हायची वाट पाहत उभा राहीला.
ती थोडावेळ गप्प राहिली. मग तिने लिफ्टच्या दाराकडे पाहिलं. “ये खुलेगा भी या हम दोनों यहीं बूढ़े हो जाएंगे? तुम लोग मतलब इतने कूल कैसे रहते हो यार? मुझे तो लग रहा है अभी दरवाज़ा तोड़ के बाहर निकल जाऊं!"
त्याला हसू आलं, पण त्याने रोखलं. ती अजूनही न थांबता पुढं म्हणत होती – “इतनी भीड़, इतना ट्रैफिक, इतनी आवाज... सब कुछ भाग रहा है यहाँ। साँस लेने की भी फुर्सत नहीं मिलती। बनारस में ऐसा नहीं है। वहाँ लोग धीरे चलते हैं, धीरे जीते हैं... और यहाँ तो सब जैसे किसी रेस में हैं!”
संकेत तिचं बोलणं ऐकत होता. त्याला हे सगळं नवीन वाटत नव्हतं. पण तिच्या तोंडून त्या शहराचं वर्णन ऐकताना त्याला वाटलं की बनारसने तिला जास्त काही दिलं आहे — शांततेपेक्षा काही अधिक. तिचं बोलणं संपल्यावर काही वेळ शांतता होती.
"क्या ये अक्सर होता है यहाँ?" ती बोलली, हळूच... तणाव तिच्या आवाजात स्पष्ट जाणवत होता.संकेतनं हलकंसं खोकून उत्तर दिलं, "कधी कधी... लिफ्टला सवयी लागतात. नवीन लोकांची परिक्षा घ्यायला फार उत्सुक असते ही."
ती त्याच्याकडे पाहून थोडं वैतागून म्हणाली, “ Seriously, कितना अजीब है ना... ऐसा स्वागत?"
“मुंबईमध्ये स्वागत कधीच थेट होत नाही. आधी चपला झिजतात, मग दार उघडतं.”
राधाने डोळे विस्फारले. “मतलब?”
तो थोडा हसत म्हणाला, “इथं ‘कृपया थांबा’ म्हणणारी पाटीही धावत असते. तुम्ही इथं आहात म्हणजेच, तुम्हीही आता त्या धावणाऱ्या गर्दीतलाच भाग आहात.”
ती थोडी चिडून म्हणाली, “पर मैं तो भागना ही नहीं चाहती थी! मैं तो बस... बस एक काम करना चाहती थी। शांति से, आराम से। आपका नाम क्या है वैसे? अगर लिफ्ट में और देर हो गई तो कम से कम जान-पहचान तो होनी चाहिए।”संकेत क्षणभर गोंधळतो.
“संकेत. अरे, म्हणजे माझं नाव संकेत आहे.”
“राधा.” ती हात पुढे करते. थोडा अडखळत तोही हात पुढे करतो.
“राधा?” तो म्हणतो, “हम्म… interesting नाव आहे… पण थोडं... mythical वाटतं.”
“मतलब?” ती डोळे बारीक करून विचारते.
“अगं, राधा म्हणजे... एक पवित्र भावना, पण एकटेपणाचीसुद्धा आठवण करून देणारी. जणू प्रेमात असूनही कायम थांबून राहणारी.”
ती त्याच्याकडे पाहत राहते. “अच्छा… तो आप लिफ्ट में फँसकर भी फिलॉसॉफिकल हो जाते हो?”
“मी मुळातच थोडासा असा आहे… म्हणजे… आयुष्यात थांबून पाहायला आवडतं. थांबणं म्हणजे हरवणं नसतं ना.”
“मुझे तो डर लग रहा है,” ती म्हणते, “थोड़ा... लिफ्ट से भी, शहर से भी, और खुद से भी।”
संकेत तिच्याकडे पाहतो. त्या क्षणी ती काहीही बोलत नव्हती, पण तिच्या डोळ्यांत बरेच काही होतं — थोडं रडवेलं, थोडं थांबलेलं, थोडं शोधात असलेलं.काही क्षणांनी ती परत बोलली. यावेळी त्याच्याकडे पाहत.
“आपको कभी डर नहीं लगता? इस तरह… बंद जगह में... किसी अजनबी के साथ अटक जाना?”
संकेत हळूच हसला. न थेट उत्तर देता, त्याने वर छताकडे पाहिलं आणि अगदी सहजपणे बोलला,
“मुंबईत जगायचं असेल ना, तर अडकणं शिकावं लागतं. मग ते ट्रॅफिकमध्ये असो, स्वप्नांमध्ये, की लिफ्टमध्ये.”
ती थोडी चमकली. “फिर से! ये आपकी भाषा न... उसमें एक मेला लगता है। हर लाइन में जैसे कोई कहानी छुपी है।”
राधा त्याचं बोलणं पूर्ण समजली नव्हती, पण काहीतरी खोल भावना तिच्या मनाला स्पर्शून गेली होती.
मग अचानक, संकेतने हलक्याच सुरात एक म्हण उच्चारली —
“भिंती ऐकतात, आणि छप्पर सुद्धा बोलतं, असं म्हटलं जातं आमच्याकडे.”
राधा भुवया उंचावून त्याच्याकडे पाहू लागली. “क्या बोला आपने? छप्पर क्या बोलता है? और दीवारें सुनती हैं? ये कोई मुम्बई वाला कोड है क्या?”
संकेत हसला. “म्हण म्हणजे proverb. आपण म्हणतो की, silence मध्येही खूप काही ऐकू येतं. आणि काही वेळा भिंतीपण आपलं एकमेकांचं गुपित ऐकतात, इतक्या शांत जागेत आपण असतो तेव्हा…”
आणि इतक्यात कसलातरी आवाज होतो आणि लिफ्ट सुरू होते. दोघांनाही हायसं वाटतं. “चल पड़ी! Finally!”

संकेत काही बोलणार तोच लिफ्टचा दरवाजा उघडतो. ते दोघे लिफ्टच्या बाहेर पडले. कॉरिडॉरचे लाईट झगमगत होते. लिफ्टच्या बाहेर दोन-तीन लोक हातात फोन घेऊन उभे होते, कुणी लिफ्टचं बटण दाबत होते, कुणी गार्डला बोलवत होते.
"Are you guys okay?" संकेतच्या कंपनीची hr असणारी पल्लवी दीक्षित लिफ्टपाशी आली.
“Radha! Oh god, तुम्ही आत होतात का?” तिचं लक्ष फक्त राधाकडे होतं.
राधा क्षणभर गोंधळली. स्वतःचं खरं जग पुन्हा एकदा आठवायला लागलं.
“हां… मैं… I mean… I got stuck... but he was there... I mean... we were stuck together,” ती हातानं संकेतकडे इशारा करते.
“ संकेत, are you ok ?” - पल्लवीने संकेतला विचारलं. संकेतने होकारार्थी मान डोलावली. Hr ने राधाची केलेली चौकशी पाहता राधा आपल्याच कंपनीत जॉइन होतीये असा अंदाज संकेतने लावला.
"Wait... आप भी इसी ऑफिस में...?" तिने लगेच संकेतला विचारलं. त्याने पुन्हा हलकं हसत होकारार्थी मान डोलावली.
“I’ve been here a while.”
ती आश्चर्यचकित, थोडीशी ओशाळलेली, “ तो आपने बताया क्यु नही ?”
“ तू विचारलंसच नाहीस !” दोघे एकमेकांकडे पाहून हसतात.
“ बाते हो गयी हों तो चले राधा ? ऑलरेडी लेट हुआ है।” - पल्लवी.
राधा पल्लवी सोबत निघून जाते. संकेत मात्र तिला पाठमोरं पाहत उभा राहतो. तोच त्याचा फोन वाजतो. गौरवचा आलेला कॉल तो लगेच रिसिव्ह करतो.
“ अरे, काय संकेत, 2 मिनिट ची पंधरा मिनिटं झाली. कुठे आहेस यार ?”
“सॉरी, सॉरी.. अरे लिफ्ट मध्ये अडकलो होतो, थांब आलो शून्य मिनिटात! “ असं म्हणत तो कॉल कट करतो. राधा गेली त्या दिशेने एकदा पाहतो आणि निघून जातो. बोलकी, कुणाच्यातही सहज मिसळून जाणारी मनमिळावू राधा तर मोजकं बोलणारा संकेत.. ह्या दोघांची ही अशी फिल्मी भेट नव्या नात्याची नांदी होती.

TO BE CONTINUED
WRITTEN BY POORNANAND MEHENDALE

🎭 Series Post

View all