मन मारू नकोस
तिला त्याने दिवाळीचा किराणा भरायला पैसे दिले होते, अगदी समान कोणते घ्यायचे आणि त्याला किती पैसे लागणार हे पाहून यादी केली आणि त्या नुसार मोजून पैसे दिले...ती वाट बघत होती तिला ही खर्चायला पैसे देईल का तो याची ...पण त्याने तिला पैसे दिले ते मोजून..आणि सांगितले जी यादी आहे त्या पलीकडे एकही समान घ्यायचे नाही..पैसे पुरून वापरायचे...
तिला समजले हे पैसे फक्त किराणा समान घेण्यासाठी दिले आहेत ,आणि आपल्याला कोणता ही खर्च करायचा नाही...मन उदास झाले होते...मार्ट मध्ये खूप वेगवेगळ्या घर सजावटीच्या वस्तू आल्या होत्या..कंदील दिवे ,पणत्या ,ड्रेस ,ओढण्या, सगळे पाहून तिचे मन हरकून गेले होते...मन ओढ घेत होते..मी हे घेऊ का ?? त्याचे किती पैसे होतील ,माझ्याकडे किती आहेत..मग घेतले तर समानाला कमी पडतील हे लक्षात येताच ती पुन्हा हातात घेतलेले समान पुन्हा माघारी ठेऊन देत..इकडे तिच्या मैत्रिणी ,सोबत आलेल्या बायका त्यांना आवडेल त्या त्या वस्तू घेत होत्या ,त्यांची लगबग बघून तिच्या डोळ्यात पाणी आले, आपणच एक अशी आहोत जी नेहमी मन मानुरून यादीत दिलेले समान घेऊन घरी जात असतो...नेहमी मनाला सांगत असतो ,जाऊदे उद्या पैसे उरतील तेव्हा घेऊ...आता गरज नाही..पण जर मी नौकरी करत असते तर हे मन मारायची गरज पडली नसती...तिने आपला मोर्चा किराणा समानातील यादी कडे वळवला, आणि सगळे समान घेऊन बाहेर आली, पैसे देऊन बिल भरले आणि पहाते तर काय...नेहमीपेक्षा तिच्या हातात दोन हजार रुपये शिल्लक होते... तिने सगळी यादी नीट तपासली आणि पाहिले यादीत दिलेले सर्व सामान जिथल्या तिथे होते...कोणतीही वस्तू चुकवली नव्हती..तरी इतके पैसे कसे बाकी असतील..?
तिने यादी मागून पाहिली, तिला वाटले की मागून काही सामानाची यादी असावी, पण मागे पलटून पाहिले तर त्यावर नवऱ्याने काही लिहिले होते...सर्व सामान घेऊन उरलेल्या पैशातून तू तुझ्यासाठी हवे ते घे...आज मात्र मन मारू नकोस...तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू होते, पण ह्यावेळी आनंदाचे अश्रू होते...
©®अनुराधा आंधळे पालवे

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा