Login

मन वढाय वढाय

मन वढाय वढाय
मन वढाय वढाय


आज बहिणाबाईंच्या कवितेची आठवण झाली.

मन वढाय वढाय
उभ्या पिकातल ढोर
किती हाकला हाकला
फिरी येत पिकावर

आज मुलाची परीक्षा संपली आणि ओढ लागली माहेरी जाण्याची. समजत होत ते घर आपल नाही पण मन मात्र पुन्हा पुन्हा ओढ घेत जाण्यासाठी.

माहेरी जाण एका परीक्षेला जाण्या सारख असत. मनातल दुःख झाकून ठेवून तिथ आनंद भरून यायचा .

घरातून निघताना घरचे का जाते ?का जाते ?करून सोडतात . पण ते सर्व सोडून मनाला माहेराची ओढ लागलेली असते.

थोडे दिवस जाण्यासाठी इथ मन मात्र तीळ तीळ तुटत कधी एकदा जायला मिळेल. कधी एकदा सगळ्यांना भेटायला मिळेल .

इधल घर आवरायच असत आणि जातांना मन आतून घाबरत असत माहेरी जायला भेटेल की नाही ?

माहेरी आई - बाबा वाट पहात असतात. त्यांना काय सांगू ? खर सांगून दुःखी करायच नसत. मन मात्र थाऱ्यावर नसत.

खरच किती समजवू मनाला माहेरची ओढ लागलेली असते .